agriculture news in marathi, demand of farmers to cancel minimum export prize of onion, nashik, maharashtra | Agrowon

कांदा दरवाढीसाठी किमान निर्यातमूल्य पूर्णपणे हटवण्याची मागणी
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 2 फेब्रुवारी 2018
कष्टाने पिकविलेल्या शेतीमालावरच सरकार बंधन का घालते? निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतीचे नुकसान होते. तेव्हा सरकार शेतकऱ्यांचा किती विचार करते? आता निसर्ग आणि बाजाराच्या नियमामुळे जर कांदा उत्पादकांना खर्च निघेल असा भाव मिळत असेल, तर सरकारने त्याच्या आड येऊ नये. किमान निर्यात मूल्याचे बंधन पूर्णपणे काढावे.
- गणपत मवाळ, चोंडी, ता. सिन्नर, जि. नाशिक.
नाशिक  : कांद्याचे आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यामध्ये कांदादरात गेल्या आठवड्यापासून सातत्याने घसरण होत आहे. गेल्या महिन्यात चार हजारांची पातळी गाठणाऱ्या कांद्याला सद्यःस्थितीत कमाल दोन हजार रुपयांचा दर मिळत आहे. कांदा दरात आणखी घसरण झाली, तर शेतकरी संकटात सापडण्याची शक्‍यता आहे. यामुळे दरवाढीसाठी किमान निर्यातमूल्य पूर्णपणे हटविण्याची मागणी होऊ लागली आहे.
 
महाराष्ट्रासह इतर राज्यांत कांद्याची वाढलेली आवक आणि निर्यातमूल्य डॉलरमध्ये असलेली वाढ यामुळे सोमवारच्या तुलनेत कांदा दरात ३०० रुपयांची, तर मागील आठवड्याच्या तुलनेत १२०० रुपयांची घसरण झाली. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
 
लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये दररोज दोन लाख ते अडीच लाख क्विंटलची आवक होत आहे. पुणे, गुजरात, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, कर्नाटक राज्यांतून कांद्याची मोठी आवक होत आहे. त्यामुळे नाशिकमधून मागणी कमी झाल्याने ही घसरण होत आहे. गेल्या महिन्यात सरकारने दीडशे डॉलरने निर्यातामूल्य कमी करून ७०० डॉलरवर आणले असले, तरी त्याचा निर्यातीला फारसा लाभ झालेला नाही. यामुळे निर्यातमूल्यात आणखी घट करण्याची मागणी होऊ लागली आहे. 

इतर ताज्या घडामोडी
शेतकऱ्याने तयार केली डिझेलवरची बाईकसांगली : वाढत्या पेट्रोलच्या सुटकेसाठी...
शेतकऱ्यांना फसविणारे विक्रेते,...सोलापूर : शेतकरी केंद्रबिंदू मानून...
धुळे जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस...धुळे : जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस लागवडीची...
जळगाव जिल्ह्यात खरिपासाठी मुबलक खतेजळगाव : जिल्ह्यात आगामी खरिपासाठी शेतकऱ्यांची...
सोलापुरात गाजर, काकडीचे दर वधारले,...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
कारखान्यांनी थकीत `एफआरपी' त्वरीत...सोलापूर : जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी थकवलेले...
हमीभाव खरेदी बंद होताच तुरीचे दर झाले...नागपूर ः शासनाची हमीभाव खरेदी बंद होताच तुरीचे दर...
नगरला गव्हाला १६४१ ते १८५० रुपये...नगर : नगर बाजार समितीत गव्हाची आवक बऱ्यापैकी होत...
नाशिकला आंबा, खरबूज, कलिंगड तेजीतनाशिक : वाढत्या उन्हाबरोबरच नाशिक बाजार समितीत...
कासवाच्या लिंगनिर्धारणामागील जनुकीय...गेल्या ५० वर्षांपासून अंडी उबण्याच्या...
सातारा जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसातारा  : जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळा वाढू...
अग्रणी नदी पुन्हा अतिक्रमणाच्या विळख्यातसांगली : तासगाव, कवठेमहांकाळ तालुक्‍यांतील अग्रणी...
पुण्यातील डाळिंब, पेरू, चिकू बागांना...पुणे  : जिल्ह्यातील मृग बहारातील डाळिंब,...
इंदापुरातील नीराकाठची पिके जळण्याच्या...वालचंदनगर, जि. पुणे  ः इंदापूर तालुक्‍यातील...
नगर जिल्ह्यात ‘कृषी’च्या कामांवरच ‘...नगर  ः जलयुक्त शिवार अभियानाची कामे...
विषबाधा बळीप्रकरणी पावणेदोन कोटींची मदतअकोला : कीटकनाशक फवारणी करताना विषबाधा होऊन मृत...
हिंगोलीतील १०३ गावांची ‘जलयुक्त शिवार’...हिंगोली : जलयुक्त शिवार अभियानाच्या चौथ्या...
विधान परिषदेच्या ६ जागांसाठी उत्साहात...मुंबई ः स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान...
सैन्य दलात अधिकारी होण्याची संधीमुंबई : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलात...
कर्नाटक: कामगारांच्या पत्राशेडमध्ये...विजयपूर : नुकतेच कर्नाटकात विधानसभेची निवडणुका...