agriculture news in marathi, Demand for declaring drought in Gadchiroli district | Agrowon

गडचिरोली जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी
टीम अॅग्रोवन
बुधवार, 24 जानेवारी 2018

गडचिरोली : कमी पर्जन्यमानामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची दखल घेत संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावा, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने येथील इंदिरा चौकात धरणे देण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठविण्यात आले.

गडचिरोली : कमी पर्जन्यमानामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची दखल घेत संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावा, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने येथील इंदिरा चौकात धरणे देण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठविण्यात आले.

हमखास पावसाचा जिल्हा अशी ओळख असलेल्या गडचिरोलीत या वर्षी कमी पाऊस झाला. त्यामुळे काही भागांत धान लागवड होऊ शकली नाही. ज्या भागात धान लागवड झाली; त्या ठिकाणी शेतकऱ्यांना कमी उत्पादकतेचा सामना करावा लागला. उत्पादकता खर्चाची भरपाईदेखील अनेक गावांमधील शेतकऱ्यांना करणे शक्‍य झाले नाही. त्याची दखल घेत सरकारने गडचिरोली जिल्ह्यात सरसकट दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी आहे.

यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने इंदिरा चौकात धरणे देण्यात आले. त्यासोबतच महिला व बाल रुग्णालय त्वरित सुरू करावे, अल्पसंख्याक समाजाला पाच टक्‍के आरक्षण मिळावे, विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती तत्काळ द्यावी, गॅस, पेट्रोल, डिझेलचे दर कमी करावेत या मागण्यांदेखील या वेळी करण्यात आल्या.

जिल्हा परिषदेच्या बांधकाम सभापती भाग्यश्री आत्राम, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, उपाध्यक्ष फहीम काझी, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सोनाली पुण्यवार, अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष मुस्ताक शेख कबीर शेख, देसाईगंजचे शहराध्यक्ष लतीफ शेख यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले होते.

इतर बातम्या
सांगलीतील ९० टक्के द्राक्ष हंगाम उरकलासांगली : जिल्ह्यातील यंदाचा द्राक्ष हंगाम ९०...
फरारी द्राक्ष व्यापाऱ्यास शेतकऱ्यांनी...नाशिक  ः चालू वर्षाच्या हंगामात जिल्ह्यातील...
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील प्रचार...औरंगाबाद : औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील...
सध्याचे सरकार म्हणजे लबाडाचे आवतन : पवारनगर : सध्याचे केंद्र सरकार म्हणजे लबाडाचे आवतन...
परभणीत वांगी प्रतिक्विंटल १००० ते २५००...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
मतदान केंद्रावरील रांगेपेक्षा...सोलापूर  : सोलापूर लोकसभा मतदारसंघात सर्वत्र...
अवकाळीचा सोलापूर जिल्ह्याला मोठा फटकासोलापूर : जिल्ह्याला गेल्या चार महिन्यांत अधून-...
मंठा तालुक्यात वादळी वाऱ्याने नुकसानमंठा, जि. जालना  : तालुक्यात मंगळवारी ( ता....
पुणे विभागातील दोन लाख हेक्टरवरील ऊस...पुणे  ः गेल्या चार ते पाच महिन्यांपासून पुणे...
मराठवाड्यातील मतदान टक्केवारीत किंचित घटबीड, परभणी : मराठवाड्यातील बीड, उस्मानाबाद,...
सातारा जिल्‍ह्यातील ऊस उत्पादकांना...सातारा  ः जिल्ह्यातील सह्याद्री कारखान्याचा...
म्हैसाळ योजनेत २२ पंपांद्वारे उपसासांगली : म्हैसाळ योजनेच्या पंपांची संख्या विक्रमी...
दिग्गजांच्या सभांनी तापणार साताऱ्यातील...सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघातील राजकीय...
‘सन्मान'च्या लाभार्थ्यांबाबत प्रशासन...गोंदिया : प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेचा लाभ...
प्रभावी अपक्ष उमेदवारांमुळे लढती रंगतदारमुंबई : राज्यात तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यातील २१...
धनगर समाज भाजपच्याच पाठीशी ः महादेव...सांगली  : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच...
चैत्र यात्रेनिमित्त भाविकांनी दुमदुमला...ज्योतिबा डोंगर, जि. कोल्हापूर  : ‘...
विदर्भात वादळी पावसाची शक्यतापुणे : पूर्वमोसमी पावसाच्या सरींमुळे...
‘ॲग्रोवन'चा आज १४वा वर्धापन दिन; जल...पुणे : लाखो शेतकऱ्यांच्या कुटुंबातील घटक बनलेल्या...
यंदा बीटी कापूस बियाणे मुबलक : कृषी...पुणे : राज्याच्या कापूस उत्पादक भागातील...