agriculture news in marathi, Deficit in Papaya area in Jalgaon district along with Nandurbar | Agrowon

नंदुरबारसह जळगाव जिल्ह्यात पपई क्षेत्रात घट
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 2 जानेवारी 2018

जळगाव : नंदुरबारसह जळगाव जिल्ह्यात पपईच्या क्षेत्रात निम्मी घट झाली आहे. मागील उन्हाळ्यात लागवड केलेले पपईचे पीक विषाणूजन्य रोगांमुळे नष्ट करण्याची वेळ अनेक शेतकऱ्यांवर ओढावल्याने शेतकऱ्यांनी जणू धसकाच घेतला. यातच लागवड व इतर असा उत्पादनखर्च वाढल्याने पपईचे पीक कमी झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

जळगाव : नंदुरबारसह जळगाव जिल्ह्यात पपईच्या क्षेत्रात निम्मी घट झाली आहे. मागील उन्हाळ्यात लागवड केलेले पपईचे पीक विषाणूजन्य रोगांमुळे नष्ट करण्याची वेळ अनेक शेतकऱ्यांवर ओढावल्याने शेतकऱ्यांनी जणू धसकाच घेतला. यातच लागवड व इतर असा उत्पादनखर्च वाढल्याने पपईचे पीक कमी झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

जळगाव जिल्ह्यात चोपडा, यावल, रावेर, जळगाव, पाचोरा भागांत पपईची लागवड दरवर्षी डिसेंबर ते मार्च यादरम्यान केली जाते. डिसेंबरमध्ये लागवड अधिक असते. जिल्ह्यात सुमारे अडीच हजार हेक्‍टर पपईचे क्षेत्र असते. तर नंदुरबार जिल्ह्यात शहादा, नंदुरबार व तळोदा तालुक्‍यांत पपईची अधिकची लागवड केली जाते. नंदुरबार व जळगाव जिल्ह्यांत मिळून सुमारे चार हजार हेक्‍टरवर पपईची लागवड केली जाते. परंतु यंदा लागवड फारशी नाही.

मागील हंगामात पपईचा हेक्‍टरी खर्च ८० हजार आणि उत्पन्न ६० हजार अशी स्थिती विषाणूजन्य रोगांमुळे निर्माण झाली होती. अगदी ऑक्‍टोबरपासून रोगराई आली. पपई लागवडीसाठी गादीवाफे, आयएसआय ठिबक, विद्राव्य खते, तणनाशके किंवा भांगलण, कीडनाशके व बुरशीनाशकांच्या फवारण्या यासाठी मोठा खर्च आला. शिवाय विषाणूजन्य रोगांमुळे पपईची फळे बेढब होती. त्यांचा आकार लहान-मोठा असल्याने व्यापारी खरेदीला नाक मुरडत होते.

कमी दर सांगून अडवणूक सुरू झाली. नाइलाजाने काही शेतकऱ्यांनी वाहतूक खर्च पेलून चेरी कारखान्यात कमी दरात पपई विकली. नंतर बागांवर रोटाव्हेटर फिरविण्याची वेळ आली. क्षेत्र रिकामे करून शेतकऱ्यांनी मका व हरभरा पेरला. हा वाईट अनुभव आल्याने यंदा पपईची लागवड करणे अनेक शेतकरी टाळत आहेत.

लागवडीसंबंधी फारसा प्रतिसाद दिसत नसल्याने पपईचे रोप काही नर्सरीचालकांनी कमी दरात द्यायला सुरवात केली आहे. एक रोप ८ ते १० रुपयांना मिळते. त्याची किंमत कमी करून ६ ते ८ रुपयांपर्यंत केल्याची माहिती मिळाली.

पपईचे पीक विषाणूजन्य रोगांच्या कचाट्यात अडकले होते. रोगांना अटकाव करण्यासाठी अनेक प्रयत्न केले, परंतु पिकात सुधारणा झाली नाही. त्यामुळे यंदा आमच्या भागात पपईची लागवड फारशी नाही.
- अनिल सपकाळे, शेतकरी, करंज, जि. जळगाव

 

इतर बातम्या
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...
खानदेशात पपईचे पीक जोमात धुळे : यंदा पपईचे पीक कमी पाऊस असतानाही सातपुडा...
नगरमधील ४३३८ शेतकऱ्यांची शेतीमाल...नगर  ः आधारभूत किमतीने मूग, उडीद, सोयाबीनची...
जळगाव जिल्ह्यात ज्वारीच्या पेरणीला...जळगाव : जिल्ह्यात रब्बीतील ज्वारी पेरणीकडे...
मराठवाडा भीषण पाणीटंचाईच्या उंबरठ्यावरऔरंगाबाद : दुष्काळाची छाया गडद झालेल्या...
कमी दरांवरून जिनर्सचा ‘सीसीआय’च्या...जळगाव ः भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) कापूस...
कोल्हापुरी गुळाचा गोडवा यंदा वाढणारकोल्हापूर : यंदाच्या पावसाळ्यात गुजरात,...
शेतीपासून जितके दूर जाल तितके दुःख...पुणे : शेतीशी जोडलेली माणसं ही निसर्ग आणि मानवी...
‘पंदेकृवि’च्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचा...अकोला :  डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ...
'दक्षिण व उत्तर सोलापूर तालुक्‍यांतील...सोलापूर : ‘‘दक्षिण व उत्तर सोलापूर तालुक्‍यांतील...
पुणे जिल्ह्यात रब्बीसाठी १९ हजार...पुणे : पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामाची तयारी सुरू...
सोलापूर जिल्हा बॅंकेकडून ७० हजार...सोलापूर  : सोलापूर जिल्हा बॅंकेच्या सव्वा...
‘दुष्काळाच्या निकषांसाठी शासनाने...पुणे : कमी पाऊस झाल्यामुळे सरकारला दुष्काळ जाहीर...
नाबार्डच्या व्याजदरातच जिल्हा बँकांना...मुंबई : राज्य बँकेला नाबार्डकडून मिळणाऱ्या...
सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू होईनातसातारा : जिल्ह्यात खरिप पिकांची काढणी अंतिम...
अकोला, बुलडाणा जिल्ह्यांत कोरडवाहू...अकोला : अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यात कोरडवाहू...
कोकण, पश्‍चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी...पुणे : कोकण अाणि पश्‍चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी...