agriculture news in marathi, Demand for construction of dams on Girna river | Agrowon

गिरणा नदीवर बंधारे बांधण्याची मागणी
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 6 डिसेंबर 2018

जळगाव : केळी उत्पादनात भडगाव, कजगाव अग्रेसर होते. लिंबू बागाही या ठिकाणी वाढल्या. कांदेबाग केळी उत्पादनात गिरणाकाठच्या गावांनी वेगळी ओळख निर्माण केली; परंतु आजघडीला या दोन्ही तालुक्‍यांमधील केळी, लिंबाची शेती अपुऱ्या जलस्रोतांमुळे संकटात सापडली आहे. लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन गिरणा नदीत कमी खर्चात मजबूत बंधारे बांधावेत, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे.

जळगाव : केळी उत्पादनात भडगाव, कजगाव अग्रेसर होते. लिंबू बागाही या ठिकाणी वाढल्या. कांदेबाग केळी उत्पादनात गिरणाकाठच्या गावांनी वेगळी ओळख निर्माण केली; परंतु आजघडीला या दोन्ही तालुक्‍यांमधील केळी, लिंबाची शेती अपुऱ्या जलस्रोतांमुळे संकटात सापडली आहे. लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन गिरणा नदीत कमी खर्चात मजबूत बंधारे बांधावेत, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे.

गिरणा नदीवरील बलून बंधारे स्वप्नवत ठरले. तत्कालीन खासदार एम. के. अण्णा पाटील यांनी त्यासंबंधी चर्चा सुरू केली. ती गेल्या २० वर्षांपासून सुरूच आहे; पण बंधारे झाले नाहीत. लोकप्रतिनिधींकडे आटते जलस्रोत व लिंबू, केळी बागांची समस्या मांडल्यानंतर ते बलून बंधारे होत असल्याचे उत्तर देतात. हे बंधारे होईपर्यंत भडगाव तालुक्‍यातील बात्सर गावानजीक गिरणा नदीत १० ते १२ फुटी सिमेंटचा बंधारा बांधावा, जळगाव तालुक्‍यात कानळदानजिक ही असा बंधारा बांधावा, अशी मागणी होत आहे.

बात्सर नजीकच्या बंधाऱ्याचा लाभ खेडगाव, वाडे, गुढेपर्यंत पोचू शकतो. या भागातील २० गावांना त्याचा कमी अधिक लाभ होईल. लिंबू, केळीची शेती वाढू शकेल. कानळदानजीकच्या बंधाऱ्याचा नांद्रा बुद्रुक, चांदसर, दोनगाव, टहाकळी, भुलपाट, आव्हाणी, खेडी खुर्द, आव्हाणे, लाडली, नंदगाव, कुवारखेडे आदी गावांना फायदा होईल. ही गावे गिरणा नदीलगत आहेत. मात्र नदीत पाणी साचत नाही. ते वाहून जाते. विहिरी, कूपनलिकांमधून उपसा सुरू असतो. यामुळे फेब्रुवारीतच जलस्रोत आटतात. बंधारे झाल्यास पाणी टिकून राहील. यंदा कमी पावसामुळे शेतकऱ्यांनी पदरचे पैसे खर्च करून वाळूचे बंधारे दोनगाव, आव्हाणीजवळ बांधले. मात्र, कायमस्वरूपी बंधारे होण्याची गरज असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

इतर ताज्या घडामोडी
जळगावात दादरला ३१०० रुपयांपर्यंत दरजळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दादरची (...
भारतीयांच्या पचनसंस्थेतील...भारतीय लोकांच्या पचनसंस्थेमध्ये कार्यरत...
अमरावती विभागाला पाणीटंचाईच्या झळाबुलडाणा : कमी पावसामुळे अमरावती विभागातील...
तूर विक्रीच्या नोंदणीकडे शेतकऱ्यांची...अकोला  : या हंगामात शेतकऱ्यांनी पिकविलेल्या...
शेतकरी, जवान अडचणीत : भुजबळनाशिक : सध्याच्या सरकारच्या काळात देशातील...
दुष्काळात खचू नका, शासन पाठीशी :...सोलापूर : दुष्काळी परिस्थितीमुळे पाणी,...
शेतकऱ्यांच्‍या थकवलेल्या पैशांची...पुणे ः शेतीमालाचा लिलाव झाल्यानंतर २४ तासांत पैसे...
नगर जिल्हा परिषदेचा यंदा ४४ कोटी...नगर : जिल्हा परिषदेत सोमवारी झालेल्या सर्वसाधारण...
नांदेड परिमंडळात सौर कृषिपंप योजनेसाठी...नांदेड ः मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेअंतर्गत...
शेतीमाल तारण योजनेत ४०६ शेतकऱ्यांनी...औरंगाबाद : मराठवाड्यातील जालना, परभणी व हिंगोली...
ऊस उत्पादक शेतकरी देणार शहिदांच्या...कोल्हापूर : पुलवामा जिल्ह्यातील दहशतवादी हल्ल्यात...
तूर खरेदीतील अनागोंदीविरुद्ध आंदोलनअकोला  ः जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यात...
'पुलवामा'चा सूत्रधार काश्‍मीरमध्येच?नवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा...
उन्हाळी पिकातील खतांचे व्यवस्थापनउन्हाळी हंगामात प्रामुख्याने भुईमूग, सूर्यफूल,...
केम प्रकल्पाला लागली भ्रष्टाचाराची वाळवीअमरावती : अंमलबजावणीपेक्षा गैरव्यवहार व...
‘पेंच’ लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना १३...नागपूर : मध्य प्रदेशातील चौराई प्रकल्पामुळे पेंच...
‘एसटी’साठी जागा आठ हजार अन्‌ अर्ज ४१...सोलापूर : राज्य परिवहन महामंडळात चालक व...
दररोजचा दोनशे टन द्राक्षपुरवठा ठप्पपिंपळगाव बसवंत, जि. नाशिक : जम्मू-काश्‍...
'देशात आयात होणाऱ्या सोयाबीनवर बंदी...पुणे : देशांतर्गत दर वाढत असल्याने...
बांबू उत्पादन, गुंतवणूक संधीसाठी...मुंबई : देशातील बांबू लागवडीला चालना देण्याबरोबरच...