agriculture news in marathi, deep depression in Arabian Sea | Agrowon

वादळाने बाष्प खेचून नेले; अरबी समुद्रात येणार चक्रीवादळ
टीम अॅग्रोवन
बुधवार, 23 मे 2018

पुणे : अरबी समुद्रात मंगळवारी कमी तीव्रतेचे वादळ (डीपडिप्रेशन) तयार झाले आहे. त्याची तीव्रता वाढत असून, बुधवारी (ता. २३) ‘मेकुणू’ चक्रीवादळ तयार होण्याचे संकेत आहेत. कमी दाबाच्या या प्रणालीमुळे समुद्रात तयार झालेले बाष्प ओमानकडे खेचून नेले आहे. त्यामुळे ओमान, येमन आणि सोमालीयाच्या किनाऱ्यावर ढगांची दाटी झाली आहे. तर भारतच्या पश्‍चिम किनाऱ्यालगत हलके ढग दिसून येत आहेत.  

पुणे : अरबी समुद्रात मंगळवारी कमी तीव्रतेचे वादळ (डीपडिप्रेशन) तयार झाले आहे. त्याची तीव्रता वाढत असून, बुधवारी (ता. २३) ‘मेकुणू’ चक्रीवादळ तयार होण्याचे संकेत आहेत. कमी दाबाच्या या प्रणालीमुळे समुद्रात तयार झालेले बाष्प ओमानकडे खेचून नेले आहे. त्यामुळे ओमान, येमन आणि सोमालीयाच्या किनाऱ्यावर ढगांची दाटी झाली आहे. तर भारतच्या पश्‍चिम किनाऱ्यालगत हलके ढग दिसून येत आहेत.  

गेल्या आठवड्यात याच भागात आलेल्या ‘सागर’ चक्रीवादळाने अरबी समुद्रातील बाष्प ओढून नेल्याने महाराष्ट्रासह दक्षिण भारतात आकाश निरभ्र होऊन पूर्वमोसमी पावसाचे प्रमाण घटले. दक्षिण भारतात सध्या राज्यात काही ठिकाणी ढगाळ हवामान असले, तरी त्यात बाष्पाचे प्रमाण कमी असल्याचे दिसून येते. हे वादळ ओमानच्या दिशेकडे सरकल्यानंतर या भागात पुन्हा बाष्प गोळा होण्यास काही कालावधी लागणार आहे. त्यानंतरच पावसाचे प्रमाण पुन्हा वाढू शकेल.

नैर्ऋत्य अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढत असून, ही प्रणाली ताशी ११ किलोमीटर वेगाने वायव्येकडे सरकत आहेत. मंगळवारी सकाळी ८.३० वाजता या भागात कमी तीव्रतेचे वादळ तयार झाले होते. सोकोट्रा बेटांपासून अग्नेयेकडे ५२० किलोमीटर, तर सलालाहपासून (आेमान)  ९३० किलोमीटर दक्षिणेकउे ही स्थिती होती. बुधवारी सकाळपर्यंत या स्थितीचे चक्रीवादळात तर गुरुवारपर्यंत (ता. २४) तीव्र चक्रीवादळात रूपांतर होणार आहेत. 

हे वादळ शनिवारपर्यंत (ता. २६) ओमान आणि अग्नेय येमेनच्या किनाऱ्याला धडकण्याची शक्यता आहे. चक्रीवादळाच्या प्रभावामुळे अरबी समुद्रात ताशी ६५ ते ८५ किलोमीटर वेगाने वारे वाहू लागले आहे. शनिवारपर्यंत पश्‍चिम मध्य अरबी समुद्रात ताशी ६५ किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. तसेच समुद्र खवळून अति उंच लाटा उसळणार आहेत. २३ ते २६ मे या कालावधीत ही स्थिती कायम राहणार असल्याने मासेमारीसाठी खोल समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. 

माॅन्सूनच्या आगमनास पोषक स्थिती
नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) अंदमानात दाखल होण्यास पोषक हवामान हाेत आहे. शुक्रवारपर्यंत (ता. २५) मॉन्सून दक्षिण अंदमान समुद्रात दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. अंदमानात साधारण: २० मेपर्यंत दखल होणारा मॉन्सून यंदा २३ मे रोजी दाखल होण्याचा अंदाज होता. हवेचे दाब, वाऱ्यांची दिशा, पावसाचे प्रमाण यावर मॉन्सूनची वाटचाल ठरत असते. हवामानात वेगाने होत असलेल्या बदलामुळे मॉन्सूनच्या प्रगतीवर परिणाम होत असून, या बदलांचे सातत्याने निरिक्षण केले जात आहे. 

 

इतर अॅग्रो विशेष
समजून घ्या पाण्याचे महत्त्वपाण्याची समस्या शाश्वत पद्धतीने सोडवण्यासाठी...
जनावरांची तडफड, लोकांचा पाण्यासाठी टाहोसोलापूर ः राज्य शासनाने दुष्काळ जाहीर करून जवळपास...
‘गुणनियंत्रण’विरोधात विखेंचेही पत्र पुणे : राज्याच्या कृषी खात्यातील गुण नियंत्रण...
राज्य बॅंकेकडून साखरेच्या मूल्यांकनात...कोल्हापूर : केंद्राने खुल्या साखरेचे किमान विक्री...
राज्यात उद्या हलक्या पावसाची शक्यतापुणे: वेगाने बदलणारे वातावरण, वाऱ्यांच्या...
प्रेरणा प्रकल्पातून ९० हजार शेतकऱ्यांचे...मुंबई : राज्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त १४...
कांद्याच्या ढिगाऱ्यात बुजवून घेत...नाशिक  : कमी पाऊस, दुष्काळी परिस्थिती व...
एका संदेशाने आयुष्य केले बळकटटाकळी ढोकेश्वर, जि. नगर  ः काही तासांपूर्वी...
'दावणीलाही नाही आणि छावणीत नाही; जनावरे...सोलापूर :  मागील सरकारच्या काळात छावणीत...
वनहक्काच्या ४३ हजारांहून अधिक...मुंबई : राज्यात मागील अवघ्या तीन महिन्यांत...
खानदेशात मका दरात वाढजळगाव ः खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...
पशूपालन अन्‌ गूळनिर्मितीतून शेती केली...राशिवडे (ता. राधानगरी, जि. कोल्हापूर) येथील...
दुष्काळातही भाजीपाला शेतीतून मिळविले...लातूर जिल्ह्यातील उमरगा (यल्लादेवी) येथील माळी...
रयत राजाची अन् राजा रयतेचाहिंदवी स्वराज्य संस्थापक, रयतेचा लोककल्याणकारी...
थकीत एफआरपीचा तिढासा  खरेच्या किमान विक्री मूल्यात प्रतिक्विंटल २००...
भारतीय लष्कराने घेतला बदला; पुलवामा...जम्मू : पुलवामात सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यानंतर...
आदिवासींचं श्रद्धास्थान असलेल्या कचारगड...कचारगड, जि. गोंदिया : मध्य भारतातील सर्व आदिवासी...
मराठवाड्यात दीड महिन्यात ७७...औरंगाबाद : मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र...
चार वर्षांत संत्रा उत्पादकांची दखलच...नागपूर : कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या आणि...
सांगली जिल्ह्यातील सहा कारखाने...सांगली  ः सहा कारखान्यांनी एकरकमी एफआरपी...