agriculture news in marathi, demand of flowers increase due to ganesh festival, pune, maharashtra | Agrowon

गणेशोत्सव, गौरी पूजनासाठी फुलांना मागणी वाढली
टीम अॅग्रोवन
सोमवार, 17 सप्टेंबर 2018

पुणे  ः गणेशाेत्सवादरम्यान पूजा आणि सजावटीसाठीच्या विविध फुलांना मागणी वाढली आहे. विशेषतः शनिवारी (ता.१५) गौरींचे आगमन आणि रविवारी (ता.१६) गाैरी पूजनासाठी विविध शाेभिवंत फुलांना मागणी वाढली हाेती. यामुळे फुलांच्या खरेदीसाठी रविवारी (ता.१६) पुणे बाजार समितीमधील फुलबाजार ग्राहकांनी फुलला हाेता. पुणे शहरासह परराज्यांतून देखील फुलांना मागणी वाढली आहे.

पुणे  ः गणेशाेत्सवादरम्यान पूजा आणि सजावटीसाठीच्या विविध फुलांना मागणी वाढली आहे. विशेषतः शनिवारी (ता.१५) गौरींचे आगमन आणि रविवारी (ता.१६) गाैरी पूजनासाठी विविध शाेभिवंत फुलांना मागणी वाढली हाेती. यामुळे फुलांच्या खरेदीसाठी रविवारी (ता.१६) पुणे बाजार समितीमधील फुलबाजार ग्राहकांनी फुलला हाेता. पुणे शहरासह परराज्यांतून देखील फुलांना मागणी वाढली आहे.

गौरींच्या आगमनासाठी घरात सजावट केली जाते. यासाठी महिलांकडून विविध शाेभिवंत फुलांना मागणी असते. यामुळे गेल्या दोन दिवसांपासून फुलखरेदीसाठी बाजारात गर्दी होती. दुर्वा तसेच केवडा, कमळ या फुलांना ही विशेष भाव होता.विविध फुलांमध्ये झेंडू, गुलछडी, गुलछडी काडी, शेवंती या पूजेसाठी बराेबरच शाेभेसाठीच्या कार्नेशियन, ऑर्केड, डच गुलाब, जरबेरा, लिलियम बराेबरच ग्लॅडिओलस, स्प्रिंगलर, गोल्डन रॉड, ब्लू डेझी, फिशपाम, ड्रेसिना यासारख्या फिलर्सच्या प्रकारांना सजावटीसाठी विशेष मागणी वाढली हाेती. यामुळे फुलांच्या दरात ५० टक्क्यांपर्यंत वाढ झाली हाेती, असे आडते सागर भाेसले यांनी सांगितले.

तसेच गेल्या काही महिन्यांपासून झेंडूच्या फुलांची मोठी आवक होत असून, उठाव नसल्याने माल पडून राहत आहे. गेल्या वर्षी याच दरम्यान झेंडूला एका किलाेला १५० रुपयांपर्यंत रुपये दर होता. आता हा एका किलोसाठी २० रुपयांपर्यंत खाली आला आहे. गुलछडी काडीला शनिवारी (ता.१५) प्रती किलाेला ३०० ते ५०० रुपयांवर असलेला दर ३०० रुपयांपर्यंत कमी झाल्याचेही भाेसले यांनी सांगितले.  

पुणे बाजारात झेंडूची माेठ्याप्रमाणावर आवक झाल्यामुळे अनेक खरेदीदारांनी कमी दरात ही फुले खरेदी करून दिल्लीला पाठवली. दिल्ली मध्ये सध्या झेंडूला ८० रुपयांपर्यंत दर मिळत असून, विमान वाहतुकीचा खर्च प्रति किलाेला ३० रुपयांपर्यंत आहे. तसेच गोवा, सुरत, अहमदाबाद येथे देखील फुले पाठविण्याचे प्रमाण वाढले असल्याचे श्री. भाेसले यांनी सांगितले. 

इतर ताज्या घडामोडी
काकडी, दोडका, कारल्याच्या दरात सुधारणापुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
‘गिरणा‘च्या पाण्यासाठी वाळूचा बंधाराजळगाव : गिरणा नदीतून पिण्यासह शेतीच्या पाण्याचे...
‘समृद्धी’च्या उभारणीसाठी रॉयल्टीत देणार...नाशिक   : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या...
व्याजासह एफआरपी दिल्याशिवाय...पुणे  : राज्यातील साखर कारखान्यांनी थकीत...
कोल्हापुरात पहिल्या टप्प्यात गूळदरात वाढकोल्हापूर  ः यंदाच्या गूळ हंगामाला सुरवात...
सरुड येथील गुऱ्हाळघरमालक उसाला देणार...कोल्हापूर : गुऱ्हाळघर व्यवसायात व्यावसायिकपणा...
नगर जिल्ह्यात १७८ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर   : जिल्ह्यात यंदा गंभीर पाणीटंचाई जाणवत...
पुणे बाजार समितीत हापूस आंब्यांची आवकपुणे  ः कोकणातील हापूस आंब्यांची या...
सातारा जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसातारा   ः जिल्ह्याच्या पूर्व भागात...
नागपूर जिल्ह्यात रब्बीची २१ टक्के पेरणीनागपूर   ः पाणी उपलब्धतेची अडचण, जमिनीत...
राज्यकर्ते दूध भेसळ का थांबवत नाहीत :...पुणे : राज्यात राजरोस दुधात भेसळ सुरू असून, अन्न...
आर. आर. पाटील यांचे स्मारक युवकांना...सांगली   ः आर. आर. पाटील यांनी ग्रामविकास,...
जळगाव जिल्हा परिषद पाणी योजनांचे वीज...जळगाव : पाणी योजनांचे बिल भरण्यात आले नसल्याने...
जमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...
खानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...
सटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर...नाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या...
पुणे विभागात ४८ हजार हेक्टरवर कांदा...पुणे   ः पुणे विभागात आत्तापर्यंत ४८ हजार...
वीजदरवाढीचा शॉक, अनुदानाची फक्त घोषणाचजळगाव ः वस्त्रोद्योगाला चालना मिळावी, उद्योजकांचा...
महिलांनी नाचणीपासून बनवले सत्तरहून अधिक...कोल्हापूर   : नाचणीची आंबील, नाचणीच्या...
बुलडाणा जिल्ह्यात रब्बीची ५६ हजार...बुलडाणा  ः कमी व अनियमित पावसामुळे संपूर्ण...