agriculture news in marathi, demand for continuing the procurement of gram, mumbai, maharashtra | Agrowon

हरभरा खरेदी केंद्र सुरू ठेवा ः धनंजय मुंडे
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 5 जून 2018

मुंबई : राज्यातील हजारो शेतकऱ्यांचा लाखो क्विंटल हरभरा खरेदी अभावी नोंदणी करूनही पडून​​ आहे. त्यामुळे राज्यातील शेवटच्या शेतकऱ्याचा हरभरा खरेदी होईपर्यंत खरेदी केंद्रे सुरू ठेवावीत, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन केली.

मुंबई : राज्यातील हजारो शेतकऱ्यांचा लाखो क्विंटल हरभरा खरेदी अभावी नोंदणी करूनही पडून​​ आहे. त्यामुळे राज्यातील शेवटच्या शेतकऱ्याचा हरभरा खरेदी होईपर्यंत खरेदी केंद्रे सुरू ठेवावीत, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन केली.

मागील दोन ते तीन महिन्यांपासून केंद्र सुरू असूनही हरभरा खरेदी सुरू नव्हती, हरभऱ्याला बारदानाही उपलब्ध नव्हता, त्यामुळे शेतकऱ्यांच्या हरभऱ्याची खरेदी झाली नाही. हजारो शेतकऱ्यांनी हरभरा खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणी केली होती, मात्र खरेदी झाली नाही अशी माहिती धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांना दिली.

खरेदी केंद्राच्या आवारात लाखो क्विंटल हरभरा पडून आहे, पावसाळा तोंडावर आहे, त्यामुळे हरभऱ्याचे नुकसान होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत तातडीने खरेदी केंद्र पुन्हा सुरू करण्यात यावीत, अशी मागणी श्री. मुंडे यांनी केली. बाजारात हरभऱ्याला कमी भाव आहे, अशात शेतकऱ्यांना खरेदी केंद्रांशिवाय पर्याय नाही. शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तत्काळ मदत करावी, असेही ते म्हणाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांच्या या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत आम्ही याबाबतीत केंद्राला प्रस्ताव पाठवला असल्याचे सांगितले. या वेळी धनंजय मुंडे यांच्यासह आमदार जयवंत जाधव, अंबाजोगाई कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती गोविंद देशमुख उपस्थित होते.

इतर ताज्या घडामोडी
काँग्रेसमध्ये नवचैतन्य; प्रियंका गांधी...नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी...
पीकनिहाय सेंद्रिय खत व्यवस्थापनपशुपालनातून जमिनीची सुपीकता हा विषय आता...
परोपजीवी मित्र-कीटकांची ओळखसध्या केवळ कीडनियंत्रणासाठी कीटकनाशकांच्या...
खोडवा उसाला द्या शिफारशीत खतमात्रापाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन रासायनिक खतांचा...
परभणीत काकडी १००० ते १५०० रुपये क्विंटलपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...
मागण्यांसाठी संग्रामपूर येथे...बुलडाणा  ः जनावरांसाठी चारा नाही, लोकांना...
शेतकऱ्यांनी पाडली तूर खरेदी बंदयवतमाळ : हमीभावापेक्षा ९०० ते १००० रुपये कमी...
कर्जमाफीसाठी पॉलिहाउस शेडनेटधारक...नगर  : पॉलिहाउस शेडनेटधारक शेतकऱ्यांचे...
विदर्भात पाच ठिकाणी होणार ब्रिज कम...अमरावती  ः भूजल पुनर्भरणाच्या उद्देशाने...
सोलापूर जिल्ह्यातील १६२ पाणंद...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री पाणंद...
खानदेशात मक्याची आवक नगण्यजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...
सातारा जिल्ह्यात ४६ लाख ३५ हजार टन ऊस...सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम वेगात...
जळगावमधील ग्रामपंचायतींचा डिजिटल...जळगाव  ः ग्रामपंचायतींमध्ये संगणकावरील विविध...
पुणे जिल्ह्यात ७१ लाख टन ऊस गाळपपुणे   ः जिल्ह्यात १७ साखर...
नगर जिल्ह्याचे विभाजन होणारच ः...नगर  ः नगर जिल्ह्याचे विभाजन व्हावे, ही...
पंधरा दिवसांपूर्वीच संपला नगरमधील पाच...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये चाराटंचाई अंधिक तीव्र होत...
वीज दरवाढ रद्दबाबतचे परिपत्रक...शिरोली पुलाची, जि. कोल्हापूर : वीज दरवाढ...
दुष्काळग्रस्तांच्या मागण्यांसाठी परभणीत...परभणी : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी,...
हरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार...मुंबई   : हरकती असलेल्या जमिनी...
मराठवाडा, खानदेशात ४९ लाख टन ऊसगाळपऔरंगाबाद : यंदाच्या हंगामात मराठवाडा व खानदेशातील...