agriculture news in marathi, delay for compensation of gram procurement, nanded, maharashtra | Agrowon

तीन जिल्ह्यांत हरभऱ्याचे २८ कोटींचे चुकारे रखडले
टीम अॅग्रोवन
शनिवार, 2 जून 2018

नांदेड : केंद्र शासनाच्या किंमत समर्थन योजनेअंतर्गत नांदेड, परभणी, हिंगोली या तीन जिल्ह्यांत नाफेड आणि विदर्भ को-आॅपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन यांच्यातर्फे ७ हजार ५८७ शेतकऱ्यांचा १ लाख १४ हजार ८३९ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला. मंगळवारी (ता. २९) खरेदी बंद झाल्यामुळे तीन जिल्ह्यांतील नोंदणी केलेल्या २८ हजार ४१९ शेतकऱ्यांच्या हरभऱ्याचे मोजमाप लटकले असून, शेतकऱ्यांचे २८ कोटी २७ लाख ८८ हजार रुपयाचे चुकारे रखडले आहेत.

नांदेड : केंद्र शासनाच्या किंमत समर्थन योजनेअंतर्गत नांदेड, परभणी, हिंगोली या तीन जिल्ह्यांत नाफेड आणि विदर्भ को-आॅपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन यांच्यातर्फे ७ हजार ५८७ शेतकऱ्यांचा १ लाख १४ हजार ८३९ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला. मंगळवारी (ता. २९) खरेदी बंद झाल्यामुळे तीन जिल्ह्यांतील नोंदणी केलेल्या २८ हजार ४१९ शेतकऱ्यांच्या हरभऱ्याचे मोजमाप लटकले असून, शेतकऱ्यांचे २८ कोटी २७ लाख ८८ हजार रुपयाचे चुकारे रखडले आहेत.

नांदेड जिल्ह्यातील नाफेडच्या आठ आणि विदर्भ मार्केटिंग को आॅपरेटिव्ह फेडरेशनच्या एका खरेदी केंद्रावर २०६९१ शेतकऱ्यांनी हरभऱ्यासाठी आॅनलाइन नोंदणी केली होती. मंगळवारअखेरपर्यंत ४३८२ शेतकऱ्यांचा ६९ हजार २३८ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला. अजून १६३०९ शेतकऱ्यांची मोजमाप शिल्लक आहे.

परभणी जिल्ह्यातील नाफेडच्या सात आणि विदर्भ मार्केटिंग काे-आॅपरेटिव्ह फेडरेशच्या एका केंद्रावर ८२६३ शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २५३२ शेतकऱ्यांचा ३५१५८ क्विंटल हरभऱ्याची खरेदी करण्यात आली. परंतु ५७०४ शेतकऱ्यांची हरभरा खरेदी लटकली आहे.

हिंगोली जिल्ह्यातील नाफेड च्या पाच खरेदी केंद्रावर ७०५२ शेतकऱ्यांनी आॅनलाइन नोंदणी केलेली आहे. प्रत्यक्षात ६७३ शेतकऱ्यांचा १०,४४३ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला.

वखार महामंडळाच्या गोदामात साठविण्यासाठी जागा उपलब्ध नसल्यामुळे नांदेड जिल्ह्यात ३० हजार क्विंटल, परभणी जिल्ह्यात २४,४४७ क्विंटल, हिंगोली जिल्ह्यात ९८२३ क्विंटल हरभरा असा एकूण ६४ हजार २७० क्विंटल हरभरा खरेदी केंद्रावर पडून आहे. त्यामुळे २८ कोटी २७ लाख ८८ हजार रुपयांचे चुकारे रखडले आहेत. खरिपाची पेरणी जवळ येऊन ठेपलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना चुकारे अदा करण्याचे काम युद्धपातळीवर करणे आवश्यक आहे.

जिल्हानिहाय हरभरा खरेदी (क्विंटलमध्ये)

जिल्हा खरेदी शेतकरी संख्या नोंदणी केलेले शेतकरी
नांदेड ६९२३८  ४३८२  २०६९१
परभणी ३५१५८ २५३२ ८२६३
हिंगोली १०४४३ ६७३ ७०५२

 

इतर ताज्या घडामोडी
काँग्रेसमध्ये नवचैतन्य; प्रियंका गांधी...नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी...
पीकनिहाय सेंद्रिय खत व्यवस्थापनपशुपालनातून जमिनीची सुपीकता हा विषय आता...
परोपजीवी मित्र-कीटकांची ओळखसध्या केवळ कीडनियंत्रणासाठी कीटकनाशकांच्या...
खोडवा उसाला द्या शिफारशीत खतमात्रापाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन रासायनिक खतांचा...
परभणीत काकडी १००० ते १५०० रुपये क्विंटलपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...
मागण्यांसाठी संग्रामपूर येथे...बुलडाणा  ः जनावरांसाठी चारा नाही, लोकांना...
शेतकऱ्यांनी पाडली तूर खरेदी बंदयवतमाळ : हमीभावापेक्षा ९०० ते १००० रुपये कमी...
कर्जमाफीसाठी पॉलिहाउस शेडनेटधारक...नगर  : पॉलिहाउस शेडनेटधारक शेतकऱ्यांचे...
विदर्भात पाच ठिकाणी होणार ब्रिज कम...अमरावती  ः भूजल पुनर्भरणाच्या उद्देशाने...
सोलापूर जिल्ह्यातील १६२ पाणंद...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री पाणंद...
खानदेशात मक्याची आवक नगण्यजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...
सातारा जिल्ह्यात ४६ लाख ३५ हजार टन ऊस...सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम वेगात...
जळगावमधील ग्रामपंचायतींचा डिजिटल...जळगाव  ः ग्रामपंचायतींमध्ये संगणकावरील विविध...
पुणे जिल्ह्यात ७१ लाख टन ऊस गाळपपुणे   ः जिल्ह्यात १७ साखर...
नगर जिल्ह्याचे विभाजन होणारच ः...नगर  ः नगर जिल्ह्याचे विभाजन व्हावे, ही...
पंधरा दिवसांपूर्वीच संपला नगरमधील पाच...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये चाराटंचाई अंधिक तीव्र होत...
वीज दरवाढ रद्दबाबतचे परिपत्रक...शिरोली पुलाची, जि. कोल्हापूर : वीज दरवाढ...
दुष्काळग्रस्तांच्या मागण्यांसाठी परभणीत...परभणी : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी,...
हरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार...मुंबई   : हरकती असलेल्या जमिनी...
मराठवाडा, खानदेशात ४९ लाख टन ऊसगाळपऔरंगाबाद : यंदाच्या हंगामात मराठवाडा व खानदेशातील...