agriculture news in marathi, delay for orange processing unit, nagapur, maharashtra | Agrowon

काटोलच्या संत्रा प्रकल्पाचा २८ वर्षांपासून श्‍वास कोंडला
टीम अॅग्रोवन
शनिवार, 12 जानेवारी 2019

काटोल येथील प्रकल्पाकरिता एमआयडीसीकडून ९९ वर्षांकरिता जागा भाडेतत्त्वावर मिळाली आहे. गॅमन इंडियाला हा प्रकल्प भाडेतत्त्वावर देण्यात आला. त्यांनी तिसऱ्या व्यक्‍तीला तो चालविण्यास दिला. त्यानंतर न्यायालयीन प्रक्रियेत हा प्रकल्प अडकला आहे. तो ताब्यात मिळविण्याचे प्रयत्न महामंडळाचे आहेत. त्यानंतर तो सुरू केला जाईल.

- श्री. कारंजकर, व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ, पुणे

नागपूर : केवळ भाडे करारतील वादावरून न्यायालयीन प्रक्रियेत अडकलेल्या विदर्भातील सर्वांत मोठ्या काटोलच्या संत्रा प्रकल्पाच्या पुनरुज्जीवनास सरकारकडून होत असलेल्या दुर्लक्षामुळे संत्रा उत्पादकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पतंजलीच्या माध्यमातून हा प्रकल्प सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला होता. परंतु, हा प्रस्तावदेखील पुढे न सरकल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

अमरावती व नागपूर जिल्ह्यांत सुमारे १ लाख हेक्‍टरवर संत्रा लागवड आहे. परंतु, संत्र्यावरील प्रक्रियेचा एकही उद्योग नसल्याने हंगामात कच्चा संत्रा बेभाव विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर येते. त्यातच १९९० साली संत्राबेल्ट असलेल्या काटोल भागात झालेल्या गारपिटीमुळे संत्रा उत्पादकांचे मोठे नुकसान झाले.

तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी त्याची दखल घेत तब्बल ३० कोटी रुपयांची भरपाई संत्रा उत्पादकांसाठी मंजूर केली. तत्कालीन आमदार सुनील शिंदे यांनी वैयक्‍तिक संत्रा उत्पादकांना मदत देण्याऐवजी या निधीतून संत्रा प्रक्रिया उद्योग उभारला जावा, यासाठी पाठपुरावा केला. त्याची दखल घेत काटोल एमआयडीसीत ३० कोटी रुपये खर्चून संत्रा प्रक्रिया उद्योग कृषी उद्योग विकास महामंडळाने उभारला. त्यानंतर मुंबईच्या गॅमन इंडिया या कंपनीला भाडेतत्त्वावर चालविण्यास हा प्रकल्प देण्यात आला.

प्रकरण पोचले न्यायालयात
१९९० साली स्थापन झालेल्या या प्रकल्पातील आऊटडेटेड यंत्रणा काढून त्या ठिकाणी गॅमन इंडियाने अद्ययावत यंत्रणा बसविली. भाड्याच्या रकमेतून कृषी उद्योग विकास महामंडळ यंत्रणेवरील खर्चाची रक्‍कम कापून देईल, अशी कंपनीला अपेक्षा होती. परंतु, तसे न झाल्याने कृषी उद्योग विकास महामंडळ व गॅमन इंडिया दोघेही न्यायालयात गेले. त्यामुळे प्रक्रिया उद्योग बंद पडला. न्यायालयाने सध्या या कारखान्यावर अवसायक नेमला आहे. करारातील अटींचे पालन एमएआयडीसीकडून झाले नाही, असा आरोप गॅमन इंडियाचा आहे.

पतंजलीकडून चाचपणी
दरम्यान केंद्रीयमंत्री नितीन गडकरींच्या माध्यमातून रामदेवबाबांच्या पतंजली समूहाने हा उद्योग चालवावा, असे ठरले. कोर्टाच्या परवानगीने आचार्य बालकृष्णन यांनी प्रकल्पाची पाहणी केली. त्यानंतर मात्र पतंजली समूहाला मिहानमध्ये १०० एकर जागा प्रक्रिया उद्योगासाठी उपलब्ध करून देण्यात आल्याने हे काम रखडले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेनंतरच्या पहिल्या हिवाळी अधिवेशनात हा प्रकल्प सुरू करण्याची घोषणा केली होती.

एकमेव मल्टीलाइन प्रोसेसिंग
३० कोटींच्या या प्रकल्पात मल्टीलाइन प्रोसेसिंग यंत्रणा बसविली आहे. त्यासोबतच विदर्भातील सर्वांत मोठे म्हणजे ५०० टन क्षमतेचे कोल्डस्टोरेज आहे. टोमॅटो ज्युस, केचप, प्युरी, आंब्यावरही या ठिकाणी प्रक्रिया होत होती. संत्रा हंगाम केवळ चार महिने असतो त्यामुळे उर्वरित काळात इतर फळांवर प्रक्रिया शक्‍य होत होती, असा हा मल्टीलाईन प्रोसेसिंग प्रकल्प होता.
 

इतर अॅग्रो विशेष
आज शिवजयंती : शिवनेरीवर पारंपारिक...पुणे : फाल्गुन वद्य तृतीया या तिथीनुसार आज (ता....
अतितीव्र हवामानस्थितीला कर्बाचे वाढते...पुणे : वातावरणातील कार्बनडाय ऑक्साईडचे (कर्ब)...
कमतरतेनुसार सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर...अलीकडे सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता अधिक...
पिंप्री गावाने कमावले लसूणघास शेतीत नाव पिंप्री (वळण) (ता. राहुरी, जि. नगर) हे गाव मुळा...
दुष्काळातही सुरती हुरड्याची  चवच काही...औरंगाबाद जिल्ह्यातील सारंगपूर येथील अरुण कडूबाळ...
। तुका म्हणे कान्हा । भूक लागली नयनां ।।देहू : तुकाराम तुकाराम...असा नामघोष आणि...
नांदेड जिल्ह्यात कापूस उत्पादकता...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात २०१८-१९ च्या खरीप...
नगरची लढत राहणार लक्षवेधीनगर : राज्याच्या सर्वाधिक लक्ष असलेल्या नगर (...
रब्बी पीकविम्याला बोगस प्रकरणांचे ग्रहणमुंबई ः २०१८-१९ च्या रब्बी हंगामात पंतप्रधान...
सहा कारखान्यांची धुराडी थंडावलीऔरंगाबाद  : मराठवाडा व खानदेशातील पाच...
बेदाण्याला दराची गोडीसांगली ः होळी सणाच्या पार्श्वभूमीवर बेदाण्याची...
आनंदाचा उतरता आलेखजगभरातील आनंदी देशांचा अहवाल (वर्ल्ड हॅपीनेस...
आदित्यात् जायते वृष्टि:जगात एकूण १९५ देश आहेत, पण आकार, आर्थिक स्थिती,...
आज संत तुकाराम बीजदेहू, जि. पुणे  : जगद्‌गुरू संत श्री तुकाराम...
उज्ज्वल भविष्याचा सर्वोत्तम मार्ग ‘जल...भारत जलसंकट समस्येचा सामना करत आहे. वाढती...
जल‘मुक्त’ शिवारवॉ टर ग्रीडच्या माध्यमातून मराठवाड्यातील सर्व...
राज्यात शंभर लाख टन साखर उत्पादनभवानीनगर, जि. पुणे ः राज्यात ३० टक्के हुमणीग्रस्त...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अवकाळीची...पुणे : रविवारी, सोमवारी पुन्हा काही अंशी...
जैविक कीड-नियंत्रणासाठी उपयुक्त बुरशीगेल्या काही वर्षांमध्ये कीडनियंत्रणासाठी...
केशर आंबा फळगळीची कारणे अन् उपाययोजना  सद्यःस्थितीत हवामान आंबा झाडांसाठी...