agriculture news in marathi, demand for extension for came project, nagpur, maharashtra | Agrowon

केम प्रकल्पाला पुन्हा मुदतवाढीचा प्रस्ताव
विनोद इंगोले
गुरुवार, 6 डिसेंबर 2018

प्रकल्पातील काही कामे प्रलंबित असल्याने ती पूर्ण होण्यास सहा महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या अर्थ विभागाकडे प्रकल्पाला सहा महिने मुदतवाढ मिळावी, अशी मागणी केली आहे.
- पीयूष सिंह, विभागीय आयुक्‍त, अमरावती विभाग.

अमरावती   ः मर्जीतील शेतकरी वगळता इतरांच्या जीवनात तसूभरही परिवर्तन घडविण्यात अपयशी ठरलेल्या कृषी समृद्धी प्रकल्पाकरिता (केम) पुन्हा सहा महिन्यांची मुदतवाढ मागण्यात आली आहे. मुदतवाढीचा चेंडू सध्या केंद्र सरकारच्या कोर्टात असल्याचे सूत्रांनी सांगितले.

विदर्भातील सहा आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या आर्थिक समृद्धीच्या उद्देशाने २००८-०९ मध्ये कृषी समृद्धी प्रकल्प राबविण्यास मंजुरी देण्यात आली. तब्बल ८०० कोटी रुपयांचा निधी याकरिता आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधी (इफाड) कडून मंजूर करण्यात आला. मात्र, मर्जीतील काही शेतकऱ्यांच्या प्रकल्पांना अनुदानाची खैरात; तसेच त्यांच्या माध्यमातूनच संत्रा विक्री करण्यापलीकडे प्रकल्पातून फार काही साध्य झाले नाही, असा आरोप आहे.

आर्थिक अनियमिततेच्या आरोप-प्रत्यारोपांनीदेखील हा प्रकल्प गाजला. परिणामी प्रकल्पाच्या अंमलबजावणीला खीळ बसून मंजूर निधीदेखील खर्च झाला नाही. २०१७ मध्ये प्रकल्पाची मुदत संपल्यानंतर वर्षभराच्या मुदतवाढीची मागणी झाली. त्यामुळे डिसेंबर २०१८ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. प्रकल्पाचा कालावधी संपण्यास आता काही दिवस उरले असतानाच आता पुन्हा सहा महिन्यांची मुदतवाढ मिळावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

काय आहे प्रकल्पात

आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधी तसेच टाटा ट्रस्ट या दोघांकडून या प्रकल्पाकरिता सुमारे ८०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. प्रकल्पातील लाभार्थ्यांची निवड तत्कालीन पंतप्रधान पॅकेजसाठी करण्यात आलेल्या सर्वेक्षणाच्या आधारे झाली. अमरावती, अकोला, वाशीम, यवतमाळ, बुलडाणा हे अमरावती विभागातील तर नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्याचा यात समावेश आहे.

या सहा जिल्ह्यांतील १६०६ गावे, २ लाख ८९ हजार लाभार्थी आहेत. नैराश्‍यग्रस्त, महिला, अल्पभूधारक आणि अती अल्पभूधारक लाभार्थ्यांचा समावेश आहे. अनुदान स्वरूपात मदत करण्याऐवजी बॅंकेचे कर्ज, दुधाळ जनावर खरेदी केल्यानंतर प्रकल्पातून एकूण रकमेच्या ३० टक्‍के रक्‍कम संबंधित शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा केली जाते.

 

इतर ताज्या घडामोडी
कर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने...सोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही...
योग्य पद्धतीने करा दालचिनी काढणीनोव्हेंबर ते मार्च या कालावधीत दालचिनी काढणीचा...
परभणीत फ्लॅावर प्रतिक्विंटल ४०० ते ७००...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...
भाजपची राष्ट्रीय परिषद ११ जानेवारीपासूननवी दिल्ली ः भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय...
यंत्रमाग १ तर प्रोसेस, सायझिंगला २...मुंबई  ः महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग...
अटी, शर्ती काढल्या तरच कर्जमाफीचा फायदा नगर : सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कर्ज झाले आहे...
कर्जासाठी शेतकऱ्याचा बॅंकेसमोर मृत्यू...मुंबई : कर्जाच्या मागणीसाठी शेतकऱ्यांना स्टेट...
ग्रामपंचायतीच्या ८०० सदस्यांचे सदस्यत्व...सोलापूर : निवडणूक निकालानंतर सहा महिन्यांच्या आत...
प्रतापगडावर शिवप्रताप दिन उत्साहातसातारा : ढोल-ताशांचा रोमांचकारी गजर, छत्रपती...
कांद्याला पाचशे रुपये अनुदान द्यानाशिक : कांद्याला हमीभाव मिळत नसल्याने...
'प्रकल्पग्रस्त पुनर्वसनात वेळेचा अपव्यय...नाशिक : शासकीय अधिकारी काम कसे करतात, यावरच...
बचत गटांच्या सक्षमीकरणासाठी ‘...मुंबई : राज्यातील महिला सक्षमीकरणाशी निगडित...
वीस वाळू घाटांच्या लिलावाचा मार्ग मोकळाअकोला : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने...
नांदेडमध्ये नाफेडतर्फे तूर खरेदी केंद्र...नांदेड ः केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी...
परभणीत आज शेतकरी सुकाणू समिती बैठकपरभणी : राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत,...
सांगली बाजार समितीत हमालांचे आंदोलनसांगली ः कृषी उत्पन्न बाजार समितीतील हमालांनी...
नगर जिल्ह्यात हमी केंद्रांकडे शेतकरी...नगर ः आधारभूत किमतीने मूग, उडीद सोयाबीनची खरेदी...
शिवसेनेकडून जिल्हा परिषदेत नाराजांचे...जळगाव : जिल्हा परिषदेत तीन पंचवार्षिक भाजपसोबत...
शेतकरी मृत्यूप्रकरणी पाथरी बाजारपेठेत...पाथरी, जि. परभणी  : पीककर्जाच्या मागणीसाठी...
अण्णा हजारे यांनी कांदाप्रश्‍नी लक्ष...नगर ः शेतकऱ्यांना एक ते पाच रुपये किलो दराप्रमाणे...