agriculture news in marathi, demand of dhananjay munde to give rate diffrance for tur, gram, mumbai, maharashtra | Agrowon

तूर, हरभऱ्यासाठी बाजारभाव, हमीभावातील फरक द्या : धनंजय मुंडे
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 7 जून 2018

मुंबई : राज्यात खरेदी न झालेल्या आणि फक्त नोंदणी झालेल्या तूर, हरभऱ्यासाठी प्रतिक्विंटल १ हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा शासनाने केली आहे. ही घोषणा फसवी असून, त्याऐवजी शासकीय खरेदी न झालेल्या शेतकऱ्यांकडील तूर, हरभऱ्यासाठी बाजारभाव व हमीभावातील फरकाची रक्कम शासनाने द्यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.

मुंबई : राज्यात खरेदी न झालेल्या आणि फक्त नोंदणी झालेल्या तूर, हरभऱ्यासाठी प्रतिक्विंटल १ हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा शासनाने केली आहे. ही घोषणा फसवी असून, त्याऐवजी शासकीय खरेदी न झालेल्या शेतकऱ्यांकडील तूर, हरभऱ्यासाठी बाजारभाव व हमीभावातील फरकाची रक्कम शासनाने द्यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.

राज्यातील हजारो शेतकऱ्यांचा लाखो क्विंटल हरभरा, तूर नोंदणी करूनही खरेदी अभावी पडून आहे. त्यामुळे राज्यातील शेवटच्या शेतकऱ्याचा हरभरा, तूर खरेदी होईपर्यंत खरेदी केंद्र सुरू ठेवावीत व या योजनेला मुदतवाढ द्यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. मंगळवारी शासनाने हरभरा खरेदीस १३ जूनपर्यंत मुदतवाढ देण्याचे जाहीर केले.

याबाबत श्री. मुंडे म्हणाले, की शासनाने १३ जूनपर्यंत मुदतवाढ दिली असली तरी या कालावधीत शेतकऱ्यांकडील संपूर्ण हरभरा खरेदी व्हावी यासाठी बारदाना, गोदामे आदींची व्यवस्था करावी. तूर व हरभरा उत्पादकांना प्रतिक्विंटल एक हजार रुपये अनुदान देण्याची शासनाने घोषणा केली असली तरी ही घोषणा ही शेतकऱ्यांची फसवणूक करणारी आहे. बाजारात हरभऱ्याला केवळ तीन हजार तर तुरीसाठी चार हजार रुपये भाव मिळत आहे. शासकीय हमीभाव मात्र ४४०० व ५४५० रुपये क्विंटल असल्याने शेतकऱ्यांचे एका क्विंटल मागे १५०० रूपये नुकसान होणार असताना, शासनाने केवळ एक हजार रुपये ते ही केवळ एका क्विंटलपर्यंतच्या मर्यादेत देण्याची घोषणा करून शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे.

त्याऐवजी शासनाने मध्य प्रदेश सरकारच्या धर्तीवर भावांतर योजना सुरू करून बाजारभाव व हमीभाव यातील फरकाची रक्कम शेतकऱ्यांना अनुदान स्वरूपात द्यावी अशी मागणी आहे. शासन खरेदीचे विक्रमी आकडे सांगत असले तरी मागील तीन ते चार वर्षांत शेतीमालाच्या चुकीच्या आयात धोरणामुळे सातत्याने शेतीमालाचे बाजारभाव कोसळत असल्याने शासकीय खरेदी, विक्री अनिवार्य झाली आहे. त्यामुळेच शासनाने केलेल्या खरेदीचे आकडे मोठे दिसत असले तरी प्रत्यक्षात उत्पन्नाच्या तुलनेत ३० टक्केसुद्धा खरेदी झाली नसल्याचा दावा त्यांनी केला.

इतर ताज्या घडामोडी
गाजराच्या शिल्प दुनियेत...उत्तर चीन येथील हेबेई प्रांतातील हॅन्डन येथील...
जळगावातील १२० कोटींच्या कामांना...जळगाव : जिल्हा परिषदेत मागील महिन्यात १२० कोटी...
सूक्ष्म सिंचनाचे अनेक प्रकल्प राबविणार...परभणी : नानाजी देशमुख कृषी संजीवनी...
परभणीत रब्बीची ६२.२४ टक्के क्षेत्रावर...परभणी : जिल्ह्यात यंदा कमी पावसामुळे उद्भवलेल्या...
'निर्यातदार व्यापाऱ्यांनी साखळी करुन दर...आटपाडी, जि. सांगली : आटपाडी तालुक्‍यात...
शेततळ्याचे मुख्यमंत्र्यांनी केले ‘...सोलापूर ः बोरामणी (ता. दक्षिण सोलापूर) येथील...
अकोल्यात सोयाबीन प्रतिक्विंटल ३२०० ते...अकोला ः अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत...
सूक्ष्म सिंचनाचा परिणामकारक वापर शक्‍य...औरंगाबाद : सूक्ष्म सिंचनाची समज व गरज, त्यामधील...
भावांनो घाबरू नका, आम्ही वाऱ्यावर...खोजेवाडी जि. नगर ः ‘‘दुष्काळ जाहीर होऊन अडीच...
साताऱ्यात एकरकमी एफआरपीसाठी...सातारा : एकरकमी एफआरपीसाठी स्वाभिमानी शेतकरी...
जुन्नर तालुक्यातील द्राक्षे चीन आणि...नारायणगाव, जि. पुणे : जुन्नर तालुक्‍यात जंबो, शरद...
हिवाळ्यात करा फळबागांतील तापमान नियोजनहिवाळ्यामध्ये कमी होणारे तापमान ही विविध...
गादीवाफ्यावर करा भुईमूग लागवडभुईमुगाची गादीवाफ्यावर पेरणी एक मीटर रुंदीचे...
बायोलेजिक्स औषधांची परिणामकारकता वाढणारयेल विद्यापीठातील संशोधकांनी शोधलेल्या...
हवामान बदलाचा युरोपियन देशांना फटकायुरोपमध्ये पाण्याच्या पूर्ततेसाठी अन्य सीमावर्ती...
बार्शीटाकळीत कांदा बियाणे उगवेना अकोला : पेरणी केल्यानंतर महिना उलटूनही ‘महाबीज’चे...
मुख्यमंत्र्यांच्या ‘लोकसंवाद’...अकोला : शासनाच्या योजना गरजूंपर्यंत पोचल्यानंतर...
उन्हाळ कांदा लागवडीसाठी शेतकरी उदासीनजळगाव : खानदेशात उन्हाळ, रांगडा कांदा...
वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नजरा...वर्धा : या हंगामातील नवीन तूर मळणीला सुरवात...
कृषी विद्यापीठाच्या तंत्रज्ञानाचा अवलंब...परभणी ः दुष्काळी स्थितीत फळबागा वाचविण्यासाठी...