agriculture news in marathi, Delhi HC dismisses Monsanto plea to enforce BT cotton seed patent | Agrowon

मोन्सॅंटोचा भारतातील पेटंट हक्क फेटाळला
पीटीआय
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

नवी दिल्ली : अमेरिकेतील मोन्सॅंटो कंपनीचा बीटी कापूस बियाण्यावरील भारतातील पेटंट हक्क दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. तीन भारतीय बियाणे कंपन्यांनी दाखल केलेल्या प्रतिदाव्यावर निकाल देताना उच्च न्यायालयाने हा निर्णय दिला.

दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश एस. रवींद्र भट आणि योगेश खन्ना यांच्या खंडपीठासमोर बुधवारी (ता.११) ही सुनावणी झाली. मोन्सॅंटो या अमेरिकी बहुराष्ट्रीय बियाणे कंपनीकडे भारतात बोंड अळीला प्रतिकारक बीटी कापूस बियाण्याचे पेटंट नसल्याचा दावा तीन भारतीय बियाणे कंपन्यांनी केला होता, तो काही प्रमाणात न्यायालयाने ग्राह्य धरला आहे.  

नवी दिल्ली : अमेरिकेतील मोन्सॅंटो कंपनीचा बीटी कापूस बियाण्यावरील भारतातील पेटंट हक्क दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. तीन भारतीय बियाणे कंपन्यांनी दाखल केलेल्या प्रतिदाव्यावर निकाल देताना उच्च न्यायालयाने हा निर्णय दिला.

दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश एस. रवींद्र भट आणि योगेश खन्ना यांच्या खंडपीठासमोर बुधवारी (ता.११) ही सुनावणी झाली. मोन्सॅंटो या अमेरिकी बहुराष्ट्रीय बियाणे कंपनीकडे भारतात बोंड अळीला प्रतिकारक बीटी कापूस बियाण्याचे पेटंट नसल्याचा दावा तीन भारतीय बियाणे कंपन्यांनी केला होता, तो काही प्रमाणात न्यायालयाने ग्राह्य धरला आहे.  

नूजिवीडू सीड्स, प्रभात ॲग्री बायोटेक आणि प्रवर्धन सीड्स या तीन भारतीय बियाणे कंपन्या असून, बीटी तंत्रज्ञान वापरण्यासंबंधी मोन्सॅंटो कंपनीसोबत त्यांनी करार केला होता. त्यानुसार या कंपन्यांना मोन्सॅंटो कंपनीला विशेष गुणधर्म वापरासाठीचे शुल्क (ट्रेट व्हॅल्यू) द्यावे लागत होते. मात्र सरकारने निश्चित केलेल्या मूल्यानुसारच ट्रेट व्हॅल्यू दिली जावी, असा निकाल एक न्यायाधीश असलेल्या खंडपीठाने दिला होता. परंतु मोन्सॅंटो कंपनीला मात्र सरकारने ठरवून दिलेल्या मूल्यापेक्षा अधिक शुल्क वाढवून हवे होते. 

मोन्सॅंटो कंपनीने यासंदर्भात उच्च न्यायालयात दोन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर आव्हान दिले होते, तर मोन्सॅंटो कंपनीकडे बीटी कापूस बियाण्यासाठी भारतात पेटंट नसल्याचे आणि चुकीची मान्यता मिळाल्याचे भारतीय बियाणे कंपन्यांनी आपल्या प्रतिदाव्यात म्हटले होते. दिल्ली उच्च न्यायालयाने भारतीय कंपन्यांचा हा दावा ग्राह्य धरीत मोन्सॅंटो कंपनीचा बीटी कपाशीसंबंधी पेटंट असल्याचा दावा फेटाळला  आहे. 

न्यायालयाने निकाल जाहीर केल्यानंतर मोन्सॅंटो कंपनीने सर्वोच्च न्यायालयात अपील करण्यासाठी निकालाला तात्पुरती स्थगिती देण्याची मागणी केली होती. यावर न्यायालयाने स्थगिती देण्यास नकार दिला, मात्र सर्वोच्च न्यायालयात अपील करण्यास परवानगी दिली.

इतर अॅग्रो विशेष
जलदगती मार्गाने निर्जलपर्वाकडे...‘‘पाण्याची उपलब्धता कमी होत जाणे हे हवामान बदलाचे...
पुढचं पाऊलप्र बोधन आणि संघर्षाच्या माध्यमातून गेली चौदा...
नोकरशहांच्या दुर्लक्षामुळे जल...राज्यात दुष्काळग्रस्त गावे वाढत असून, जलाशयांची...
ठिबक सिंचनातील आधुनिक तंत्रज्ञान : अरुण...राज्यात लागवडीखालील २२५ लाख हेक्टर क्षेत्रांपैकी...
परंपरागत जल व्यवस्थांचा संपन्न वारसा :...परंपरागत जल व्यवस्थांमधून घेण्याजोग्या आणि आजही...
कोरडवाहूचे जल व्यवस्थापन : चिपळूणकर,...पाण्याचे व्यवस्थापन हे केवळ बागायती पिकांसाठी...
फड पद्धतीमुळे झाला कायापालट : दत्ता...फड या जल व्यवस्थापन पद्धतीचे तंत्र अगदी सोपे आहे...
समन्यायी जल व्यवस्थापनाला पर्याय नाही...लोकशाहीकरण वा पुनर्संजीवक विकास ही फुकाफुकी...
डोळ्यांत अंजन घालणारी नागलीची कहाणी :...योग्य पीकपद्धती विकसित केली नाही तर जल व्यवस्थापन...
जल व्यवस्थापनाची सप्तपदी : नागेश टेकाळेनिसर्गदेवतेने दिलेला जलरूपी प्रसाद आज आपण तिने...
जल व्यवस्थापन हाच कळीचा मुद्दा... :...पर्यावरणातील बदल, दुष्काळ, मातीचे बिघडणारे आरोग्य...
जल व्यवस्थापनासाठी हवी लोकचळवळलक्षावधी हेक्टर जमीन, हजारो टीएमसी पाणी आणि...
चैत्र यात्रेनिमित्त भाविकांनी दुमदुमला...ज्योतिबा डोंगर, जि. कोल्हापूर  : ‘...
विदर्भात वादळी पावसाची शक्यतापुणे : पूर्वमोसमी पावसाच्या सरींमुळे...
‘ॲग्रोवन'चा आज १४वा वर्धापन दिन; जल...पुणे : लाखो शेतकऱ्यांच्या कुटुंबातील घटक बनलेल्या...
यंदा बीटी कापूस बियाणे मुबलक : कृषी...पुणे : राज्याच्या कापूस उत्पादक भागातील...
फलोत्पादन अनुदान अर्जासाठी शेवटचे चार...पुणे : एकात्मिक फलोत्पादन अभियानातून (एमआयडीएच)...
वीज पडून जाणारे जीव वाचवामागील जूनपासून सुरू झालेला नैसर्गिक आपत्तींचा कहर...
जल व्यवस्थापनाच्या रम्य आठवणीजलव्यवस्थापनाचे धडे घेण्यासाठी कुठलेही पुस्तक...
कापूस उत्पादकतेत भारताची पीछेहाटजळगाव ः जगात कापूस लागवडीत पहिल्या क्रमांकावर...