Agriculture News in Marathi, Demand conduct inquiry of krishisevak recruitment scam, maharashtra | Agrowon

कृषिसेवक भरतीचा तपास सीआयडीकडे द्या
टीम अॅग्रोवन
बुधवार, 22 नोव्हेंबर 2017

पुणे : राज्यात झालेल्या कृषिसेवक भरती गैरव्यवहाराच्या विरोधात कृषी खात्याने मॅटसमोर खरी बाजू मांडलीच नाही. तसेच, पोलिस तपासदेखील संशयास्पद रेंगाळला आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी सीआयडीकडून व्हावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य तांत्रिक कीड-रोग सर्वेक्षक संघटनेने केली आहे.

राज्याच्या कृषी विभागाचे प्रधान सचिव बिजयकुमार आणि कृषी आयुक्त सच्चिंद्र प्रताप सिंह यांच्याकडे कीड सर्वेक्षकांनी लेखी मुद्दे मांडले आहेत. कृषी सेवक भरती प्रक्रियेतील सर्व हालचाली संशयास्पद असल्याचे कीडसर्वेक्षकांनी नमूद केले आहे.

पुणे : राज्यात झालेल्या कृषिसेवक भरती गैरव्यवहाराच्या विरोधात कृषी खात्याने मॅटसमोर खरी बाजू मांडलीच नाही. तसेच, पोलिस तपासदेखील संशयास्पद रेंगाळला आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी सीआयडीकडून व्हावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य तांत्रिक कीड-रोग सर्वेक्षक संघटनेने केली आहे.

राज्याच्या कृषी विभागाचे प्रधान सचिव बिजयकुमार आणि कृषी आयुक्त सच्चिंद्र प्रताप सिंह यांच्याकडे कीड सर्वेक्षकांनी लेखी मुद्दे मांडले आहेत. कृषी सेवक भरती प्रक्रियेतील सर्व हालचाली संशयास्पद असल्याचे कीडसर्वेक्षकांनी नमूद केले आहे.

गैरव्यवहारामुळे कृषिसेवक परीक्षा वादग्रस्त ठरली व ७३० उमेदवारांची निवड यादी शासनाला रद्द करावी लागली होती. ही भरती भारांकन पद्धतीने करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला होता. मात्र, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायायधीकरण अर्थात मॅटने भारांकन भरतीच्या विरोधात निकाल दिला व आधीची निवड यादी कायम केली आहे.

भरतीसाठी घेतलेल्या परीक्षेतील मूळ उत्तरपत्रिका व कार्बन उत्तरतालिकांची तपासणी न्यायवैद्यक प्रयोशाळेकडून करावी, गैरमार्गाने उत्तीर्ण होणारी परीक्षार्थी आणि त्यासाठी भ्रष्टाचाराचा मार्ग दाखविणारे अधिकारी यांच्यावर कडक कारवाई करावी, फेरपरीक्षा घ्यावी व कृषिसेवकांना रुजू करून घेण्याची संशयास्पद प्रक्रिया थांबवावी, असे कीड सर्वेक्षकांचे म्हणणे आहे.

कृषी आयुक्तालयातील एका अधिकाऱ्यावर या भरतीप्रकरणी लाच घेतल्याचा गुन्हा दाखल झालेला आहे. तसेच, आस्थापना सहसंचालकांनीदेखील महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे. या परीक्षेत लक्षावधी रुपयांची उलाढाल झाली असून, कृषी खात्याची प्रतिमा त्यामुळे मलिन झाल्याचे कीड सर्वेक्षकांनी स्पष्ट केले आहे.

या दोन्ही प्रकरणांचा तपास लावण्यात पोलिसांना अपयश आलेले आहे. दुसऱ्या बाजूला अधिकाऱ्यांनी स्वतःच एक समिती स्थापन करून स्वतःलाच क्लीनचिट देण्याचा प्रकार घडवून आणला आहे. कृषिमंत्र्यांनी या परीक्षेत गैरव्यवहार झाल्याचे विधिमंडळात जाहीर केल्यानंतरदेखील नव्याने भरती केली जात नाही. यात काही अधिकारी व एजंट गुंतल्यामुळे तपास सीआयडीकडे दिल्यास आतापर्यंतचे सर्व गैरव्यवहार उघड होतील, असे कीड सर्वेक्षकांनी म्हटले आहे.

इतर ताज्या घडामोडी
ऊस गाळपात इंदापूर कारखान्याची आघाडी पुणे  : जिल्ह्यात सर्व १७ साखर कारखान्यांनी...
निवडणुकीमुळे चाराटंचाईकडे दुर्लक्ष;...पुणे  : निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना...
नाशिक जिल्ह्यात चारा छावण्यांसाठी...नाशिक  : जिल्ह्यातील टंचाईच्या झळा तीव्र होत...
सभा मोदींची; प्रशासनाने घेतली...नाशिक : लोकसभा उमेदवारांच्या प्रचारार्थ २२ एप्रिल...
नगर : पशुधन वाचविण्यासाठी इतर...नगर : जिल्ह्यात २८ लाख लहान-मोठे जनावरे आहेत....
सौर कृषिपंप योजना खोळंबलीजळगाव : सौर कृषिपंपासाठी खानदेशातून ८ हजार ९५०...
मराठवाड्यात पाणीपुरवठ्यासाठी २३५९ टँकरऔरंगाबाद : मराठवाड्यात दुष्काळामुळे होणारी...
नत्र ऱ्हास रोखण्यासोबत वाढवता येईल...शेतकरी आपल्या मक्याच्या उत्पादनांचा अंदाज...
खानदेशात पाणंद रस्त्यांची कामे ठप्पजळगाव : खानदेशात जानेवारीत मंजुरी मिळालेल्या,...
म्हैसाळची विस्तारित योजना पूर्ण करणार...जत, जि. सांगली : ‘‘जत तालुक्याच्या पूर्व भागाला...
पुणे विभागात रब्बी कांद्याचे ३६ लाख टन...पुणे   ः रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी...
गारपीट, वादळी पावसाने पुणे जिल्ह्याला...पुणे  : जिल्ह्याच्या उत्तर भागात असलेल्या...
जळगावात आले प्रतिक्विंटल २००० ते ६५००...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता...
अवकाळी पावसाने वऱ्हाडात दाणादाणअकोला   ः वऱ्हाडातील अनेक भागात...
नगर जिल्ह्यातील १२८ गावांत दूषित पाणीनगर  : ‘सर्वांना शुद्ध पाणी’ यासाठी सरकार...
आमच्या काळात एकही घोटाळा नाही :...सोलापूर : काँग्रेस आघाडी देशाला मजबूत करू...
सातारा जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी...सातारा : जिल्ह्यात मंगळवारी सकाळपासून ढगाळ...
बहुपयोगी नत्रयुक्त खत `कॅल्शिअम...सावकाश उपलब्ध होण्याच्या क्षमतेमुळे कॅल्शियम...
जल, मृद्‌संधारणासाठी पूर्वमशागत...जमिनीमध्ये चांगले पीक उत्पादन येण्याकरिता भौतिक,...
कृषी सल्ला : भुईमूग, आंबा पीक भुईमूग शेंगा अवस्था भुईमूग पीक आऱ्या...