agriculture news in marathi, Decreased plantation area in Pune district | Agrowon

पुणे जिल्ह्यात तुरीच्या लागवड क्षेत्रात घट
टीम अॅग्रोवन
शनिवार, 25 ऑगस्ट 2018

पुणे ः कमी दर, वेळेवर पाऊस नसल्याने मागील हंगामात तूर पिकाला चांगलाच फटका बसला. त्यामुळे चालू वर्षी ही तूर पिकाच्या क्षेत्रात चांगलीच घट झाली आहे. यंदा खरीप हंगामात अवघे ७४६ हेक्टरवर पेरणी झाली असून, सरासरी २१ टक्के पेरणी झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा एक हजार ८५३ हेक्टरने झाली असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यात तुरीच्या उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे.

पुणे ः कमी दर, वेळेवर पाऊस नसल्याने मागील हंगामात तूर पिकाला चांगलाच फटका बसला. त्यामुळे चालू वर्षी ही तूर पिकाच्या क्षेत्रात चांगलीच घट झाली आहे. यंदा खरीप हंगामात अवघे ७४६ हेक्टरवर पेरणी झाली असून, सरासरी २१ टक्के पेरणी झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा एक हजार ८५३ हेक्टरने झाली असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यात तुरीच्या उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे.

पुणे जिल्ह्यात तुरीचे सरासरी तीन हजार ५६३ हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी गेल्या वर्षी दोन हजार ५९९ हेक्टरवर पेरणी झाली होती. सरासरी ७३ टक्के पेरणी झाली होती. मात्र, मागील दोन ते तीन वर्षांपासून तुरीच्या क्षेत्रात वाढ झाली होती; परंतु तुरीची काढणी झाल्यानंतर उतरलेले दरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे चालू वर्षी बहुतांशी शेतकऱ्यांनी तूर पिकाकडे पाठ फिरवली असून, तूर पीक घेण्याकडे दुर्लक्ष केले आहे. पुणे जिल्ह्यात आत्तापर्यंत अवघ्या ७४६ हेक्टरवर पेरणी झाली आहे. यंदा जिल्ह्यात बहुतांश शेतकऱ्यांनी तुरीएेवजी सोयाबीन पिकाला पसंती दिली अाहे. त्यामुळे सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ झाली अाहे.

जिल्ह्यात हवेली, पुंरदर, जुन्नर, खेड, आंबेगाव, शिरूर, दौड या तालुक्यात तुरीची दरवर्षी मोठ्या प्रमाणात पेरणी होते. यंदा या भागातील शेतकऱ्यांनी वेळेवर पाऊस न झाल्यामुळे आणि कमी दरामुळे तुरीचे पीक घेण्याचे टाळले आहे. त्यामुळे हवेली तालुक्यात दहा हेक्टरवर पेरणी झाली आहे. भोरमध्ये ४६, मावळमध्ये ५२, वेल्ह्यामध्ये ६, जुन्नरमध्ये २२३, खेड ६४, आंबेगाव ५३, शिरूर ३०, बारामती २२, इंदापूर ३०, दौंड २५ आणि पुरंदर १८५ हेक्टरवर पेरणी झाली आहे. तर मुळशी तालुका तूर पिकांपासून दूर असल्याचे चित्र आहे.

मागील दोन ते तीन वर्षे तुरीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले होते. बाजारात तुरीला कमी दर मिळाल्यामुळे चालू वर्षी अनेक शेतकऱ्यांनी तूर पीक टाळले आहे. यंदा सुरवातीच्या काळात पावसाचे प्रमाण कमी होते. अशा दोन्ही बाबींमुळे तुरीची पेरणी कमी झाले आहे.
- बी. जे. पलघडमल, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

इतर ताज्या घडामोडी
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...
नगरमधील ४३३८ शेतकऱ्यांची शेतीमाल...नगर  ः आधारभूत किमतीने मूग, उडीद, सोयाबीनची...
जळगाव जिल्ह्यात ज्वारीच्या पेरणीला...जळगाव : जिल्ह्यात रब्बीतील ज्वारी पेरणीकडे...
ढगाळ वातावरणामध्ये द्राक्ष पिकात...सांगली, मिरज व सोलापूर येथील काही भागांमध्ये हलके...
हुमणी अळीचे एकात्मिक व्यवस्थापनगेल्या काही वर्षांपासून राज्याच्या विविध...
पुणे जिल्ह्यात रब्बीसाठी १९ हजार...पुणे : पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामाची तयारी सुरू...
सोलापूर जिल्हा बॅंकेकडून ७० हजार...सोलापूर  : सोलापूर जिल्हा बॅंकेच्या सव्वा...
सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू होईनातसातारा : जिल्ह्यात खरिप पिकांची काढणी अंतिम...
भाजीपाला सल्लासध्याच्या काळात बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, तूर, गहू, हरभरा...ज्या ठिकाणी पाण्याचा ताण बसत आहे, त्या ठिकाणी...
हाताचा नाकाशी होणाऱ्या संपर्कातूनही...न्यूमोनियाकारक जिवाणू हा नाकाला हात लावणे,...
खानदेशात खरिपातील ज्वारीची आवक सुरुजळगाव : खानदेशात अनेक भागांत ज्वारीची मळणी जवळपास...
परभणी जिल्ह्यात मुगाची उत्पादकता एकरी १...परभणी : यंदा परभणी जिल्ह्यात मुगाची सरासरी...
पुणे जिल्ह्यात चाराटंचाईपुणे   ः पुणे जिल्ह्यातील पूर्व पट्ट्यात...
नगर - मराठवाड्यात पाण्यावरून संघर्षाची...नगर ः पुरेसा पाऊस झाला नसल्याने यंदा...
‘महसूल’च्या जागेवर चाऱ्याच्या...यवतमाळ  ः पांढरकवडा व राळेगाव तालुक्‍यांतील...
सातारा जिल्ह्यात ७७३ एकरांवर तुती लागवडसातारा  ः जिल्ह्यात रेशीम शेती करण्याकडे...