agriculture news in marathi, Demand for 9 6 thousand metric tonnes of fertilizers for Rabbi in Akola | Agrowon

अकोल्यात रब्बीसाठी ९६ हजार मेट्रिक टन खतांची मागणी
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 7 सप्टेंबर 2018

अकोला : या वर्षात जिल्ह्यात चांगला पाऊस आणि प्रकल्पांमध्ये साठा झाल्याने रब्बी हंगामाचे क्षेत्र वाढू शकते. हंगामात एक लाख ३० हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर रब्बी लागवड अपेक्षित धरली जात असल्याने जिल्हा परिषद कृषी विभागाने ९६ हजार मेट्रिक टन खतांची मागणी अायुक्तालयाकडे नोंदविली अाहे.

अकोला : या वर्षात जिल्ह्यात चांगला पाऊस आणि प्रकल्पांमध्ये साठा झाल्याने रब्बी हंगामाचे क्षेत्र वाढू शकते. हंगामात एक लाख ३० हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर रब्बी लागवड अपेक्षित धरली जात असल्याने जिल्हा परिषद कृषी विभागाने ९६ हजार मेट्रिक टन खतांची मागणी अायुक्तालयाकडे नोंदविली अाहे.

रब्बी हंगामाला पुढील महिन्यापासून जोरदार सुरवात होणार अाहे. शेतकरी सुरवातीलाच मूग, उडिदाची काढणी झाल्यानंतर रब्बीच्या लागवडीला लागतात. शिवाय सोयाबीनची काढणी झाल्यानंतर याला अधिक वेग येतो. जिल्ह्याचे रब्बीसाठी सरासरी एक लाख २ हजार ५२० हेक्टर क्षेत्र राहते. मागील वर्षी कमी पाऊस व प्रकल्पसुद्धा न भरल्याने रब्बीवर त्याचा थेट परिणाम झाला होता. लागवड ५० टक्क्यांपर्यंत सुद्धा पोचली नव्हती. यावर्षीची स्थिती वेगळी दिसत अाहे. पावसाने सरासरी गाठली. प्रकल्पसुद्धा भरल्याने रब्बीत सिंचनासाठी पाणी मिळणार हे निश्चित झाले अाहे. यामुळेच यंदाचा रब्बी हा सुमारे एक लाख ३० हजार हेक्टरपेक्षा अधिक राहील, अशी अपेक्षा यंत्रणांना वाटते अाहे.

जिल्ह्यात प्रामुख्याने हरभरा पिकाचे लागवड क्षेत्र सर्वाधिक असते. यानंतर गहू, रब्बी ज्वारीकडे शेतकरी वळतात.
वाढणारे अपेक्षित क्षेत्र पाहून बियाणे, खतांमध्ये वाढ केली जात अाहे. त्यामध्ये प्रामुख्याने युरिया २२ हजार मेट्रीकटन, डीएपी २० हजार, एसएसपी १८०००, १०ः२६ः२६ खताची ७ हजार मेट्रिक टनाची प्रमुख मागणी अाहे.  याशिवाय एमअोपी ५००० मेट्रीक टन, १६ः२०ः०ः१३ खताची ५०००  यासह इतर खते मिळून ९६००० मेट्रीक टनांची मागणी अायुक्तालयाकडे पाठवण्यात अाली अाहे. लवकरच याला मंजुरी मिळण्याची शक्यता अाहे.

दृष्टिक्षेपात 

  • सरासरी क्षेत्र-१ लाख २५२० हेक्टर
  • अपेक्षित लागवड-१ लाख ३० हजार हेक्टर
  • खताची मागणी -९६ हजार मेट्रिक टन

इतर बातम्या
नगर जिल्ह्यात ११५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर   : जिल्ह्यातील गाव-शिवारातील...
साताऱ्यात सोयाबीनच्या दरात सुधारणासातारा   ः जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात...
गुंजवणी प्रकल्पाच्या ‘सुप्रमा’मधील अटीत...मुंबई   : पुणे जिल्ह्याच्या वेल्हे...
सुरळीत वीजपुरवठ्यासाठी परभणीत भजन आंदोलनपरभणी  ः महावितरणच्या बोबडे टाकळी (ता. परभणी...
सरकार `एफआरपी`साठी बांधिल, जादा दरासाठी...सोलापूर   ः ऊसदराच्या आंदोलनाने राज्यभर...
परभणी जिल्ह्यात ज्वारीवर अमेरिकन लष्करी...परभणी ः परभणी जिल्ह्यात यंदा प्रथमच रब्बी...
‘जनावरं जगवायची धडपड सुरू हाय’सातारा ः शाळू (रब्बी ज्वारी) केलीय. पण पीक...
सोयापदार्थाच्या साह्याने कुपोषणाशी...कुपोषणाच्या समस्येशी सामना करण्यासाठी...
गिरणा धरणाचे पाणी जळगाव हद्दीत पोचलेजळगाव : रब्बी हंगामासाठी हतनूर धरणातून तीन, तर...
खानदेशात मका, ज्वारीवर लष्करी अळीजळगाव : खानदेशात मका, आगाप ज्वारीवर लष्करी अळीचा...
शेतीपंप वीजवापर घोटाळा आयोगाच्या...मुंबई ः महावितरणची प्रचंड वितरण गळती व चोऱ्या...
गोंदिया जिल्हा अधीक्षक अधिकारी बऱ्हाटे...गोंदिया ः नगर जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या...
ब्राझीलचे साखर उत्पादन निम्मे घटलेनवी दिल्ली ः आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे सतत...
सीड हब म्हणून भारताचा उदयनवी दिल्ली ः आशिया खंडात भारत देश ‘सीड हब’ म्हणून...
मालेगाव, सिन्नरसह आठ तालुक्यांत चारा...नाशिक : नाशिक जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अत्यंत कमी...
नांदेड जिल्ह्यात तीन पिकांना विमानांदेड : यंदाच्या रब्बी हंगामामध्ये पंतप्रधान...
राज्यात थंडी वाढली; नाशिक ११.५ अंशांवरपुणे : उत्तरेकडील थंड वाऱ्यांचे प्रवाह दक्षिणेकडे...
परभणीत चारा, वैरणीच्या दरात सुधारणा परभणी : जिल्ह्यात उद्भवलेल्या दुष्काळी...
‘भीमा'तर्फे प्रतिटन शंभर रुपयांचे वाटपसोलापूर : टाकळी सिकंदर (ता. मोहोळ) येथील भीमा...
फॉस्फोनिक रेसिड्यूमुळे डाळिंब निर्यात...पुणे : निर्यातक्षम डाळिंबात युरोपसाठी फॉस्फोनिक...