agriculture news in Marathi, demand risen for coriander in nashik, Maharashtra | Agrowon

नाशिकमध्ये कोथिंबिरीला मागणी वाढली
ज्ञानेश उगले
मंगळवार, 31 ऑक्टोबर 2017

नाशिक बाजार समितीत कोथिंबिरीची साधारणपणे दीड लाख जुड्यांची आवक होते. मागील पंधरवड्यात ही आवक अवघी २५ ते ३० हजार इतकी झालीय. या काळात मागणी वाढल्याने तेजीचे दर मिळाले. येत्या सप्ताहात ही आवक व मागणीचे हेच चित्र राहील, अशी स्थिती आहे.
- अरुण काळे, सचिव, नाशिक बाजार समिती

नाशिक : येथील बाजार समितीत गत सप्ताहात कोथिंबिरीची ३० हजार जुड्यांची आवक झाली. या वेळी प्रति १०० जुडीस १०,००० ते १४,००० व सरासरी १२,००० रुपये दर मिळाले. कोथिंबिरीची आवक मागणीच्या २५ टक्के इतकीच आहे. या स्थितीत नाशिक जिल्ह्याबाहेरील बाजारपेठेतून मागणी वाढली आहे.

मार्केट यार्डात शुक्रवारी (ता.२७) १० ते १२ हजार रुपये शेकडा दराने कोथिंबीर विक्री झाली. पंधरा दिवसांपूर्वी जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातल्याने पालेभाज्यांसह कोथिंबीर पिकालाही त्याचा मोठा फटका बसला होता. पावसामुळे कोथिंबिरीची रोपे कुजून गेली होती. तसेच वाढही खुंटलेली होती. त्यामुळे मार्केट यार्डात होणारी आवक मोठ्या प्रमाणात घटलेली आहे.

स्थानिक बाजारपेठेसह परराज्यांतही सध्या कोथिंबिरीची मागणी अधिक आहे. मात्र कोथिंबीर मागणीच्या प्रमाणात आवक होत नसल्याने दर तेजीत आहेत. सध्या यार्डात दिवसाकाठी २५ ते ३० हजार जुड्यांची आवक होत आहे. गावठी आणि संकरित वाणाच्या काडीची कोथिंबीर टिकाऊ आणि चवीला पसंतीस उतरते.

पण, बाजारपेठेत पाठविताना कोथिंबिरीचे वाहतुकीदरम्यान नुकसान होते. त्यामुळे प्रत खराब होऊन त्याचा विक्रीवर परिणाम होतो. म्हणून स्थानिक बाजारपेठेत कोथिंबीर विक्रीला व्यापाऱ्यांकडून प्राधान्य दिले जाते. मात्र मागणी अधिक असल्याने स्थानिक बाजारपेठेत कोथिंबिरीचा तुटवडा आहे. त्यामुळे ग्राहकांना जादा दर देऊनही कोथिंबिरीच्या दोन-तीन काड्याच मिळत आहेत. सध्या जिल्ह्यातून सिन्नर, कळवण, दिंडोरी, निफाड आणि नाशिक तालुक्यातून नाशिकच्या बाजार समितीत कोथिंबिरीची आवक होत आहे. 

जुलै महिन्यात सरासरी १३,००० रुपये शेकडा दर कोथिंबिरीला मिळालेला होता. सरासरी ७०००ते ८००० रुपये दर महिनाभर तेव्हा होता. मात्र आवक कमीच होती. ऑगस्ट महिन्यात कोथिंबिरीची आवक थोडी वाढलेली होती. त्यामुळे नीचांकी दर तीन हजार रुपये शेकडा होता. सप्टेंबर महिन्यात कोथिंबिरीला गुजरात आणि मध्य प्रदेश या राज्यांतून मागणी वाढलेली होती. त्यामुळे या महिन्यात कोथिंबिरीची आवक चांगली असूनही दर तेजीत होते.

ऑक्टोबर महिन्याच्या सुरवातीला पावसाची उघडीप होती. नंतर परतीच्या पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले. त्यात कोथिंबिरीचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे सध्या मार्केट यार्डात कोथिंबिरीची २५ ते ३० हजार जुड्यांची आवक होत आहे. मागणी आठपट असल्याने कोथिंबिरीला १०,००० ते १४,००० रुपये सरासरी दर मिळत आहे.

इतर ताज्या घडामोडी
बारामतीतील विकासाचे काम देशातील...बारामती : ग्रामीण विकासाच्या माध्यमातून सामान्य...
मराठवाड्यात पीककर्ज वितरण कासवगतीनेऔरंगाबाद : आढावा बैठकींचा सपाटा, काही ठिकाणी...
‘बोंड अळी व्यवस्थापनाचा महाराष्ट्र...परभणी : कपाशीवरील गुलाबी बोंड अळीच्या...
रताळ्याच्या पिठापासून ‘अ’...टांझानियातील एका खासगी कंपनीने ‘अ’ जीवनसत्त्वांनी...
पोकराअंतर्गत ८४ गावांत आंतरपीक...परभणी : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत...
पीककर्ज वाटपाचा टक्का वाढेनाअकोला  : शेतकऱ्यांना पीककर्ज वाटपाच्या...
‘एकात्मिक व्यवस्थापनातून एकरी १०० टन ऊस...आळेफाटा, जि. पुणे : मातीपरीक्षणानुसार खतांचा...
फुलपिके लागवडीसाठी हवी निचऱ्याची जमीनखरीप हंगामात पाऊस भरपूर पडत असल्याने हा हंगाम...
कुलगुरू भट्टाचार्य यांचा राजीनामा अखेर...पुणे : दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी...
नाशिक बाजार समिती संचालकांवर गुन्हे...नाशिक : आचारसंहिता काळात शासकीय वाहनाचा वापर...
‘प्रलंबित वीजजोडणीसाठी मोबाईल नोंदणी...मुंबई : मार्च-२०१८ अखेर राज्यात...
पुणे जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन...पुणे : जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या...
ऊस उत्पादनवाढीसाठी तंत्रज्ञान...पुणे ः सहकारी साखर कारखाने शक्तिस्थळे असून,...
सातारा जिल्ह्यात सर्वदूर पाऊस; चार...सातारा : जिल्ह्यात दडी मारलेल्या पावसाने...
शेतकऱ्यांनी अपघात विमा योजनेचा लाभ...सातारा : राज्यातील सातबारा उताराधारक...
नगर जिल्ह्यात बियाण्यांची अवघी दहा...नगर ः खरिपासाठी जिल्ह्यामध्ये मागील तीन वर्षांची...
सांगली जिल्हा बॅंकेकडून २९८ कोटींचे...सांगली : खरीप हंगामाची तयारी सुरू झाली असताना...
तूर नोंदणीपासून वंचित ठेवल्याचा खुलासा...नगर : शेवगाव बाजार समितीअंतर्गत सुरू...
कोल्हापूर जिल्ह्याचा ३६५ कोटींचा योजना...कोल्हापूर : जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत या...
कुपोषण मुक्तीसाठी शेतकऱ्याने शेवगा...नाशिक  : कुपोषण निर्मूलनाच्या कार्यास आपलाही...