agriculture news in marathi, demand for Damage survey of cotton | Agrowon

कपाशी नुकसान सर्वेक्षण मागणीसाठी रास्ता रोको
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 14 नोव्हेंबर 2017

यवतमाळ : बोंडअळीमुळे कपाशीच्या झालेल्या नुकसानाच्या पार्श्‍वभूमीवर तत्काळ सर्वेक्षणाचे आदेश देत नुकसानभरपाई मिळावी, या मागणीकरिता मनीष जाधव यांच्या नेतृत्वात सोमवारी (ता. १३) महागाव येथे रास्ता रोको करण्यात आला. तब्बल तीन तास चाललेल्या या आंदोलनानंतर तहसीलदार शेलार यांनी आंदोलनस्थळी येत निवेदन स्वीकारले.

यवतमाळ : बोंडअळीमुळे कपाशीच्या झालेल्या नुकसानाच्या पार्श्‍वभूमीवर तत्काळ सर्वेक्षणाचे आदेश देत नुकसानभरपाई मिळावी, या मागणीकरिता मनीष जाधव यांच्या नेतृत्वात सोमवारी (ता. १३) महागाव येथे रास्ता रोको करण्यात आला. तब्बल तीन तास चाललेल्या या आंदोलनानंतर तहसीलदार शेलार यांनी आंदोलनस्थळी येत निवेदन स्वीकारले.

महागाव तालुक्‍यासह यवतमाळ जिल्ह्यात कपाशीवरील बोंडअळीमुळे यावर्षीच्या हंगामात हे पीकच हातचे गेले आहे. उत्पादकता खर्चाची भरपाईदेखील शक्‍य नसल्याने शेतकऱ्यांकडून पीक सर्वेक्षण व भरपाईची मागणी होत आहे. महागाव तालुक्‍यातील पिकाची आमदार राजेंद्र नजरधने यांनी पाहणी केली. त्यासोबतच पालकमंत्री मदन येरावार यांनीदेखील मुख्यमंत्र्यांकडे शेतकऱ्यांना मदत मिळावी, असा प्रस्ताव दिला होता. अद्याप मदतीसंदर्भाने शासन स्तरावरून कोणताच निर्णय झालेला नाही. परिणामी शेतकऱ्यांनी संघटित होत सोमवारी या विरोधात रास्ता रोको केला.

मनीष जाधव, गजानन कांबळे, पंचायत समिती सभापती प्रमोद जाधव, नागोराव कदम, लखन देवकते, डॉ. अरुण पाटील, गणेश तोंडकर, राम देवकते, रामेश्‍वर पवार यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते. तब्बल तीन तास हे आंदोलन चालले. याची दखल घेत तहसीलदार शेलार यांनी घटनास्थळी पोचत निवेदन स्वीकारले.

‘कापूस संशोधन संस्थेचा अहवाल द्या’
केंद्रीय कापूस संशोधन संस्थेने या भागातील पिकाची पाहणी केली. परंतु त्या संदर्भाने अहवाल गेल्या महिनाभरापासून देण्यात आला नाही. बोंडअळीचा प्रादुर्भाव होण्यामागील कारणांचा हा अहवाल लवकर दिला जावा, अशी मागणीदेखील शेतकऱ्यांनी केली.

इतर ताज्या घडामोडी
शेळी-मेंढीपालनासाठी विविध योजनादुष्काळी भागांमध्ये शेळी-मेंढी पालन हा एक उत्तम...
`शेतकऱ्यांची थट्टा कशाला करता?`पुणे  : डॉ. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी...
सातारा जिल्ह्यात उन्हाळी भुईमुगाची... सातारा  ः जिल्ह्यात उन्हाळी हंगामातील...
मराठवाड्यातील प्रकल्पांमध्ये ३२ टक्के... औरंगाबाद  : मराठवाड्यातील पाणीसाठा...
तीन जिल्ह्यांत यंदा उन्हाळी पिकांचे... औरंगाबाद : यंदा मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना व...
सांगली जिल्ह्यातून १० हजार ६०० टन... सांगली ः दर्जेदार द्राक्षांच्या उत्पादनासाठी...
राज्यातील साडेसात हजारांपेक्षा अधिक...मुंबई : राज्यातील सात हजार ६५८ अंगणवाड्यांना...
जलयुक्तची कामे करा; अन्यथा नोकरी सोडासांगली  ः जिल्ह्यातील पाणीटंचाई...
शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी तुम्ही कधीही...अकोला : सध्या शेतकरी, तरुण हे सर्वच त्रस्त...
राळेगणसिद्धीत गावकऱ्यांचा ‘रास्ता रोको’नगर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी...
नगर जिल्ह्यात ‘जलयुक्त’ची सव्वाआठ हजार... नगर : जलयुक्त शिवार अभियानातून गेल्या वर्षभरात...
नाशिक विभागात शेततळी योजनेच्या... नाशिक  : कृषी विभागाच्या संथ कारभारामुळे...
हवामान बदलावर संवर्धित शेती हेच उत्तगेल्या दोन दशकांपासून महाराष्ट्रामध्येही...
कृषी सल्लाधान्य साठवण : मळणीनंतर धान्याची साठवण...
बोंडअळीग्रस्त, धान उत्पादकांना संयुक्त...मुंबई : राज्यात गुलाबी बोंडअळी आणि धान...
लाळ्या खुरकूत लस पुरवठा विलंबाच्‍या...पुणे  ः लाळ्या खुरकूत लसींच्या पुरवठ्याच्या...
कोरडे, उष्ण हवामान राहून तापमानाची...महाराष्ट्रासह दक्षिण, मध्य, उत्तर व ईशान्य...
नेदरलॅंडमध्ये साठवण, निर्यातीसाठी खास...वातावरणातील बदल लक्षात घेता कांदा पिकांच्या नव्या...
राळेगणसिद्धीत अण्णा हजारे यांच्या...नगर : शेतमालाला दर मिळण्यासह अन्य...
हमीभाव खरेदी केंद्रांवर हमालीच्या...अकोला : अाधारभूत किमतीने सुरू असलेल्या तूर...