agriculture news in marathi, Deficit water storage in small, medium projects in Marathwada | Agrowon

मराठवाड्यातील लघू, मध्यम प्रकल्पांतील उपयुक्‍त पाणीसाठ्यात घट
टीम अॅग्रोवन
बुधवार, 17 ऑक्टोबर 2018

औरंगाबाद  : दुष्काळाच्या उंबरठ्यावरील मराठवाड्यात पाण्याची टंचाई जाणवण्याची आता चिन्हे आहेत. मराठवाड्यातील ७४५ लघु आणि ७५ मध्यम प्रकल्पांत ऑक्‍टोबरच्या मध्यातच केवळ २२ टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक असल्याचे चित्र आहे. परतीच्या पावसाने निराशा केली आहे.

औरंगाबाद  : दुष्काळाच्या उंबरठ्यावरील मराठवाड्यात पाण्याची टंचाई जाणवण्याची आता चिन्हे आहेत. मराठवाड्यातील ७४५ लघु आणि ७५ मध्यम प्रकल्पांत ऑक्‍टोबरच्या मध्यातच केवळ २२ टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक असल्याचे चित्र आहे. परतीच्या पावसाने निराशा केली आहे.

परतीच्या पावसामुळे मराठवाड्यातील पाणीसाठ्यात एरवी वाढीची अपेक्षा असते. यंदा मात्र मराठवाड्यातील प्रकल्पांत अपेक्षित पाणीसाठा झाला नाही. आता पाणीसाठ्यांमध्ये घटीची नोंद होत आहे. मराठवाड्यातील लघू, मध्यम व मोठ्या प्रकल्पांसह नद्यांवरील बंधाऱ्यांमध्ये ३०.६५ टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे. तेरणा, मांजरा, रेणा नदीवरील २४ बंधाऱ्यांपैकी सहा बंधाऱ्यात उपयुक्‍त पाण्याचा थेंब नाही. गोदावरी नदीवरील ११ बंधाऱ्यातही केवळ ५० टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे. जवळपास २९ मध्यम प्रकल्पात उपयुक्‍त पाण्याचा थेंब नाही. त्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील ९, जालना ३, लातूर १, उस्मानाबाद ६ व बीड जिल्ह्यातील सर्वाधिक १० प्रकल्पांचा समावेश आहे.

जालना व बीड जिल्ह्यांतील लघू प्रकल्पांमधील उपयुक्‍त पाणीसाठा अनुक्रमे ४ व ५ टक्‍क्‍यांवर आला आहे. लातूर जिल्ह्यातील १२६ लघू प्रकल्पांतही केवळ १२ टक्‍के, तर उस्मानाबादमधील २०१ लघू प्रकल्पांत केवळ १५ टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा आहे. जालना जिल्ह्यातील ७ मध्यम प्रकल्पांत केवळ ७ टक्‍के, बीड जिल्ह्यातील १६ मध्यम प्रकल्पांत १३ टक्‍के, तर औरंगाबादमधील १६ मध्यम प्रकल्पांत केवळ १० टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी दिली.

चार मोठे प्रकल्प तळाशी

मराठवाड्यातील अकरा मोठ्या प्रकल्पांपैकी तीन प्रकल्पांत उपयुक्‍त पाणी नाही. त्यामध्ये बीड जिल्ह्यातील माजलगाव व मांजरा, तर उस्मानाबाद जिल्ह्यातील सिनाकोळेगाव प्रकल्पांचा समावेश आहे. अकराही मोठ्या प्रकल्पांपैकी येलदरीमध्येही केवळ ९ टक्‍केच उपयुक्‍त पाणी शिल्लक असल्याचे जलसंपदा विभागाचे आकडेवारी सांगते.

 

इतर बातम्या
कृषी विकास दराची मोठी बुडीमुंबई  ः देशात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर...
कर्नाटकी बेंदराच्या निमित्ताने आज ...कोल्हापूर  : राज्यातील कर्नाटक सीमेलगतच्या...
मॉन्सूनचे प्रवाह अजूनही मंदचपुणे  : अरबी समुद्रात गुजरातच्या किनाऱ्यावर...
ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचा अंदाजपुणे  : ‘वायू’ चक्रीवादळ निवळल्यानंतर...
एफआरपी द्या, काटामारी रोखा : बच्चू...पुणे :  राज्यातील ऊस उत्पादक...
शेतकरी सन्मान योजनेत रत्नागिरीतील आठ...रत्नागिरी : पंतप्रधान शेतकरी सन्मान...
कीटकशास्‍त्र विभागातर्फे ट्रायकोकार्ड...परभणी ः येत्या हंगामात मराठवाड्यातील औरंगाबाद,...
फळबाग योजनेतील अटी कोकणासाठी शिथिल करू...रत्नागिरी ः भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड...
महावितरणच्या कामात सुधारणा व्हायला हवी...जळगाव ः ‘महावितरण’च्या कार्यपद्धतीबाबत सामान्य...
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानाची...नाशिक : मागील वर्षी लाल कांद्याचे भाव पडल्याने...
कपाशीचा नांदेड ४४ बीटी वाण लोकार्पण हा...परभणी  : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
पावसाला उशीर झाल्याने चिंतेचे ढग गडदनांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत यंदा...
कृषी विद्यापीठाच्या वाणांच्या...रत्नागिरी ः डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी...
परभणी, हिंगोलीतील दूध उत्पादकांच्या... परभणी  ः शासकीय दूध योजनेअंतर्गत परभणी...
विदर्भातील कृषी विकासाला बाधक ठरतोय...नागपूर   ः सत्ताकेंद्र विदर्भात असताना...
राज्यातील दूध संघांपूढे ‘अमूल’चे कडवे...पुणे: राज्याच्या दूध उद्योगात ‘अमूल’चा होत असलेला...
उदारीकरणाच्या नावाखाली उत्पादन...पुणे   : देशात १९९१ मध्ये...
विधिमंडळाचे आजपासून पावसाळी अधिवेशनमुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी...
दुष्काळ, पीकविम्याचे आठ हजार कोटी...मुंबई ः लोकसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर...
दुष्काळ, मंत्र्यांचे भ्रष्टाचार, आरक्षण...मुंबई : राज्यात भीषण दुष्काळ आहे, त्यामुळे...