agriculture news in marathi, Demand for change in market committee law, draft to law department | Agrowon

बाजार समिती कायदा बदल मसुदा, विधी विभागाला सादर
टीम अॅग्रोवन
रविवार, 28 जानेवारी 2018

पुणे : केंद्र सरकारच्या नवीन मॉडेल ॲक्ट २०१७ नुसार राज्यातील बाजार समित्यांना राष्‍ट्रीय बाजाराचा दर्जा (मार्केट यार्ड आॅफ नॅशनल इम्पाॅरंट्स) देण्याबाबतच्या कायद्यातील बदलाचा मसुदा विधी व न्याय विभागाला सादर करण्यात आला आहे. यामुळे येत्या पावसाळी अधिवेशनात राज्यातील पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर या बाजार समित्यांना राष्ट्रीय बाजाराचा दर्जा मिळण्याची शक्यता आहे. याबराेबरच विविध पणन सुधारणांचा मसुदादेखील पणन संचालनालयाकडून विधी व न्याय विभागाला सादर करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

पुणे : केंद्र सरकारच्या नवीन मॉडेल ॲक्ट २०१७ नुसार राज्यातील बाजार समित्यांना राष्‍ट्रीय बाजाराचा दर्जा (मार्केट यार्ड आॅफ नॅशनल इम्पाॅरंट्स) देण्याबाबतच्या कायद्यातील बदलाचा मसुदा विधी व न्याय विभागाला सादर करण्यात आला आहे. यामुळे येत्या पावसाळी अधिवेशनात राज्यातील पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर या बाजार समित्यांना राष्ट्रीय बाजाराचा दर्जा मिळण्याची शक्यता आहे. याबराेबरच विविध पणन सुधारणांचा मसुदादेखील पणन संचालनालयाकडून विधी व न्याय विभागाला सादर करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

केंद्राकडून राज्यांना पणन सुधारणा सुचविण्यात आल्या आहेत. यासाठी केंद्राने राज्यांना ॲग्रिकल्चर प्राेड्यूस ॲँड लाइव्हस्टॉक मार्केटिंग (प्रमाेशनअ ॲँड फॅसिलिटेशन) २०१७ हा नवीन मॉडेल ॲक्ट सादर केला आहे. यामध्ये फळे, भाजीपाला नियमनमुक्ती, शेतकऱ्यांना थेट मतदानाचा अधिकार यांसह ज्या बाजार समित्यांमध्ये एकूण शेतमालाच्या आवकेमध्ये शेजारील कमीत कमी दाेन राज्यांतून ३० टक्के शेतमालाची आवक हाेत असेल, अशा बाजार समित्यांना राष्ट्रीय कृषी बाजार घाेषित करण्यात येणार आहे.

यासाठीची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, कायद्यातील बदलांबाबत आणि विविध पणन सुधारणांबाबत पणन संचालक डॉ. आनंद जाेदगंड यांनी नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांना सादरीकरण केले. यानंतर विविध कायदा बदलांचे मसुदे विधी व न्याय विभागाला सादर करण्याची प्रक्रिया सुरू असून, राष्ट्रीय कृषी बाजाराचा मसुदा सादर केल्याचे समजते.

या मसुद्याला विधी व न्याय विभागाकडून मंजुरी दिल्यानंतर, मंत्रिमंडळाची मंजुरी घेऊन, विधानसभा व विधान परिषदेमध्ये मंजुरी घ्यावी लागणार आहे. यानंतर राज्यपालांच्या सहीने या बदलांना मंजुरी मिळणार असून पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर बाजार समित्यांना राष्ट्रीय बाजार घाेषित करण्यात येईल. येत्या ६ महिन्यांत ही प्रक्रिया पूर्ण हाेईल, असे पणन संचालनालयातील सूत्रांनी सांगितले.

राजकीय वर्चस्व येणार संपुष्टात
नवीन बदलांमुळे बाजार समित्यांवरील राजकीय वर्चस्व संपुष्टात येणार असून, बाजार समितीच्या अध्यक्षपदी सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. तर संचालकपदी नगर विकास विभागासह सहकार, पणन, कृषी, आदी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. तर शेतकरी प्रतिनिधी म्हणून तीन सदस्यांची नियुक्ती हाेणार आहे.

 

इतर ताज्या घडामोडी
पेरूबागेसाठी सघन लागवडीचे तंत्रपेरू बागेमध्ये उत्पादकता वाढवण्यासाठी सघन...
जळगाव बाजार समितीकडून आवाराबाहेर...जळगाव : फळे-भाजीपाला नियमनमुक्तीनंतर बाजार समिती...
जीएम ई. कोलाय जैवइंधननिर्मितीसाठी...जैवइंधनाच्या निर्मितीसाठी जनुकीय तंत्रज्ञानाने...
पुणे विभागात पाणीटंचाई वाढतेयपुणे : वाढत्या उन्हाबरोबरच पुणे विभागातील...
जळगाव जिल्ह्यातील पाणीटंचाई होतेय भीषणजळगाव  ः जिल्ह्यातील पश्‍चिम पट्ट्यात...
गनिमी काव्याने राष्ट्रीय किसान...नाशिक : राष्ट्रीय किसान महासंघातर्फे...
बीड जिल्ह्यात एक लाख क्विंटल तुरीचे...बीड  : शासनाने नाफेडमार्फत केलेल्या तूर...
पुणे जिल्ह्यात भात लागवडीसाठी...पुणे: जिल्ह्यातील भातपट्ट्यातील शेतकऱ्यांनी खरीप...
शिवसेना-भाजपच्या कुरघोडीने युतीवरचे...मुंबई : विधान परिषदेच्या सहा जागांसाठी राज्यातील...
पीककर्ज वाटप सुरू करण्याची स्वाभिमानीची...परभणी : उत्पादनात घट आल्यामुळे तसेच...
सांगली जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसांगली : जिल्ह्यातील ताकारी, म्हैसाळ आणि टेंभू...
नांदेड विभागातील साखर कारखान्यांची...नांदेड : नांदेड विभागातील परभणी, हिंगोली, नांदेड...
नवीन ९९ लाख लाभार्थी घेतील...मुंबई : राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत आता...
नगर जिल्ह्यातील सहा ठिकाणी हरभरा खरेदी...नगर  ः खरेदी केलेला हरभरा साठवणुकीसाठी जागा...
शेतकऱ्याने तयार केली डिझेलवरची बाईकसांगली : वाढत्या पेट्रोलच्या सुटकेसाठी...
शेतकऱ्यांना फसविणारे विक्रेते,...सोलापूर : शेतकरी केंद्रबिंदू मानून...
धुळे जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस...धुळे : जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस लागवडीची...
जळगाव जिल्ह्यात खरिपासाठी मुबलक खतेजळगाव : जिल्ह्यात आगामी खरिपासाठी शेतकऱ्यांची...
सोलापुरात गाजर, काकडीचे दर वधारले,...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
कारखान्यांनी थकीत `एफआरपी' त्वरीत...सोलापूर : जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी थकवलेले...