agriculture news in marathi, demand to extend banana insurance date, parbhani | Agrowon

केळी विमा बॅंकांनी स्विकारलाच नाही; मुदतवाढीची मागणी
माणिक रासवे
बुधवार, 1 नोव्हेंबर 2017

नांदेड : हवामानाधारित फळपीक विमा योजनेअंतर्गत केळी फळपिकाचा विमा भरण्याच्या शेवटच्या दिवशी मंगळवारी (ता. 31) अर्धापूर (जि. नांदेड) परिसरातील शेतकऱ्यांचे विमा प्रस्ताव बॅंकांनी न स्वीकारल्यामुळे अनेक शेतकरी विमा संरक्षणापासून वंचित राहणार आहेत. त्यामुळे केळीचा विमा भरण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

नांदेड : हवामानाधारित फळपीक विमा योजनेअंतर्गत केळी फळपिकाचा विमा भरण्याच्या शेवटच्या दिवशी मंगळवारी (ता. 31) अर्धापूर (जि. नांदेड) परिसरातील शेतकऱ्यांचे विमा प्रस्ताव बॅंकांनी न स्वीकारल्यामुळे अनेक शेतकरी विमा संरक्षणापासून वंचित राहणार आहेत. त्यामुळे केळीचा विमा भरण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

हवामानावर आधारित फळ पीक विमा योजनेअंतर्गत केळी पिकांचा समावेश करण्यात आलेला आहे. मात्र यंदा पीक पेरा प्रमाणपत्र वेळेवर न मिळाले नाही. त्यात जनसुविधाम केंद्रावर संकेतस्थळ सुरू नसल्यामुळे शेतकऱ्यांना ऑनलाइन विमा प्रस्ताव सादर करता आले नाहीत. ऑफलाइन विमा प्रस्ताव स्वीकारले नाहीत. विमा प्रस्ताव स्वीकारण्यासाठी काही बॅंकांनी सुरवातील होकार दिला; परंतु नंतर नकार देत जनसुविधा केंद्रावर प्रस्ताव सादर करण्यास सांगितले. तीन दिवसांपूर्वी तलाठ्यांनी पीक पेराप्रमाण दिले; परंतु सुट्या असल्यामुळे विमा भरता आला नाही.

मंगळवारी (ता. 31) केळीचे विमा प्रस्ताव सादर करण्याची अंतिम मुदत होती. परंतु बॅंका तसेच जनसुविधा केंद्रावर या मुदतीत अनेक शेतकऱ्यांना विमा प्रस्ताव सादर करता आले नाहीत. परिणामी नांदेड जिल्ह्यातील असंख्य शेतकरी केळी पिकांचे विमा संरक्षण घेण्यापासून वंचित राहणार आहेत. त्यामुळे केळी फळपिकाचा विमा भरण्यासाठी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी माऊली माटे यांच्यासह तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी केली आहे.

इतर अॅग्रो विशेष
मराठवाड्यात रब्बीची केवळ १९ टक्‍केच...औरंगाबाद : मराठवाड्यात यंदा दुष्काळाची छाया किती...
केळीच्या आगारातून आखातात जाणार ४००...जळगाव ः केळीचे आगार असलेल्या जळगाव जिल्ह्यातून...
महाकॉट ब्रॅण्डची चमक पडली फिकीजळगाव ः पूर्व विदर्भ, उत्तर मराठवाडा व खानदेशातील...
शेतीला मिळाली पूरक उद्योगाची साथअंबाणी (जि. सातारा) येथील सौ. सुरेखा पांडुरंग...
दक्षिण कोकण, पश्‍चिम महाराष्ट्रात आज...पुणे : दक्षिण भारतामध्ये असलेल्या ‘गज’...
अभ्यास अन् नियोजनातून शेती देते समाधाननाशिक शहरातील प्रख्यात हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अनिरुद्ध...
‘सीसीआय’ची कापूस खरेदी मंगळवारपासून...जळगाव : कापूस खरेदीसंबंधी जिनिंगमध्ये केंद्र...
दुष्काळ, मराठा आरक्षण अधिवेशनात गाजणारमुंबई : उद्यापासून (ता. १९) मुंबईत सुरू होत...
शेतकऱ्यांच्या विधवांचे २१ला मुंबईत...मुंबई : देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे...
बा सरकार, प्रश्न जगण्याचा आहे!‘‘ज रा कुठे दुष्काळ पडला, गारपीट झाली,  पूर...
विना `सहकार` नाही उद्धारग्रामीण आणि शहरी भागांचा संतुलित विकास साधत...
राज्यातील धरणांमध्ये ५५ टक्के पाणीसाठापुणे   : राज्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढू...
महाबळेश्र्वरमध्ये ३५०० एकरांवर...सातारा  ः महाबळेश्वरसह वाई, जावली, कोरेगाव...
दुष्काळात तीन श्रेणींत कामांचे नियोजन...पुणे : राज्यात आलेल्या दुष्काळात मदतीचा...
ओडिशात भाडोत्री ट्रॅक्टर योजनेस प्रारंभभुवनेश्‍वर ः राज्यातील शेतकऱ्यांना अद्ययावत...
सोयाबीन वधारण्याची चिन्हेपुणे: राज्यात सध्या सोयाबीनचे दर गडगडले असले...
राज्याच्या दक्षिण भागात पावसाची शक्यतापुणे : राज्यात थंडी वाढण्यास सुरुवात झाली आहे....
कापूस खरेदीला आजपासून प्रारंभनागपूर : पणन महासंघाव्दारे कापूस खरेदीला आजपासून...
चारा लागवडीसाठी शासकीय जमिनी देणारमुंबई : राज्यावरील दुष्काळाचे संकट लक्षात...
दुष्काळात २५ एकरांत शेवगा, रंगबिरंगी...मुंबई येथील ‘कोचिंग क्लास’चा व्यवसाय असलेले तपन...