सोलापुरात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

सोलापुरात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी
सोलापुरात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात अद्यापही दमदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे खरीप हंगाम वाया गेला आहे. पाऊस नसल्याने रब्बी हंगामही शेतकऱ्यांना सापडणार नाही. त्यामुळे जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी मंगळवारी (ता. १९) झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत करण्यात आली. याबाबतचा ठराव करून तो शासनाला पाठविण्याचा निर्णयही घेण्यात आला.

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वसाधारण सभेत सदस्य रणजितसिंह शिंदे, पक्षनेते आनंद तानवडे, त्रिभुवन धाइंजे, अरुण तोडकर, पंढरपूरचे सभापती नानाजी वाघमोडे, शैला गोडसे, सचिन देशमुख या सदस्यांनी जिल्ह्यात पाऊस नसल्याने पाणी व जनावरांच्या चाऱ्याची स्थिती गंभीर झाली असल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. परतीचा पाऊस येण्याची शक्‍यता खूपच कमी आहे. त्यामुळे जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी या सदस्यांनी केली. रणजितसिंह शिंदे यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची कामे सुरू करावीत, विहीर व बोअरचे अधिग्रहण करावे, ज्या ठिकाणी हे दोन्ही उपलब्ध नाही, त्या ठिकाणी टॅंकर सुरू करण्याची मागणी केली.

उजनी धरण जरी भरले असले, तरी जिल्ह्यातील अनेक तालुक्‍यांमध्ये त्या धरणाचे पाणी पोचत नाही. त्यामुळे त्या तालुक्‍यांमध्ये दुष्काळाच्या संदर्भात असलेल्या उपाययोजना करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड म्हणाले, ‘‘महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून ५२८ विहिरींचे परिपूर्ण प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात यंदा जवळपास पाच हजार विहिरी पूर्ण करण्याचे नियोजन सुरू आहे. 

चाऱ्यासाठी पैसे ठेवा

पशुसंवर्धन विभागाने औषधांच्या खरेदीसाठी, तर कृषी विभागाने टॅक्‍टरचलित यंत्रांच्या खरेदीसाठी निधीची तरतूद केली आहे. दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर यंदाच्या वर्षी त्यावर तरतूद करण्याऐवजी ते पैसे जनावरांच्या चाऱ्यासाठी वर्ग करण्याची मागणी सदस्य त्रिभुवन धाइंजे यांनी केली. मात्र, याबाबत निर्णय घेता येणार नसल्याचे अध्यक्ष शिंदे यांनी सांगितले. जनावरांच्या चाऱ्यासाठी इतर ठिकाणाहून काही पैसे देता येतील का, हे पाहू असेही त्यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com