agriculture news in Marathi, Dehugaon-Lohgaon in the bye-elections with a tricolor | Agrowon

देहूगाव-लोहगाव गटाच्या पोटनिवडणुकीत तिरंगी लढत
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 19 मार्च 2019

पुणे : सदस्याचे जातपडताळणी प्रमाणपत्र फेटाळल्याने रिक्त झालेल्या जिल्हा परिषदेच्या देहूगाव-लोहगाव गटाच्या पोटनिवडणुकीसाठी २४ मार्च रोजी मतदान होणार आहे. या जागेसाठी काँग्रेसचे उमेदवार रूपेश बबन चव्हाण, राष्ट्रवादीचे मच्छिंद्र गणपत चव्हाण, शिवसेना शैला राजू खंडागळे रिंगणात असल्याने तिरंगी लढत होणार आहे. 

पुणे : सदस्याचे जातपडताळणी प्रमाणपत्र फेटाळल्याने रिक्त झालेल्या जिल्हा परिषदेच्या देहूगाव-लोहगाव गटाच्या पोटनिवडणुकीसाठी २४ मार्च रोजी मतदान होणार आहे. या जागेसाठी काँग्रेसचे उमेदवार रूपेश बबन चव्हाण, राष्ट्रवादीचे मच्छिंद्र गणपत चव्हाण, शिवसेना शैला राजू खंडागळे रिंगणात असल्याने तिरंगी लढत होणार आहे. 

पुणे जिल्हा परिषदेच्या हवेली तालुक्यातील गट क्र. ३५ देहू- लोहगाव हा गट अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव आहे. या गटातून निवडून आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्या मंगल नितीन जंगम यांचे सदस्यत्व रद्द ठरवण्यात आल्याने रिक्त झालेला जागेवर पोटनिवडणूक होत आहे. तत्कालीन उमेदवार शैला राजू खंडागळे यांनी तक्रार केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंगल जंगम यांचे जातपडताळणी प्रमाणपत्र फेटाळले गेले होते. 

पोटनिवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानंतर शिवसेना आणि काँग्रेसकडून प्रत्येकी एका उमेदवाराने अर्ज दाखल केला. तर राष्ट्रवादीकडून उषा चंद्रकांत चव्हाण आणि मच्छिंद्र गणपत चव्हाण यांचे उमेदवारी अर्ज पात्र ठरले होते. उमेदवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी सोमवारी (ता. १८) उषा चव्हाण यांनी माघार घेतल्याने राष्ट्रवादीकडून मच्छिंद्र गणपत चव्हाण रिंगणात आहेत. 

रविवारी (ता. २४) मतदान होणार असून, ९ हजार ६०६ पुरुष, तर ८ हजार ९९५ महिला असे एकूण १८ हजार ६०१ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. सोमवारी (ता. २५) जिल्हा परिषदेच्या जून्या इमारतीतील महात्मा गांधी सभागृहात मतमोजणी होणार आहे, निवडणूक निर्णय अधिकारी, तथा तहसीलदार हवेली कार्यालयातर्फे सांगण्यात आले.

इतर बातम्या
कडवंची : पाणंदमुक्‍त रस्त्यांची...रस्ते, पाणी आणि वीज हे शेतीविकासातील महत्त्वाचे...
विदर्भातील संत्रा पट्ट्यात आंबिया...नागपूर ः विदर्भातील वाढत्या तापमानाचा संत्रा...
सांगलीत ९९ लाख क्विंटलवर साखर उत्पादनसांगली : जिल्ह्यातील सोळा साखर कारखान्यांनी ८२...
पाणीटंचाईमुळे पुणे जिल्ह्यातील ३६...पुणे   : उन्हाच्या झळा वाढत असल्याने...
जत तालुक्यात बेदाणा उत्पादनात ३५ टक्के...सांगली : पावसाळ्यात पावसाची दडी, परतीच्या पावसाचा...
जनावरांच्या छावणीत बांधली गेली ‘...नगर : दुष्काळ पाचवीलाच पूजलेला, पिण्याचे पाणी...
बुलडाणा जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाईबुलडाणा : जिल्ह्यात काही वर्षांपूर्वी आलेले...
अकोला, बुलडाण्यात वाढीव मतदान कुणाला...अकोला  : लोकशाहीचा उत्सव म्हणून गणना...
शिरुर तालुक्यात रानडुकरांकडून उभ्या...रांजणगाव सांडस, जि. पुणे : शिरूर तालुक्‍...
पाथर्डी, पारनेरमध्ये सर्वाधिक टॅंकरने...नगर : जिल्ह्यात पाणीटंचाईचे गंभीर परिणाम...
राजकारणातील प्रस्थापितांची घराणेशाही...नगर  : मुस्लिम समाजाला भीती दाखविण्यासाठी...
सातारा जिल्ह्यात ३३६५ हेक्टरवर उन्हाळी...सातारा  ः जिल्ह्यातील पूर्व भागात तीव्र...
पाणीपुरवठ्यासाठी खानदेशात ५०७ विहिरी...जळगाव : पाणीटंचाई दूर करण्यासाठी खानदेशात सुमारे...
स्ट्रॉबेरी उत्पादनवाढीवर शेतकऱ्यांनी भर...भिलार, जि. सातारा  : स्ट्रॉबेरी महोत्सव हा...
नुकसानीचा अहवाल शासनाकडे, भरपाईकडे लक्षजळगाव : खानदेशात वादळासह अवकाळी पावसाने केळी...
लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात...मुंबई   ः राज्यात लोकसभा निवडणुकीच्या...
अब्दुल सत्तार यांची हकालपट्टी; तर...जालना ः  पक्षाविरोधात काम केल्यामुळे अब्दुल...
विजयदादा यांना तेव्हा स्थिरीकरण आठवले...सोलापूर : सहकारमहर्षी शंकरराव मोहिते पाटील यांनी...
मराठवाड्याचा पाणी प्रश्‍न सोडविणार :...पैठण, जि. औरंगाबाद   : पश्चिम घाटातून...
मोदीजी, महाराष्ट्र तुम्हाला धडा...मुंबई : आमच्या महाराष्ट्राच्या मातीतील...