agriculture news in Marathi, demand increased for nashik tomato and onion, Maharashtra | Agrowon

नाशिकमधील कांदा, टोमॅटोला मागणी वाढली
ज्ञानेश उगले
मंगळवार, 14 नोव्हेंबर 2017

देशभरातील मागणीच्या तुलनेत कांदा व टोमॅटो या शेतमालाची आवक कमी झाली आहे. अजून महिनाभर तरी ही स्थिती बदलेल असे दिसत नाही. या परिस्थितीत सध्याचे दर येत्या काळात टिकून राहतील.
- अरुण काळे, सचिव, नाशिक बाजार समिती.

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील कांदा व टोमॅटो या महत्त्वाच्या शेतमालाला परराज्यांतून मागणी वाढली आहे. गत सप्ताहात नाशिक जिल्ह्यातील १५ बाजार समित्यांतून रोज सरासरी १ लाख क्विंटलची आवक झाली. कांद्याला क्विंटलला २२०० ते २७०० असा दर मिळाला. 

नाशिक भागातील टोमॅटो हंगामाने चांगला जोर धरला आहे. यंदा टोमॅटोची आवक निम्म्याने घटली आहे. या स्थितीत कर्नाटक, बिहार, दिल्ली या राज्यांतून मागणी वाढली आहे. गत सप्ताहात नाशिक जिल्ह्यात बाजार समिती तसेच शिवार बाजारात दिवसाला १ लाख ५० हजार क्रेटची आवक झाली. प्रति २० किलो वजनाच्या क्रेटला ४०० ते ८०० व सरासरी ६०० रुपये दर मिळाले. हे दर येत्या सप्ताहात टिकून राहतील असे जाणकारांनी सांगितले.

गत सप्ताहात लासलगाव, पिंपळगाव बसवंत बाजार समितीत कांद्याला प्रतिक्विंटलला २२०० ते २७०० व सरासरी २५०० रुपये दर मिळाले. नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांत दराची हीच स्थिती होती. येत्या सप्ताहात हे दर टिकून राहतील असे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. शेतकऱ्यांनी साठवलेला उन्हाळ कांदा संपत आला आहे, तर लाल कांद्याची आवक वाढली आहे. यामुळे लाल कांद्याला भावही चांगला मिळत आहे. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत लाल कांदा आणि गावठी (उन्हाळ) कांद्यांची रोज १५ ते १६ हजार क्विंटल आवक होत आहे. कांद्याला सरासरी २२०० ते २७०० रुपये दर मिळत आहे.

गत सप्ताहापासून लासलगाव बाजार समितीत उन्हाळ कांद्याची ३१ हजार ५९७ क्विंटल आणि लाल कांद्याची १३५३२ क्विंटल इतकी आवक होत आहे. येत्या काही दिवसांत ही आवक वाढेल. नोव्हेंबर अखेरपर्यंत उन्हाळ कांदा संपल्याने लाल कांदाच मार्केटमध्ये उपलब्ध राहील. त्यामुळे आता येत्या काळात व्यापाऱ्यांची मदार फक्त लाल कांद्यावर राहील, असेही सूत्रांनी सांगितले.

गेल्या महिन्यात परतीचा पाऊस झाल्याने काही ठिकाणी शेतात लाल कांद्याचे नुकसान झाले होते. त्यामुळे यावर्षी लाल कांद्याच्या उत्पादनात घट होईल, अशी शक्यता असल्याने कांद्याची आवक कमी राहील. मे, जूनमध्ये उन्हाळ कांदे निघेपर्यंत ही परिस्थिती रा‌हील, असे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे. सध्या उन्हाळ आणि लाल कांद्याची आवक रोज १५ ते १६ हजार क्विंटल होत आहे. सरासरी भाव २१०० ते २५००च्या दरम्यान मिळत असल्याने शेतकरीही समाधानी आहे.

पिंपळगाव बाजार समितीत कांद्याला चांगली मागणी असून, बाजारभावही तेजीत आहे. बाजार समिती आवारात होत असलेल्या आवकेपैकी जुना गावठी कांदा ७० टक्के, तर लाल कांद्याची ३० टक्के आवक होत आहे. पिंपळगाव बाजार समितीत शनिवारी १० हजार १२५ क्विंटल आवक होऊन लाल कांद्याला सरासरी २५०० रुपये, तर उन्हाळ कांद्याला सरासरी २२५१ रुपये दर मिळाला. 

इतर बाजारभाव बातम्या
मुंबईत लसूण प्रतिक्विंटल २६०० ते ४८००...मुंबई: राज्यभर वाढत्या थंडीच्या पार्श्वभूमीवर...
नाशिकमधील कांदा, टोमॅटोला मागणी वाढलीनाशिक : नाशिक जिल्ह्यातील कांदा व टोमॅटो या...
नागपुरात सोयाबीनचे दर स्थिरावलेनागपूर ः गेल्या वर्षी तीन हजार रुपये प्रतिक्‍...
सोलापुरात गवार, घेवड्याचे दर वधारलेसोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
कोल्हापुरात गूळ प्रतिक्विंटल ३७०० ते...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...
अंड्यांचे भाव नव्या उच्चांकावर,...अंड्यांचे भाव ऐतिहासिक उच्चांकावर पोचले आहेत....
पुण्यात भाजीपाल्याची आवक वाढली; दर स्थिरपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
जळगावात कारली प्रतिक्विंटल १३०० ते २३००...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणीत ढोबळी मिरची प्रतिक्विंटल २५०० ते...परभणी : कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत फळे-...
राज्यात गवार प्रतिक्विंटल २००० ते ५०००...पुण्यात प्रतिक्विंटल ३००० ते ५००० रुपये...
साताऱ्यात शेवगा ८०० ते १००० रुपये दहा...सातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी...
अकोल्यात सोयाबीन प्रतिक्विंटल २२२५ ते...अकोला : सोयाबीन हंगामाने जोर पकडलेला असून बाजार...
जळगावात भाजीपाल्याच्या दरात तेजीचा कलजळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सर्वच...
नागपुरात हरभरा दरात तेजीचा अंदाजनागपूर : कळमणा बाजार समितीत हरभरा दर काहीसे वधारत...
सोलापुरात कांद्याचे दर पुन्हा वधारलेलेच सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
सांगलीत गुळाची आवक वाढलीसांगली ः येथील बाजार समितीत गतसप्ताहापेक्षा चालू...
बाजारभाव दबावातच, मोठ्या मालाची समस्या...मोठ्या वजनाच्या मालामुळे महाराष्ट्रातील ब्रॉयलर...
पुण्यात कोथिंबीर, मेथीच्या आवकेत वाढपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादेत शेवगा प्रतिक्‍विंटल १०,०००...औरंगाबाद : आवक घटल्याने औरंगाबाद बाजार समितीमध्ये...
परभणीत काकडी प्रतिक्विंटल १००० ते १५००...परभणी : येथील कृषी उत्पन्न बाजार...