agriculture news in marathi, Demand for starting closed-factory factories on co-operative basis | Agrowon

बंद अवस्थेतील कारखाने सहकारी तत्त्वावर सुरू करण्याची मागणी
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 21 सप्टेंबर 2018

जळगाव : जिल्ह्यात काही साखर कारखाने एकेकाळी जोमात सुरू होते. ऊस उत्पादनातही जिल्हा आघाडीवर होता. परंतु घटते उसाचे क्षेत्र व सहकरातील अनागोंदी यामुळे अनेक कारखाने बंद पडले. त्यांच्या विक्रीसाठी कारखान्यांचे माजी संचालक, स्थानिक नेते खासगी कंपन्या, उद्योजकांशी संपर्क साधत आहेत. परंतु हे कारखाने खासगी मंडळीला न सोपविता संबंधित तालुक्‍यातील शेतकरी कंपन्या, शेतकरी मंडळे यांना द्यावेत. शेतकरी, उद्योजक यांच्या भागीदारीने हे कारखाने चालवावेत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

जळगाव : जिल्ह्यात काही साखर कारखाने एकेकाळी जोमात सुरू होते. ऊस उत्पादनातही जिल्हा आघाडीवर होता. परंतु घटते उसाचे क्षेत्र व सहकरातील अनागोंदी यामुळे अनेक कारखाने बंद पडले. त्यांच्या विक्रीसाठी कारखान्यांचे माजी संचालक, स्थानिक नेते खासगी कंपन्या, उद्योजकांशी संपर्क साधत आहेत. परंतु हे कारखाने खासगी मंडळीला न सोपविता संबंधित तालुक्‍यातील शेतकरी कंपन्या, शेतकरी मंडळे यांना द्यावेत. शेतकरी, उद्योजक यांच्या भागीदारीने हे कारखाने चालवावेत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

बंद पडलेला मुक्ताई कारखाना सुरू झाल्याने या भागात उसाचे क्षेत्र वाढून शेतकऱ्यांना त्याचा लाभ होईल. कारण तो स्थानिक शेतकऱ्यांच्या मदतीने चालविला जात आहे. असाच निर्णय चाळीसगावमधील बेलगंगा कारखान्यासंबंधी घेण्यात आला. आजघडीला गिरणा पट्ट्यात हा कारखाना सुरू होईल, याचा आनंद शेतकरी व्यक्त करीत आहेत.
सध्या गोंडखेल (ता. जामनेर) येथील कारखाना विक्रीसंबंधीची चर्चा सुरू आहे. परंतु शेतकरी, सहकारी या भागीदारीने सुरू करण्याची मागणी होत आहे. गोंडखेल ग्रामपंचायतीने हा कारखाना खासगी मंडळीच्या ताब्यात जायला नको, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

चोपडा येथील सहकारी साखर कारखाना शेतकऱ्यांच्या पुढाकाराने, स्थानिक नेत्यांच्या सहमतीने सुरू होत आहे. तो जेमतेम स्थितीत तग धरून राहण्यासाठी जिल्ह्यातील नेतृत्वाने, बॅंकांनी पुढाकार घ्यावा. एरंडोल तालुक्‍यातील वसंत सहकारी साखर कारखानाही अनेक वर्षांपासून बंद आहे. सध्या उसाचे क्षेत्र वाढू लागले आहे. कापूस कमी होत आहे. केळीही पुढे कदाचीत कमी होईल. मग उसाच्या पिकाचा पर्याय चांगला राहू शकतो. या स्थितीत जिल्ह्यात साखर कारखाने अधिकाधिक संख्येने सुरू व्हावेत, अशी अपेक्षा शेतकरी रंगराव पाटील (भडगाव) यांनी व्यक्त केली आहे.

इतर ताज्या घडामोडी
कळमणा बाजार समितीत हरभरा ४१०० रुपयांवरनागपूर ः स्थानिक कळमणा बाजार समितीत हरभरा वगळता...
सोलापुरात हिरवी मिरची, टोमॅटोच्या दरात...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
शेतकरी सन्मान योजनेत रत्नागिरीतील आठ...रत्नागिरी : पंतप्रधान शेतकरी सन्मान...
कीटकशास्‍त्र विभागातर्फे ट्रायकोकार्ड...परभणी ः येत्या हंगामात मराठवाड्यातील औरंगाबाद,...
फळबाग योजनेतील अटी कोकणासाठी शिथिल करू...रत्नागिरी ः भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड...
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानाची...नाशिक : मागील वर्षी लाल कांद्याचे भाव पडल्याने...
कपाशीचा नांदेड ४४ बीटी वाण लोकार्पण हा...परभणी  : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
पावसाला उशीर झाल्याने चिंतेचे ढग गडदनांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत यंदा...
कृषी विद्यापीठाच्या वाणांच्या...रत्नागिरी ः डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी...
परभणी, हिंगोलीतील दूध उत्पादकांच्या... परभणी  ः शासकीय दूध योजनेअंतर्गत परभणी...
विदर्भातील कृषी विकासाला बाधक ठरतोय...नागपूर   ः सत्ताकेंद्र विदर्भात असताना...
आवक कमी झाल्याने भाजीपाल्याच्या दरात वाढपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
उदारीकरणाच्या नावाखाली उत्पादन...पुणे   : देशात १९९१ मध्ये...
विधिमंडळाचे आजपासून पावसाळी अधिवेशनमुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी...
दुष्काळ, पीकविम्याचे आठ हजार कोटी...मुंबई ः लोकसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर...
दुष्काळ, मंत्र्यांचे भ्रष्टाचार, आरक्षण...मुंबई : राज्यात भीषण दुष्काळ आहे, त्यामुळे...
मॉन्सूनची सिक्कीम, पश्चिम बंगालपर्यंत...पुणे : अरबी समुद्रात गुजरातच्या किनाऱ्यावर...
'टीम देवेंद्र'चा विस्तार; विखे पाटील,...मुंबई : आगामी विधानसभा निवडणूक ऐन तोंडावर आली...
ऊस बिलासाठी शेतकऱ्यांचा पाचपुतेंच्या...श्रीगोंदे : काष्टी येथील माजी मंत्री बबनराव...
खरेदीदारांच्या इच्छेवर पॅकेजिंगचा पडतो...एखादा खाद्यपदार्थ लोकांना आकर्षित ...