agriculture news in marathi, demand for cancellation of sugarcane price reduction, satara, maharashtra | Agrowon

ऊसदरातील कपात रद्द करण्याची साताऱ्यातील शेतकऱ्यांची मागणी
टीम अॅग्रोवन
रविवार, 25 फेब्रुवारी 2018
सातारा  ः साखरेच्या दरात घसरण झाल्यामुळे जिल्ह्यातील अनेक कारखान्यांनी जाहीर केलेल्या ऊसदरात १५० ते २५० रुपयांनी कपात केली होती. बाजारपेठेत सध्या साखरेच्या दरात सुधारणा झाली आहे. सध्या साखरेस क्विंटलला ३१०० ते ३२०० दर मिळत आहे. यामुळे कारखान्यांकडून ऊसदरात करण्यात येत असलेली कपात रद्द करून पूर्ववत ऊसदर देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. 
 
सातारा  ः साखरेच्या दरात घसरण झाल्यामुळे जिल्ह्यातील अनेक कारखान्यांनी जाहीर केलेल्या ऊसदरात १५० ते २५० रुपयांनी कपात केली होती. बाजारपेठेत सध्या साखरेच्या दरात सुधारणा झाली आहे. सध्या साखरेस क्विंटलला ३१०० ते ३२०० दर मिळत आहे. यामुळे कारखान्यांकडून ऊसदरात करण्यात येत असलेली कपात रद्द करून पूर्ववत ऊसदर देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. 
 
सातारा जिल्ह्यात नऊ सहकारी व सहा खासगी कारखान्यांचा गाळप हंगाम सुरळीत सुरू आहे. या हंगामाच्या सुरवातीस पहिल्या हप्त्याबाबत वाद होऊ नये, यासाठी प्रशासनाने शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी व साखर कारखान्यांचे प्रतिनिधी यांच्यात बैठक घेऊन ऊसदराबाबत तोडगा काढला होता. कोल्हापूर पॅटर्नप्रमाणे एफआरपी अधिक २०० रुपये या प्रमाणे दर देण्याचे ठरले होते. हा तोडगा बैठकीस असलेल्या सर्व कारखान्यांच्या प्रतिनिधींनी मान्य केला होता.
 
त्यानुसार पहिल्या पंधरवड्यात गाळप झालेल्या उसाचे पैसेही अदा करण्यात आले होते; मात्र मागील महिनाभरात साखरेच्या दरात घसरण होऊन ते २९०० रुपयांच्या दरम्यान आले होते. यामुळे जिल्ह्यातील अनेक कारखान्यांनी पहिल्या उचलीमध्ये २०० ते ३०० रुपयांची कपात केली होती. काही कारखान्यांनी सर्व बिले थांबविण्याचा प्रकार सुरू केला होता.
 
साखरेच्या दरातील घसरणीमुळे साखर हंगाम अडचणीत आल्याने केंद्र सरकारने आयात शुल्क वाढविण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे साखरेचे घसरलेल्या दरात वाढ होऊन क्विंटलला ३१०० ते ३२०० रुपये दर मिळू लागला आहे. सध्या साखरेस मिळत असलेल्या दराप्रमाणे बॅंकाकडून उचल मिळत आहे. यामुळे जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी पूर्वी जाहीर केलेल्या हप्त्याप्रमाणे सध्या जात असलेल्या उसाला दर द्यावा, अशी मागणी शेतकरी करू लागले आहेत. जिल्ह्यात मंगळवारपर्यंत (ता. २०) ६२ लाख २९ हजार ८१६ टन ऊस गाळपाद्वारे ७२ लाख २८ हजार ५१५ क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. 
 
साखरेचे दर वाढण्यासाठी तसेच त्यात स्थिरता राहण्यासाठी साखर निर्यात धोरणास चालना देणे गरजेचे आहे. सध्या वाढलेले दर व विक्रीची मर्यादामुळे दर कसे राहतील याबाबत कारखानदारांमध्ये साशंकता आहे. साखरेच्या दरातील सुधारणेसाठी सध्या उत्पादित होत असलेली साखर निर्यात करण्यासाठी शासाकडून अनुदान देणे गरजेचे आहे. साखर निर्यात केल्याने स्टॉक मर्यादित राहण्यास व दर टिकण्यास मदत होणार असल्याचे कारखानदारांकडून सांगितले जात आहे.

इतर ताज्या घडामोडी
I transfer my JOSH to you...पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी...
जीवलग मित्र गेला...मनोहर गेला. हे जरी सत्य असले तरी ते मान्य होणे...
जबरदस्त, प्रभावी इच्छाशक्तीचे केंद्र :...लहानपणापासूनच कुठलीही गोष्ट एकदा ठरवली की, तो ती...
तळपत्या सूर्याचा अस्त !राजकारणी माणसाला यश आणि अपयशाचा सामना रोजच करावा...
विदर्भात कापूस पोचला प्रतिक्विंटल ५९१५...नागपूर ः शेतकऱ्यांकडील कापूस संपल्यापनंतर आता...
पुणे बाजारात घेवडा, मटारच्या भावात वाढपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
पुणे जिल्ह्यात शेतकरी सन्मान योजनेच्या...पुणे : केंद्र सरकारने पंतप्रधान शेतकरी सन्मान...
हिंगोलीतील २७ हजार लोकसंख्या पाण्यासाठी...हिंगोली ः हिंगोली जिल्ह्यात उद्भवलेल्या दुष्काळी...
खानदेशात चारा प्रश्‍न गंभीरजळगाव ः खानदेशात सद्यःस्थितीत निर्माण झालेल्या...
दुष्काळमुक्त मराठवाड्याचा संकल्प ः...औरंगाबाद: पन्नास टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात...
छपन्न इंचीच्या छातीच्या गप्पा कशाला?ः...चाकण, जि. पुणे: देशाचे पंतप्रधान देश माझ्या मुठीत...
योग्य पद्धतीनेच करा बांबू तोडणीपरिपक्व बांबू हा दरवर्षी तोडला पाहिजे, तरच त्याला...
औरंगाबादला कैरी प्रतिक्विंटल ३५०० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
कृषी क्षेत्रात निर्मिती उद्योगाच्या...अकोला : कृषी क्षेत्रात बायोफर्टिलायजर,...
खानदेशात भुईमूग पीक जेमतेमजळगाव : भुईमुगाचे पीक खानदेशात जेमतेम आहे. त्याचे...
सोलापूर जिल्हा बॅंकेतही मिळणार ‘सन्मान...सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचा...
लाल कांद्याच्या दरात सुधारणाजळगाव : लाल कांद्याची जळगावसह धुळे, साक्री येथील...
प्रस्तावित सुरत-हैदराबाद...नाशिक : केंद्राच्या भारतमाला योजनेंतर्गत...
शेवगाव, पाथर्डीत शेळ्या-मेंढ्यांच्या...शेवगाव, जि. नगर : दुष्काळी परिस्थितीत सरकारने...
सांगलीचा प्रश्‍न दिल्लीदरबारीसांगली ः सांगली लोकसभा मतदारसंघ स्वाभिमानीला...