agriculture news in marathi, delay for tur payment, buldhana, maharashtra | Agrowon

तुरीचे चुकारे रखडल्याने शेतकरी अडचणीत   
टीम अॅग्रोवन
बुधवार, 24 एप्रिल 2019

संग्रामपूर, जि. बुलडाणा  : शासनाच्या हमीभाव खरेदी केंद्रावर विक्री केलेल्या तुरीचे पैसे दीड महिन्यांपेक्षा अधिक काळापासून मिळाले नसल्याने शेतकऱ्यांसमोर असंख्य अडचणी उभ्या राहिल्या आहेत. तूर खरेदी केलेल्या केंद्रांवरील प्रक्रिया पूर्ण झालेली असताना जिल्हा मार्केटिंग फेडरेशनकडून पैसे देण्यासाठी टाळाटाळ केली जात असल्याचे समजते. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक व्यवहार विस्कळित झाले आहेत. 

संग्रामपूर, जि. बुलडाणा  : शासनाच्या हमीभाव खरेदी केंद्रावर विक्री केलेल्या तुरीचे पैसे दीड महिन्यांपेक्षा अधिक काळापासून मिळाले नसल्याने शेतकऱ्यांसमोर असंख्य अडचणी उभ्या राहिल्या आहेत. तूर खरेदी केलेल्या केंद्रांवरील प्रक्रिया पूर्ण झालेली असताना जिल्हा मार्केटिंग फेडरेशनकडून पैसे देण्यासाठी टाळाटाळ केली जात असल्याचे समजते. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक व्यवहार विस्कळित झाले आहेत. 

सध्या ग्रामीण भागात लग्नसराईचा हंगाम जोरात सुरू आहे. तसेच शेतीच्या पेरणीपूर्व मशागतसाठी पैशांची गरज असल्याने माल विकूनही शेतकऱ्यांना पैसे मिळत नाहीत. शासनाने येथे हमीभावाने १३ मार्चपासून तूर खरेदी सुरू केली. या वेळी पेमेंट तातडीने होणार या आशेने बाजारात शेतकऱ्यांनी तूर विक्री केली नाही. या केंद्रावर २१ एप्रिलपर्यंत १५४३ शेतकऱ्यांकडून १०, ७४९.७० क्विंटल तुरीची खरेदी झालेली आहे. केंद्र सुरू होऊन दीड महिन्याचा कालावधी होत आहे. तरी पण शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यात आलेले नाहीत. राजकीय सर्व नेते लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत व्यस्त असल्याने शेतकऱ्यांच्या या समस्येकडे कुणाचेही लक्ष नाही.  

खरेदी केंद्राचा आर्थिक व्यवहार उसनवारीवर? 
शासनाकडून येथील खरेदी विक्री संस्थेला हमीभाव खरेदीसाठी मान्यता आहे. या ठिकाणी केंद्र चालवीत असताना दररोज १५ ते २० हजार खर्चांसाठी पैशांची गरज असते. यासाठी जिल्हा मार्केटिंग कार्यालयाकडून पैसे दिले जातात. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून पैसे अडकून असल्याने सद्यःस्थितीत संस्थेला उसनवारी करून व्यवहार करावे लागत आहे. यामध्ये शिलाई मशीन, रोजनदारी, स्टेशनरी व इतर खर्चांचा समावेश असतो. शेतकऱ्यांसोबत शेतकऱ्यांची संस्थाही आर्थिक विवंचनेत असल्याचे यातून दिसते.

इतर ताज्या घडामोडी
लोकसभेच्या निकालावर ठरेल विधानसभेची...नगर ः लोकसभा निवडणुकीत कोणत्या मतदारसंघातून...
उष्णतावाढीमुळे यावर्षीही साताऱ्यात आले...सातारा  ः मागील तीन ते चार वर्षांपासून मे...
नांदेड जिल्ह्यात १२१ टॅंकरने पाणीपुरवठानांदेड  ः नांदेड जिल्ह्यातील पाणीटंचाईचे...
जलसंधारण कामांसाठी पुणे जिल्ह्याला ११...शेटफळगढे, जि. पुणे  : जिल्ह्यातील जलयुक्त...
पाणीप्रश्नी किनगाव ग्रामपंचायतीवर...रोहिलागड, जि. जालना  : किनगाव येथील महिलांनी...
अठराशेवर गावांमध्ये घेतल्या जाणार २६५२...औरंगाबाद   : येत्या खरीप हंगामात...
खानदेशात बाजरी मळणीचा हंगाम आटोपलाजळगाव  ः खानदेशात बाजरीचा मळणी हंगाम आटोपला...
धुळे, नंदुरबारमध्ये राष्ट्रीयीकृत...धुळे : धुळे व नंदुरबार जिल्हा बॅंकेने १२ हजारांवर...
कोल्हापुरात ‘पाणीबाणी’ची शक्यताकोल्हापूर : जिल्ह्यात वेळेवर पाऊस सुरू न झाल्यास...
आरग येथे नागिलीच्या पानांचे सौदे सुरूसांगली  ः कधीकाळी खाण्यासाठी वापरण्यात...
अकोला जिल्ह्यात २० टक्क्यांपर्यंत...अकोला :  आगामी खरीप हंगामासाठी जिल्ह्यात पीक...
नगर जिल्ह्यातील १२४ गावांचे पाणी दूषितनगर  : जिल्ह्यातील २६४५ गावांचे पाणीनमुने...
बुलडाणा जिल्हा कृषी विक्रेता संघटनेच्या...बुलडाणा ः जिल्हा कृषी विक्रेता संघटनेची १४...
निफाड तालुक्यात द्राक्षबागांच्या...नाशिक  : निफाड तालुक्यातील द्राक्षबागांमध्ये...
सोलापूर जिल्हा परिषद करणार ‘रोहयो’ची...सोलापूर ः जिल्हा परिषदेच्या वतीने यंदाच्या...
भूगर्भात पाणीसाठा टिकविण्यासाठी भूमिगत...भूमिगत बंधारा बांधण्याचे काम जमिनीखाली असल्याने...
सरकारने शेतकऱ्यांच्या समस्यांत टाकली...नागपूर ः दुष्काळी मदत नाही, कर्जमाफीच्या...
वडगाव येथील पाटबंधारे कार्यालयासमोर...वडगाव निंबाळकर, जि. पुणे  ः नीरा डावा...
पुणे बाजार समितीवर पुन्हा प्रशासकीय...पुणे : विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर पुणे बाजार...
अळिंबी उत्पादनातून केली संकटांवर मातलोणी (जि. जळगाव) येथील अनिल माळी यांच्याकडे कृषी...