agriculture news in marathi, demand a subsidy for milk producers, nagar, maharashtra | Agrowon

दूध उत्पादकांना प्रतिलिटर पाच रुपये अनुदान द्यावे : खासदार शेट्टी
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 28 जून 2018

नगर : सरकार दूध उत्पादकांबाबत उदासीन आहे. सध्या निर्माण झालेली परिस्थिती ही नैसर्गिक आपत्ती नाही. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे ऊस, दुधाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. दूध संस्था, संघांना अनुदान देण्याऐवजी शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रतिलिटर पाच रुपये अनुदान जमा करावे, अशी मागणी खासदार राजू शेट्टी यांनी केली. दूध प्रश्‍नी पुण्यात शुक्रवारी (ता.२९) मोर्चा काढणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

नगर : सरकार दूध उत्पादकांबाबत उदासीन आहे. सध्या निर्माण झालेली परिस्थिती ही नैसर्गिक आपत्ती नाही. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे ऊस, दुधाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. दूध संस्था, संघांना अनुदान देण्याऐवजी शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रतिलिटर पाच रुपये अनुदान जमा करावे, अशी मागणी खासदार राजू शेट्टी यांनी केली. दूध प्रश्‍नी पुण्यात शुक्रवारी (ता.२९) मोर्चा काढणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे तिसगाव (ता. पाथर्डी) येथे बुधवारी (ता. २७) शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर, अंबादास कोरडे, हंसराज वडघणे, घनश्‍याम चौधरी, महिला जिल्हाध्यक्ष स्नेहल फुंदे, दत्तात्रय फुंदे, बाळासाहेब फटांगडे, अशोक ढगे, शरद मरकड यांच्यासह पदाधिकारी आणि शेतकरी या वेळी उपस्थित होते.

खासदार शेट्टी म्हणाले, की भारताने पाकिस्तानमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राइक केले होते. त्या वेळी पाकिस्तानने देशप्रेम दाखवत भारतातील टोमॅटो घेण्यास नकार दिला. भारतातून मात्र देशप्रेम अजिबात पुढे येत नाही. आम्हाला त्यांची साखर चालते. पाकिस्तानची साखर आणून येथील साखरेचे दर पाडले. देश आणि राज्यात शेती आणि शेतकऱ्यांबाबत चुकीचे धोरण राबवले जात आहे. त्याचा फटका ऊस, दुधासह अन्य शेतीमालालाही बसला आहे. दुधाचा प्रश्‍न सोडवायचा असेल, तर प्रतिलिटर पाच रुपये अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावे.

खासदार राजू शेट्टी म्हणाले, की नगर जिल्हा आणि सांगली, सातारा, कोल्हापूर भागातील उसाच्या दरात तफावत आहे. आमच्या भागात गाईच्या दुधाला २३ ते २४ रुपये दर मिळतो. येथेच दूध, उसाला दर का कमी मिळतो, याचा शेतकऱ्यांनी विचार करायला पाहिजे. नगरमधील शेतकऱ्यांनाही चांगला दर पाहिजे असेल, तर त्यांना रस्त्यावर येऊन संघर्ष करावा लागेल. येथील राजकारण्यांना गुडघे टेकावे लागतील, अशी परिस्थिती निर्माण करा, तरच तुमची कदर होईल.

यावेळी खासदार शेट्टी यांनी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे नाव न घेता त्यांना आपल्या भाषणातून टोला मारला. ते म्हणाले, मी आयुष्यभर शेतकऱ्यांसाठी लढणारा माणूस आहे. मला काही मिळावे याची अपेक्षा केली नाही. मी कार्यकर्त्यांना न्याय देतो. ज्या कार्यकर्त्यांना संधी मिळाली त्यांनी मात्र चळवळ आणि शेतकरी हित सोडले. त्यांना आता लोकांमध्ये जाऊन फिरताही येत नाही. त्यांची शेतकऱ्यांमध्ये जाऊन बोलण्याची हिंमत नाही, अशी या सरकारची वाईट अवस्था झाली आहे.

 

इतर ताज्या घडामोडी
जळगावात दादरला ३१०० रुपयांपर्यंत दरजळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दादरची (...
भारतीयांच्या पचनसंस्थेतील...भारतीय लोकांच्या पचनसंस्थेमध्ये कार्यरत...
अमरावती विभागाला पाणीटंचाईच्या झळाबुलडाणा : कमी पावसामुळे अमरावती विभागातील...
तूर विक्रीच्या नोंदणीकडे शेतकऱ्यांची...अकोला  : या हंगामात शेतकऱ्यांनी पिकविलेल्या...
शेतकरी, जवान अडचणीत : भुजबळनाशिक : सध्याच्या सरकारच्या काळात देशातील...
दुष्काळात खचू नका, शासन पाठीशी :...सोलापूर : दुष्काळी परिस्थितीमुळे पाणी,...
शेतकऱ्यांच्‍या थकवलेल्या पैशांची...पुणे ः शेतीमालाचा लिलाव झाल्यानंतर २४ तासांत पैसे...
नगर जिल्हा परिषदेचा यंदा ४४ कोटी...नगर : जिल्हा परिषदेत सोमवारी झालेल्या सर्वसाधारण...
नांदेड परिमंडळात सौर कृषिपंप योजनेसाठी...नांदेड ः मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेअंतर्गत...
शेतीमाल तारण योजनेत ४०६ शेतकऱ्यांनी...औरंगाबाद : मराठवाड्यातील जालना, परभणी व हिंगोली...
ऊस उत्पादक शेतकरी देणार शहिदांच्या...कोल्हापूर : पुलवामा जिल्ह्यातील दहशतवादी हल्ल्यात...
तूर खरेदीतील अनागोंदीविरुद्ध आंदोलनअकोला  ः जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यात...
'पुलवामा'चा सूत्रधार काश्‍मीरमध्येच?नवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा...
उन्हाळी पिकातील खतांचे व्यवस्थापनउन्हाळी हंगामात प्रामुख्याने भुईमूग, सूर्यफूल,...
केम प्रकल्पाला लागली भ्रष्टाचाराची वाळवीअमरावती : अंमलबजावणीपेक्षा गैरव्यवहार व...
‘पेंच’ लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना १३...नागपूर : मध्य प्रदेशातील चौराई प्रकल्पामुळे पेंच...
‘एसटी’साठी जागा आठ हजार अन्‌ अर्ज ४१...सोलापूर : राज्य परिवहन महामंडळात चालक व...
दररोजचा दोनशे टन द्राक्षपुरवठा ठप्पपिंपळगाव बसवंत, जि. नाशिक : जम्मू-काश्‍...
'देशात आयात होणाऱ्या सोयाबीनवर बंदी...पुणे : देशांतर्गत दर वाढत असल्याने...
बांबू उत्पादन, गुंतवणूक संधीसाठी...मुंबई : देशातील बांबू लागवडीला चालना देण्याबरोबरच...