agriculture news in marathi, demand for action aginest sugar factories, mumbai, maharashtra | Agrowon

एफआरपी थकवलेल्या ११ कारखान्यांवर कारवाई करा : सदाभाऊ खोत
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 15 नोव्हेंबर 2018

मुंबई  : राज्यातील ११ साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांची गेल्या गाळप हंगामातील एफआरपीची १०२ कोटी ८६ लाखांची रक्कम थकवली आहे. कायद्यानुसार एफआरपी न देणाऱ्या या कारखान्यांवर सरकारने कारवाई करावी, अशी मागणी कृषी राज्यमंत्री तथा रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी मंगळवारी केली.

मुंबई  : राज्यातील ११ साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांची गेल्या गाळप हंगामातील एफआरपीची १०२ कोटी ८६ लाखांची रक्कम थकवली आहे. कायद्यानुसार एफआरपी न देणाऱ्या या कारखान्यांवर सरकारने कारवाई करावी, अशी मागणी कृषी राज्यमंत्री तथा रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी मंगळवारी केली.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने अलीकडेच उसाला एफआरपी अधिक २०० रुपये एकरकमी मिळावेत या मागणीसाठी आंदोलन केले. वास्तविक साखर कारखान्यांना कायद्यानुसार एफआरपी देणे बंधनकारक आहे. कारखान्यांनी एफआरपीची रक्कम दिली नाही, तर त्यांच्यावर कारवाई केली जाते. साखर कारखान्यांनी एफआरपी देणार नाही, असे कधीही म्हटले नव्हते. त्यामुळे ‘स्वाभिमानी’ने केलेले आंदोलन हे शेतकऱ्यांच्या डोळ्यांत धूळफेक करणारे होते. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘स्वाभिमानी’ने हे आंदोलन केल्याची टीकाही श्री. खोत यांनी खासदार राजू शेट्टी यांचे नाव न घेता केली.

सदाभाऊ खोत यांनी या वेळी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या संदर्भात संघटनेची भूमिका स्पष्ट केली. गेल्या महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या परिषदेत साखरेचा किमान दर प्रतिकिलो २९ रुपयांवरून ३२ रुपये करण्याची मागणी करण्यात आली. ही मागणी मान्य झाली तर शेतकऱ्यांना एफआरपीपेक्षा २०० ते २५० रुपये अधिकचे मिळू शकणार आहेत. आमच्या संघटनेने जी मागणी केली त्याच मागणीसाठी ‘स्वाभिमानी’ने आंदोलन केले. साखरेला जादा दर मिळाला तर अधिकचे २०० रुपये देणे शक्य असल्याचे कारखान्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे ‘स्वाभिमानी’चे आंदोलन हे फार्स होते, असे श्री. खोत म्हणाले.

साखर उताराच्या संदर्भात ‘स्वाभिमानी’ने घेतलेली भूमिका ही अज्ञानपणाची आहे. केंद्राने ९.५ टक्के साखर उताऱ्याचा बेस बदललेला नाही. गेल्या वर्षी साडेनऊ टक्के उताऱ्याला २ हजार २५० रुपये दर होता, तो या वर्षी २ हजार ६१२ रुपये आहे. तर १० टक्के साखर उतारासाठी २ हजार ७५० रुपये दर असल्याचे खोत यांनी सांगितले. ‘स्वाभिमानी’च्या आंदोलनाला शेतकऱ्यांचा प्रतिसाद लाभला नसल्याने नेत्यांना आंदोलनातून पळ काढावा लागल्याचे श्री. खोत म्हणाले.

इतर ताज्या घडामोडी
जिवाणूंमुळे होतो फुफ्फुसाच्या...फुफ्फुसाच्या ट्यूमरच्या विकासामध्ये तेथील...
पाणीटंचाईची ऊस लागवडीला झळपुणे :ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या...
नगर जिल्हा परिषदेचे उद्या अंदाजपत्रकनगर : जिल्हा परिषदेची अंदाजपत्रकीय विशेष सभा...
सौरपंपांपासून साडेचार हजार शेतकरी वंचितजळगाव : मुख्यमंत्री सौरकृषिपंप योजनेच्या लाभासाठी...
सौर कृषिपंप योजनेच्या लाभार्थ्यांचा...सोलापूर : शेतकऱ्यांना सौरऊर्जेद्वारे दिवसाही...
औरंगाबादेत द्राक्ष प्रतिक्विंटल ३५०० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
शिवसेना-भाजपचे युतीच्या दिशेने पुढचे...मुंबई: लोकसभा निवडणुकीतील युतीसाठी शिवसेना-...
किमान तापमानात वाढ, उन्हाळी हंगामास...महाराष्ट्रावर १०१४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...
पुणे विभागात हरभऱ्याची ४९ टक्केच पेरणीपुणे : पावसाळ्यात कमी पावसामुळे जमिनीत पुरेशी ओल...
शाळांमधील ४९८ खोल्या धोकादायकपुणे : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने...
मराठवाड्यात रब्बी पिकांची वाढ खुंटलीऔरंगाबाद : पाण्याचा ताण, तापमानातील चढउतार यामुळे...
अमरावतीत तूर, कापसाला मिळेना भावअमरावती : चीनकडून भारतीय सोयाबीनला वाढती...
गुलाब उत्पादकांच्या कष्टाला मिळाले फळ नाशिक : दुष्काळी परिस्थिती, कमी असलेला भाव,...
लोकसभेसाठी माढ्यातून तुल्यबळ उमेदवारकऱ्हाड : लोकसभेसाठी माढा मतदारसंघात भारतीय जनता...
उपोषणासाठी बाजार समित्यांच्या...नाशिक : नियमनमुक्तीमुळे बाजार समित्यांचे...
परभणीतील शेतकऱ्यांचे कोल्हापुरात आंदोलनकोल्हापूर : परभणी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त...
युवकांच्या सहकारी संस्था स्थापणार :...कऱ्हाड : राज्यातील सहकारी संस्थांचे सभासद हे ६०...
बाजार समित्यांमधील...नाशिक : तेलंगण, तमिळनाडू व कर्नाटकच्या धर्तीवर...
पुलवामातील हल्ल्यात बुलढाणा जिल्ह्याचे...बुलडाणा : पुलवामा येथे झालेल्या अतिरेकी ...
हल्ल्या मागे जे आहेत त्यांना शिक्षा...नवी दिल्ली : जम्मू-काश्‍मीरच्या पुलवामा...