agriculture news in marathi, Deficit water supply in Marathwada projects | Agrowon

मराठवाड्यातील प्रकल्पांच्या उपयुक्त पाणीसाठ्यात घट
टीम अॅग्रोवन
रविवार, 30 सप्टेंबर 2018

औरंगाबाद : मराठवाड्यातील २९ मध्यम प्रकल्पांसह ७ बंधाऱ्यांत उपयुक्‍त पाण्याचा थेंब नाही. प्रकल्पांमधील उपयुक्‍त पाणीसाठ्यातील घट सुरूच अाहे. एकूण ८६४ प्रकल्पांमध्ये शुक्रवारअखेर (ता. २८) केवळ ३३.०२ टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा झाल्याची नोंद झाली आहे.

औरंगाबाद : मराठवाड्यातील २९ मध्यम प्रकल्पांसह ७ बंधाऱ्यांत उपयुक्‍त पाण्याचा थेंब नाही. प्रकल्पांमधील उपयुक्‍त पाणीसाठ्यातील घट सुरूच अाहे. एकूण ८६४ प्रकल्पांमध्ये शुक्रवारअखेर (ता. २८) केवळ ३३.०२ टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा झाल्याची नोंद झाली आहे.

यंदा पावसाने दिलेल्या ओढीने मराठवाड्यातील लघू, मध्यम, मोठ्या प्रकल्पांसह बंधाऱ्यांमध्ये अपेक्षित पाणीसाठा झालाच नाही. शुक्रवारच्या माहितीनुसार, ११ मोठ्या प्रकल्पांमध्ये केवळ ३७ टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा झाला. त्यापाठोपाठ ७५ मध्यम प्रकल्पांत २३ टक्‍के, ७४५ लघू प्रकल्पांत २२ टक्‍के, गोदावरी नदीवरील ९ बंधाऱ्यांत ५५ टक्‍के, तेरणा, मांजरा रेणा नदीवरील २४ बंधाऱ्यांमध्ये २४ टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा झाला आहे. मराठवाड्यातील ७५ मध्यम प्रकल्पांत उपयुक्‍त पाणीसाठा केवळ २३ टक्‍क्‍यांवर आला आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील १६ मध्यम प्रकल्पांपैकी ९ प्रकल्पांत, जालना जिल्ह्यातील ७ मध्यम प्रकल्पांपैकी ३ प्रकल्पांत, बीड जिल्ह्यातील १६ मध्यम प्रकल्पांपैकी तब्बल १० प्रकल्पांत, तर लातूर जिल्ह्यातील ८ पैकी एका मध्यम प्रकल्पात उपयुक्‍त पाणी नाही. उस्मानाबाद जिल्ह्यातील १७ पैकी ६ मध्यम प्रकल्प तहानलेले आहेत.

मराठवाड्यातील मोठ्या ११ प्रकल्पांपैकी माजलगाव व सिनाकोळेगाव प्रकल्पांचीदेखील हीच स्थिती आहे. मांजरा प्रकल्पात केवळ १ टक्‍के, तर येलदरीत ९ टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा झाला आहे. मराठवाड्यातील ७४५ लघू प्रकल्पांत २८ सप्टेंबरअखेरपर्यंत २०१६ मध्ये २९ टक्‍के, २०१७ मध्ये ४३ टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा झाला होता, अशी माहिती जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी दिली.
तेरणा, मांजरा व रेणा या तीन नद्यांवरील २४ पैकी ७ बंधाऱ्यांमध्येही उपयुक्‍त पाणी नाही. त्यामध्ये बोरगाव, वांजरखेडा, कारसा, नागझरी, धनेगाव, टाकळगाव व राजेगाव येथील बंधाऱ्यांचा समावेश अाहे.

जिल्हानिहाय लघू प्रकल्पांची संख्या आणि उपयुक्त पाणीसाठा (टक्के)

जालना ५७
बीड १२६
लातूर १३२ १३
उस्मानाबाद २०१ १४

  

इतर बातम्या
जळगावच्या पालकमंत्र्यांचा दौरा पुन्हा...जळगाव : महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचा...
खानदेशातील पाणीटंचाई गंभीरजळगाव : खानदेशात पाणीटंचाई दिवसेंदिवस बिकट होत...
भारतीयांच्या पचनसंस्थेतील...भारतीय लोकांच्या पचनसंस्थेमध्ये कार्यरत...
खानदेशात अनियमित वीजपुरवठाजळगाव : खानदेशात जलपातळी सातत्याने घटत आहे....
अमरावती विभागाला पाणीटंचाईच्या झळाबुलडाणा : कमी पावसामुळे अमरावती विभागातील...
तूर विक्रीच्या नोंदणीकडे शेतकऱ्यांची...अकोला  : या हंगामात शेतकऱ्यांनी पिकविलेल्या...
शेतकरी, जवान अडचणीत : भुजबळनाशिक : सध्याच्या सरकारच्या काळात देशातील...
नाशिक येथे साकारणार 'देवराई' नाशिक : दुर्मीळ देशी प्रजातींच्या वृक्षांचे...
दुष्काळात खचू नका, शासन पाठीशी :...सोलापूर : दुष्काळी परिस्थितीमुळे पाणी,...
शेतकऱ्यांच्‍या थकवलेल्या पैशांची...पुणे ः शेतीमालाचा लिलाव झाल्यानंतर २४ तासांत पैसे...
नगर जिल्हा परिषदेचा यंदा ४४ कोटी...नगर : जिल्हा परिषदेत सोमवारी झालेल्या सर्वसाधारण...
नांदेड परिमंडळात सौर कृषिपंप योजनेसाठी...नांदेड ः मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेअंतर्गत...
जनावरांची तडफड, लोकांचा पाण्यासाठी टाहोसोलापूर ः राज्य शासनाने दुष्काळ जाहीर करून जवळपास...
शेतीमाल तारण योजनेत ४०६ शेतकऱ्यांनी...औरंगाबाद : मराठवाड्यातील जालना, परभणी व हिंगोली...
ऊस उत्पादक शेतकरी देणार शहिदांच्या...कोल्हापूर : पुलवामा जिल्ह्यातील दहशतवादी हल्ल्यात...
‘गुणनियंत्रण’विरोधात विखेंचेही पत्र पुणे : राज्याच्या कृषी खात्यातील गुण नियंत्रण...
राज्य बॅंकेकडून साखरेच्या मूल्यांकनात...कोल्हापूर : केंद्राने खुल्या साखरेचे किमान विक्री...
राज्यात उद्या हलक्या पावसाची शक्यतापुणे: वेगाने बदलणारे वातावरण, वाऱ्यांच्या...
प्रेरणा प्रकल्पातून ९० हजार शेतकऱ्यांचे...मुंबई : राज्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त १४...
कांद्याच्या ढिगाऱ्यात बुजवून घेत...नाशिक  : कमी पाऊस, दुष्काळी परिस्थिती व...