agriculture news in marathi, Dehydration of living water | Agrowon

खानदेशातील जलसाठ्यात घट
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 13 नोव्हेंबर 2018

जळगाव : खानदेशात पाणीबाणी वाढू लागली असून, धरणांमधील जलसंचय घटू लागला आहे. मोठे प्रकल्प ५० टक्के भरलेच नव्हते. त्यात आजघडीला ४५ टक्‍क्‍यांपर्यंतच जलसाठा राहिला आहे. यातच गिरणा धरणातून मागील आठवड्यात पाण्याचे आवर्तन सोडले, परंतु हे पाणी नदीच्या शेवटच्या टोकातील धरणगाव व जळगाव तालुक्‍यांतील गावांपर्यंत पोचलेले नाही.

जळगाव : खानदेशात पाणीबाणी वाढू लागली असून, धरणांमधील जलसंचय घटू लागला आहे. मोठे प्रकल्प ५० टक्के भरलेच नव्हते. त्यात आजघडीला ४५ टक्‍क्‍यांपर्यंतच जलसाठा राहिला आहे. यातच गिरणा धरणातून मागील आठवड्यात पाण्याचे आवर्तन सोडले, परंतु हे पाणी नदीच्या शेवटच्या टोकातील धरणगाव व जळगाव तालुक्‍यांतील गावांपर्यंत पोचलेले नाही.

जळगाव जिल्ह्यात सर्वात मोठा प्रकल्प म्हणून गिरणा धरणाची ओळख आहे. त्यात ४८ टक्के जलसाठा सप्टेंबरच्या मध्यात होता. हा जलसाठा घटून तो ४२ टक्‍क्‍यांवर आला आहे. वाघूरमध्ये ४६ टक्के जलसाठा ४२ टक्‍क्‍यांवर, हतनूर प्रकल्पातील १०० टक्के साठा ८५ टक्‍क्‍यांपर्यंत आहे. रावेर तालुक्‍यातील अभोरा, मंगरूळ व सुकी प्रकल्पही १०० टक्के भरले होते. या प्रकल्पांमध्ये प्रत्येकी ९० टक्‍क्‍यांपर्यंतच जलसाठा आहे. चोपडा तालुक्‍यातील गूळ मध्यम प्रकल्प ६५ टक्के भरला होता. त्यात ५८ टक्के जलसाठा आहे.

जळगाव जिल्ह्यातील पश्‍चिम भागातील हिवरा व अग्नावती प्रकल्पातील जलसाठा घटत आहे. अग्नावतीमधील ६२ टक्के साठा ५८ टक्‍क्‍यांवर आला आहे. अंजनी, बहुळा, मन्याड, बोरी व भोकरबारी हे प्रकल्प कोरडेठाक आहेत. जामनेर तालुक्‍यातील तोंडापूर प्रकल्पही कोरडा होत आहे. त्यात फक्‍त पाच टक्के जलसाठा होता. हा साठा पुढील महिन्यात मृतसाठ्यापर्यंत पोचू शकतो, अशी भीती व्यक्त होत आहे. यावल तालुक्‍यातील मोर प्रकल्पातील साठा ५६ वरून ५० टक्‍क्‍यांवर आला आहे.

धुळे जिल्ह्यातील १०० टक्के भरलेल्या पांझरा प्रकल्पात ९० टक्के जलसाठा आहे. तर शिरपूर तालुक्‍यातील अनेर प्रकल्पातील साठा ८६ वरून ८० टक्‍क्‍यांपर्यंत आला आहे. करवंद प्रकल्पातही ९२ टक्के जलसाठा होता. तोदेखील कमी झाल्याची माहिती मिळाली.

इतर अॅग्रो विशेष
परभणीत मुगाची चार क्विंटल, तर उडदाची...परभणी ः जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामातील मुगाची...
कृषीच्या पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रवेश... पुणे ः राज्यातील चारही कृषी विद्यापीठांमध्ये...
दर कपातीने दूध उत्पादक मेटाकुटीसपुणे ः शासनाने गाईच्या दुधासाठी प्रतिलिटर २५...
‘ईपीआर’ कंपन्यांच्या भल्यासाठी दूध...पुणे : पॉलिथिन फिल्मचे पुनर्चक्रण करणाऱ्या काही '...
जिद्द दुष्काळातही गोड पेरू पिकवण्याची...पुणे जिल्ह्यात शिरूर या कायम दुष्काळी तालुक्यातील...
सुधारीत तंत्राने तरारला दर्जेदार भुईमूग तुळ्याचा पाडा (जि. पालघर) येथील आर्थिकदृष्ट्या...
विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाजपुणे ः मध्य महाराष्ट्राच्या परिसरात चक्राकार...
दुष्काळी भागात चारा छावण्या ः चंद्रकांत...मुंबई : राज्यातील दुष्काळी भागात गरज आणि...
कृषिकेंद्रित ग्रामविकासाची पायाभरणी! स्वातंत्र्योत्तर कालखंडापासून भारतीय कृषी...
जाणिवेचा दुष्काळ नको राज्य शासनाने दुष्काळ जाहीर...
वृक्ष होऊन जगू यामागील आठवड्यात असाच एक मुलाखतीचा सुंदर, कार्यक्रम...
एकत्र या, निर्यात वाढेलकेंद्रात मोदी सरकार सत्तेत आल्यापासून शेतमाल...
राज्यात कांदा उत्पादकांचा आक्रोश... पुणे ः राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये...
रोजगाराच्या शोधात गेलेल्या १२ जणांचा...महागाव, जि. यवतमाळ : कापूस वेचणीसाठी गेलेल्या...
देशभरात ४१४ लाख हेक्टरवर रब्बी पेरणी नवी दिल्ली ः देशात अनेक ठिकाणी दुष्काळी...
संत्रा बाग छाटणी सयंत्र ठरतेय केवळ...नागपूर ः शेतकऱ्यांना पूरक तंत्रज्ञान देण्यात...
होय... सरकीपासून चॉकलेट, कुकीज नागपूर : सरकीपासून ढेप आणि तेल मिळते ही झाली...
पीकपद्धतीनूसार बहुविध यंत्रांचा...हंगामी व वार्षिक नगदी पिके व फळपिके अशा बहुविध...
विदर्भात गारपिटीचा अंदाजपुणे : पूर्वेकडून वाहत असलेल्या उष्ण वाऱ्यांमुळे...
गाळपेर क्षेत्रातून उपलब्ध होणार ३४ लाख...पुणे ः राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या...