जळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दादरची (ज्वारी) आवक सुरू झाली असून, मागील आठवड्यात
ताज्या घडामोडी
वणी, जि. यवतमाळ ः केंद्र व राज्यातील सरकार शेतकरीविरोधी आहे. जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असताना काही तालुकेच दुष्काळग्रस्त जाहीर करून भेदभाव केला जात आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त होईस्तोवर काँग्रेस स्वस्थ बसणार नाही, असा इशारा विधान परिषदेचे माजी उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी दिला.

काँग्रेस सेवादलाचे अध्यक्ष ॲड. राजू कासावार यांच्या नेतृत्वात शेतकरी, शेतमजूर व सामान्यांच्या प्रश्नांसाठी वणी तालुक्यातील टाकळी ते टाकळी अशी पदयात्रा काढण्यात आली आहे. या पदयात्रेला माणिकराव ठाकरे यांनी हिरवी झेंडा दाखवला. यावेळी अध्यक्षस्थानी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार वजाहत मिर्झा होते. माजी मंत्री वसंत पुरके, सुभाष धोटे, वामनराव कासावार, जिल्हा परिषद सभापती अरुणा खंडाळकर या वेळी उपस्थित होते.
- 1 of 348
- ››