agriculture news in marathi, Demand for purchase Receipt of seeds to farmers | Agrowon

शेतकऱ्यांकडे बियाणे खरेदी पावतीची मागणी
टीम अॅग्रोवन
रविवार, 26 नोव्हेंबर 2017

जळगाव : आपल्या नुकसानग्रस्त बीटी वाणांच्या कपाशीची भरपाई मिळविण्यासाठी कापूस उत्पादकांना बियाणे कायदाअंतर्गत तयार केलेला ‘जी’ प्रकारचा अर्ज तालुका कृषी विभाग किंवा कार्यालयात जाऊन भरून घेण्याच्या सूचना कृषी विभागाने जारी केल्या आहेत. या अर्जासोबत बियाणे खरेदीची पावती, सातबारा उतारा (कपाशीची नोंद आवश्‍यक) आदी बाबी आवश्‍यक आहेत.

यामुळे कर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी जशा तालुक्‍याला चकरा माराव्या लागल्या, तसाच त्रास जी प्रकारचा अर्ज भरून घेण्यासाठी शेतकऱ्यांना सहन करावा लागेल, अशी स्थिती आहे.

जळगाव : आपल्या नुकसानग्रस्त बीटी वाणांच्या कपाशीची भरपाई मिळविण्यासाठी कापूस उत्पादकांना बियाणे कायदाअंतर्गत तयार केलेला ‘जी’ प्रकारचा अर्ज तालुका कृषी विभाग किंवा कार्यालयात जाऊन भरून घेण्याच्या सूचना कृषी विभागाने जारी केल्या आहेत. या अर्जासोबत बियाणे खरेदीची पावती, सातबारा उतारा (कपाशीची नोंद आवश्‍यक) आदी बाबी आवश्‍यक आहेत.

यामुळे कर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी जशा तालुक्‍याला चकरा माराव्या लागल्या, तसाच त्रास जी प्रकारचा अर्ज भरून घेण्यासाठी शेतकऱ्यांना सहन करावा लागेल, अशी स्थिती आहे.

कृषी मंत्रालयाची मागील पंधरवड्यात औरंगाबाद येथे आढावा बैठक पार पडल्यानंतर कापूस उत्पादकांना नुकसान भरपाई मिळावी, यासाठी जी व एच अर्ज भरून घेण्याच्या सूचना कृषी विभागाने गुरुवारी (ता.२३) दिल्या. येत्या ५ डिसेंबरपर्यंत हे जी प्रकारचे अर्ज शेतकऱ्यांना तालुका कृषी विभागातून प्राप्त करून भरायचे आहेत.

या अर्जांचा नमुना कृषी अधीक्षक कार्यालयाने तालुका स्तरीय अधिकाऱ्यांना ई-मेलने पाठविला आहे. तो डाऊनलोड करून त्याच्या प्रिंट कार्यालयात उपलब्ध करून घेण्याची जबाबदारी तालुका कृषी अधिकाऱ्यांची आहे. परंतु हे अर्ज कुठे आहेत, ही योजना नेमकी काय, याची माहिती अनेक कापूस उत्पादकांना अजूनही कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षकांनी गावात जाऊन दिलेली नसल्याची माहिती आहे.

बिले, उतारा हवा
जी प्रकारचा अर्ज भरताना कुठल्या कंपनीचे कापूस बियाणे खरेदी केले, त्याची पावती, साताबारा उतारा (कपाशीची नोंद आवश्‍यक), रहिवासी दाखला आदी माहिती आवश्‍यक आहे. यात अनेक शेतकऱ्यांकडे बिले हरविणे, ती फाटणे असे प्रकार झाले आहेत. त्यांचे अर्ज भरले जातील की नाही, याबाबतचा संभ्रम आहे.

पंचनाम्यांसाठी एच अर्ज भरणार
नुकसानग्रस्त कपाशीचे पंचनामे करण्यासाठी एच प्रकारचा अर्ज तालुकास्तरीय कर्मचारी भरतील. कृषी मंडळ अधिकारी हे पंचनामा समितीचे अध्यक्ष असून, ते एच अर्जासंबंधी अंतिम कार्यवाही करतील. पंचनाम्यासाठी प्रथम शेतकऱ्यांना कृषी विभागात तक्रार अर्ज करायचा आहे. तक्रार प्राप्त झाल्यानंतर कर्मचारी प्रत्यक्ष नुकसानग्रस्त कपाशीची पाहणी करतील व त्यासंबंधीच्या नोंदी करतील. हे पंचनामे करतानाही सातबारा उताऱ्यावर कपाशीची नोंद, बीटी बियाणे खरेदीचे पक्के बिल आवश्‍यक आहे, अशी माहिती मिळाली. जी व एच अर्ज प्रक्रिया व इतर कार्यवाही यासंबंधी कृषी विभागाने जिल्हा गुणवत्ता निरीक्षक अमित पाटील यांची नियुक्ती केल्याती माहिती मिळाली.

जी व एच अर्ज कुठे आहेत, ते कसे मिळतील, मोफत आहेत की काय, याची कुठलीही माहिती आम्हाला कृषी विभागाच्या यंत्रणेने दिलेली नाही. हा सगळा सावळा गोंधळ दिसतोय.
- बापू चौधरी, शेतकरी, खेडी खुर्द (ता. जळगाव)

इतर ताज्या घडामोडी
पिवळी डेझी लागवड कशी करावी?पिवळी डेझी (गोल्डन रॉड) हे अत्यंत कणखर पीक आहे....
निशिगंध लागवडीसाठी निचरा असलेली जमीन...निशिगंध पिकाची लागवड सोपी असून, तिचा लागवड खर्चही...
काळी मिरी कशी तयार करतात?काळी मिरीच्या वेलांची लागवड केल्यानंतर तीन...
वनस्पतींना रोगापासून वाचविण्यासाठी...वनस्पती आणि रोगकारक सूक्ष्मजीव यांच्यामध्ये...
शेतीमालाला रास्त भाव मिळेपर्यंत एल्गार...नगर : भाजप सरकार भांडवलदार उद्योगपती धार्जिणे...
शेतकरीप्रश्नी सरकारला गांभीर्य नाहीच :...पुणे  ः केंद्र आणि राज्य सरकार हेवत असून,...
शेतकऱ्यांना शहाणपणा शिकविण्याची गरज...पुणे : देशात आणि राज्यात शेतकरी तंत्रज्ञान...
एक जूनच्या संपात शेतकरी संघटना नाही :... पुणे ः देशात १ जून ते १० जूनदरम्यान पुकारण्यात...
तूर, हरभरा विक्रीचे पैसे न मिळाल्याने...नगर  : मागील दहा वर्षांतील पाच ते सहा वर्षे...
शेतकरी पाकिस्तानचा जगवायचा की भारताचानागपूर  ः पाकिस्तान सीमेवर दररोज कुरापती...
संकटे असली तरी खचून न जाता पेरणी करणारपरभणी : औंदा मोसमी पाऊस वेळेवर यावा, समद्यांची...
राज्यात ढगाळ वातावरण; तर कोकणात पावसाची...भारतीय भूखंडावरील हवेचा दाब कमी होत आहेत. अरबी...
साताऱ्यात एक कोटी सात लाख क्विंटल साखर...सातारा : जिल्ह्यातील सर्वच साखर कारखान्यांच्या...
चार जिल्ह्यांत हरभरा खरेदीला ग्रहणऔरंगाबाद : खरेदीत सातत्य नसणे, जागेचा प्रश्‍न आणि...
हंगाम तोंडावर; पीककर्जाची प्रतीक्षा...अकोला ः  खरीप हंगाम अवघा काही दिवसांवर आला...
पावसाच्या आगमनानुसार पीक नियोजनपावसाने ओढ दिल्याने पेरणीचे नियोजन चुकते. उपलब्ध...
ज्वारी उत्पादनवाढीची प्रमुख सूत्रेज्वारीची पेरणी जूनचा दुसरा आठवडा ते जुलैच्या...
पावसाने ओढ दिल्यास योग्य नियोजन करावेपुणे  ः यंदा पावसाचा चांगला अंदाज व्यक्त...
'यंदाच साल बरं राहिलं' या आशेवर खरिपाची...औरंगाबाद : जिल्ह्यातील शेतकरी खरिपाच्या अंतिम...
बुलडाण्यात यंदाही सोयाबीनवरच जोर राहणारअकोला : गेल्या हंगामात पाऊस व कीड रोगांनी...