agriculture news in marathi, demand for activate milk adulteration system, nagar, maharashtra | Agrowon

दूध भेसळ प्रतिबंधक योजना सक्रिय करा : गुलाबराव डेरे
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 3 जुलै 2018

नगर : राज्यात दूध व्यवसाय मोडकळीस येत आहे. राज्यातील टोन्ड दूध अनैसर्गिक आहे. अशा दुधामुळे पन्नास टक्के ग्राहक कमी झालेले आहेत. सरकारने दूध व्यवसायाला ऊर्जितावस्था आणण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. लोकांना दुधाबाबत विश्‍वास निर्माण करण्यासाठी भेसळ प्रतिबंधक उपाययोजना सक्रिय कराव्यात आणि दूध पावडरीची निर्यात सुरू करावी, अशी मागणी कल्याणकारी दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष गुलाबराव डेरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

नगर : राज्यात दूध व्यवसाय मोडकळीस येत आहे. राज्यातील टोन्ड दूध अनैसर्गिक आहे. अशा दुधामुळे पन्नास टक्के ग्राहक कमी झालेले आहेत. सरकारने दूध व्यवसायाला ऊर्जितावस्था आणण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. लोकांना दुधाबाबत विश्‍वास निर्माण करण्यासाठी भेसळ प्रतिबंधक उपाययोजना सक्रिय कराव्यात आणि दूध पावडरीची निर्यात सुरू करावी, अशी मागणी कल्याणकारी दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष गुलाबराव डेरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

श्री. डेरे यांनी निवेदनात म्हटले आहे, की राज्यातील लोकसंख्येचा विचार करता सुमारे साडेचार कोटी लिटर दुधाची गरज आहे. मात्र, सध्या केवळ २ कोटी लिटर दुधाची निर्मिती होत आहे. बाहेरील राज्यातून ३० लाख लिटर दूध येते. तरीही दूध जास्तीचे झाले आहे. याचा अर्थ लोकांनी दुधाचे सेवन बंद केले आहे. जवळपास ५० टक्के लोकांनी दुधाकडे दुर्लक्ष केले आहे. राज्यात टोन्ड दूध अनैसर्गिक आहे. अशा दुधामुळे पन्नास टक्के ग्राहक कमी झाले आहेत.

राज्यात सध्या कर्नाटकातून जवळपास २५ लाख लिटर, तर गुजरातमधून पाच लाख लिटर दूध येते. राज्यातील दूध उत्पादकांचे हाल सुरू असताना परराज्यातील दूध संस्था मात्र येथे लूट करत आहेत. त्याला आवर घालण्यासाठी परराज्यातून येणाऱ्या दुधाला कर लावावा. शासनाची दूध खरेदी २७ रुपये लिटर असताना हेच दूध ग्राहकाला ४० ते ५० रुपये लिटरने विकले जाते. विविध योजनांमधून दुभत्या गायींचे वाटप करता; मग दुधाला दर कोण देणार, असा प्रश्‍न गुलाबराव डेरे यांनी उपस्थित केला आहे.

गुलाबराव डेरे म्हणाले, की राज्यात वेगवेगळ्या ब्रॅंडने दूध विक्री होते. सध्या जवळपास साडेतीनशे दुधाच्या ब्रॅंडची स्पर्धा चालू आहे. त्यातून चांगल्या प्रतीचे दूध मिळेलच याची खात्री नसते. लोकांमध्ये दुधाबाबत विश्‍वास राहिला नाही. प्रत्येक ब्रॅंडच्या दुधाची किंमत वेगळी आहे. लोकांचा विश्‍वास संपादन करण्यासाठी ब्रॅंडची संख्या कमी करावी.

इतर ताज्या घडामोडी
भाजीपाला पिकांची रोपवाटिका तयार करतानाभाजीपाला पिकांची रोपवाटिका करताना योग्य ती काळजी...
परभणीत फ्लाॅवर प्रतिक्विंटल २००० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...
पुण्यात फुलांची ७ काेटींची उलाढालपुणे ः फूल उत्पादक शेतकऱ्यांची भिस्त असणाऱ्या...
योग्य प्रमाणातच वापरा युरियानत्र पानांच्या पेशीमध्ये हरित लवकाची निर्मिती...
वनस्पतीतील संजीवकांमुळे अवकाशातही...पोषक घटकांची कमतरता आणि गुरुत्वाकर्षण कमी असणे या...
राज्यातील काही भागात अंशतः ढगाळ वातावरणमहाराष्ट्राच्या पश्‍चिम किनारपट्टीवर म्हणजेच कोकण...
सांगली जिल्हा बॅंकेला कर्जमाफीसाठी...सांगली ः राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज...
गूळ, बेदाणा, काजू महोत्सवास पुणे येथे...पुणे : दिवाळीच्या निमित्ताने ग्राहकांना रास्त...
'सरकारला दुष्काळाची दाहकता लक्षात येईना'पुणे  : यंदा ऑक्टोबर महिन्यातच धरणांमधील...
कर्नाटकात दुष्काळ जाहीर, मग...मुंबई  : ग्रामीण महाराष्ट्र दुष्काळात...
ऊसतोड मजूर महामंडळाला शंभर कोटींचा निधी...बीड   : याआधीच्या सरकारने दहा वर्षांत अडीच...
हिवरेबाजारमध्ये मांडला पाण्याचा ताळेबंदनगर  ः आदर्श गाव हिवरेबाजारमध्ये...
माण, खटाव तालुक्यांत पाणीटंचाई वाढलीसातारा   ः रब्बी हंगामाच्या तोंडावर पाऊस...
पुणे जिल्ह्यात खरिपात ६९ टक्के पीक...पुणे ः यंदा पाऊस वेळेवर न झाल्याने शेतकऱ्यांकडून...
बुलडाणा जिल्ह्यात १ लाख ६५ हजार...बुलडाणा  ः या रब्बी हंगामात जिल्ह्यात एक लाख...
यवतमाळ जिल्ह्यात जिल्हा प्रशासन उभारणार...यवतमाळ  ः शेतीला पूरक व्यवसायाची जोड देत...
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...