शेतरस्ते, शाळांच्या कुंपणासाठी निधीची मागणी

शेतरस्ते, शाळांच्या कुंपणासाठी निधीची मागणी
शेतरस्ते, शाळांच्या कुंपणासाठी निधीची मागणी

जळगाव : शेतरस्ते, जिल्हा परिषदेच्या शाळांच्या कामांबाबत सदस्यांना गावोगावी विचारणा होत आहे. परंतु या कामांसाठी अपेक्षित निधीची तरतूद जिल्हा परिषदेकडे नाही. त्यामुळे प्रत्येक जिल्हा परिषद सदस्याला शेतरस्त्यांच्या विकासासाठी, शाळांभोवती कुंपण भिंती बांधण्यासाठी निधी मिळावा, अशी मागणी नियोजन समितीने केली आहे. 

शासनाने शेतरस्त्यांबाबत पाणंद रस्ते कार्यक्रम हाती घेतला. परंतु यात जिल्हा प्रशासन व गावातील समित्या यांच्यात समन्वयाने काम सुरू आहे. जिल्हा परिषद, पंचायत समित्यांना कुठलीही विचारणा होत नाही. जिल्हा प्रशासनातर्फे प्रांत हे या कामकाजासाठी जबाबदार आहेत. सदस्याला त्याच्या गटातील (मतदारसंघ) १५ ते १६ गावांमधील कामांबाबत जबाबदारी पार पाडायची असते. त्यात अलीकडे शाळांभोवती कुंपण भिंती व शेतरस्ते याबाबत अधिक मागणी केली जाते. परंतु, त्यासाठी जिल्हा परिषदेकडे स्वतंत्र निधी नाही. शासनाकडूनही तो मिळत नाही. त्यामुळे सदस्यांना कामे करता येत नसल्याची स्थिती आहे.

शेतरस्त्यांचा प्रश्‍न पाणंद रस्ते विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून काहीसा दूर होईल. परंतु या योजनेतही जिल्हा परिषदेच्या सदस्याला स्थान नाही. त्यांना कामे करण्यासाठी स्वतंत्र निधी हवा आहे. प्रत्येक गावात एक किंवा दोन शेतरस्त्यांच्या कामांची मागणी आहे. ही कामे पाणंद रस्ते कार्यक्रमात समाविष्ट करण्यासाठी संधी आहे. परंतु काही गावांमध्ये राजकारणामुळे सरपंच जिल्हा परिषद सदस्यांचे ऐकत नाहीत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या ६८ सदस्यांना समान स्वरूपात निधी मिळावा, अशी मागणी सदस्य नाना महाजन यांच्यासह इतरांनी केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com