agriculture news in Marathi, demand for transparency in implementation of crop insurance scheme, Maharashtra | Agrowon

पीकविमा योजनेत पारदर्शकता आणा : द्राक्ष उत्पादकांची मागणी
ज्ञानेश उगले
गुरुवार, 19 ऑक्टोबर 2017

नाशिक : सदोष पीकविमा योजनेचा शेतकऱ्यांना लाभ होत नाही. त्यात पारदर्शकता व सुटसुटीतपणा आणा, अशी मागणी द्राक्ष बागायतदार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्रीय कृषी सचिव पटनाईक यांच्याकडे केली.

नाशिक : सदोष पीकविमा योजनेचा शेतकऱ्यांना लाभ होत नाही. त्यात पारदर्शकता व सुटसुटीतपणा आणा, अशी मागणी द्राक्ष बागायतदार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्रीय कृषी सचिव पटनाईक यांच्याकडे केली.

बागाईतदार व निर्यातदार यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्रालयाचे सचिव पटनाईक, संचालक अश्विनीकुमार, कृषी विभागाचे अधिकारी एन. के. सिंग यांच्या प्रमुख उपस्थितीत चितेगाव येथील एनएचआरडीएफच्या कार्यालयात नुकतीच बैठक झाली. या वेळी द्राक्ष निर्यातदार संघटनेचे अध्यक्ष जगन खापरे, महाराष्ट्र द्राक्ष बागाईतदार संघाचे अध्यक्ष सुभाष आर्वे, खजिनदार महेंद्र शाहीर, मध्य विज्ञान समितीचे अध्यक्ष कैलास भोसले, अशोक गायकवाड, अरुण मोरे सहभागी झाले होते.

बैठकीत खापरे यांनी युरोपमध्ये द्राक्ष निर्यात करताना भारताला युरोपकडून लागणारा टॅक्स व भारताची ज्या देशाशी स्पर्धा आहे, त्या चिली देशाला लागणारा टॅक्स यात मोठी तफावत असल्याचे सांगितले. टॅक्स जास्त लावला जात असल्यामुळे स्पर्धा करताना हा टॅक्स भारतीय उत्पादकांना जास्त भरावा लागतो. तो कमी करण्यासाठी केंद्राने प्रयत्न करावेत, अशी प्रमुख मागणी त्यांनी केली. उपस्थित द्राक्ष निर्यातदार व द्राक्ष बागाईतदार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्रीय कृषी सचिवांसमोर ११ मागण्या ठेवल्या.

त्यात द्राक्षांच्या नवीन जातींच्या निर्मितीसाठी गती द्यावी, बांगलादेशाचे आयात शुल्क, राष्ट्रीय विकास योजनेला गती द्यावी, केंद्राने अर्थसाह्य निधी कमी केला आहे त्याचा फेरविचार व्हावा, विमा प्रकारात पारदर्शकता यावी, द्राक्ष निर्यात करताना सहभागी घटकांना प्रशिक्षण आयोजित करणे अशा मागण्या मांडण्यात आल्या. या मागण्यांचा अग्रक्रमाने सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिल्ली येथून आलेल्या अधिकारी वर्गाने दिल्याचे खापरे व भोसले यांनी सांगितले.

इतर बातम्या
महारेशीम नोंदणीला अकोला, वाशीममध्ये...अकोला :  रेशीम शेती आणि उद्योगास प्रोत्साहन...
मुख्यमंत्री फडणवीस साधणार ‘लोक संवाद’ पुणे ः शासनाच्या विविध योजना गरजूंपर्यंत...
मराठवाड्यात महारेशीम अभियानाला सुरवात औरंगाबाद ः रेशीम उद्योगातून शेतकऱ्यांचे जीवनमान...
जळगावमधील सर्वच तालुके दुष्काळीजळगाव : जिल्ह्यातील सर्व गावांची अंतिम पैसेवारी...
‘पिंपळगाव खांड’तून पिण्यासाठी आवर्तनलिंगदेव, जि. नगर : मुळा नदीवरील पिंपळगाव खांड (ता...
पुणे विभागात रब्बीची अवघी ३४ टक्के पेरणीपुणे ः पावसाळ्यात कमी झालेल्या पावसामुळे गेल्या...
परभणीची खरिपाची अंतिम पैसेवारी ४४.६९...परभणी ः परभणी जिल्ह्याची खरीप हंगामाची अंतिम...
धुळे, नंदुरबार जिल्ह्यांत ९० विहिरींचे...धुळे : पाणीटंचाईची तीव्रता धुळे, नंदुरबार...
कोल्हापूर जिल्ह्यात वाढती थंडी रब्बी...कोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून...
कॅनॉल दुरुस्तीची कामे आता जलयुक्‍त...वर्धा : जलसंधारण आणि जलसंपदा विभागाच्या...
सोलापूर कृषी समितीच्या बैठकीत...सोलापूर : गुजरातमध्ये राबविण्यात येणाऱ्या कृषी...
कांदा, भाजीपाला वाटला मोफतचांदवड, जि. नाशिक : कांद्यासह भाजीपाला व इतर...
पालखेडच्या आवर्तनास जिल्हाधिकाऱ्यांचा...येवला, जि. नाशिक : पालखेड डाव्या कालव्यावरील...
एफआरपी थकविणाऱ्या कारखान्यांचे होणार...सोलापूर : यंदाच्या गाळप हंगामात संबंधित...
औरंगाबादमध्ये २७ डिसेंबरपासून ‘ॲग्रोवन’...पुणे  : राज्यातील शेतकऱ्यांना तंत्रज्ञान व...
पावसातही शेतकऱ्यांचा आम नदीपात्रात...वेलतूर, नागपूर : टेकेपार येथील शेतकऱ्यांनी...
स्वाभिमानीचे डफडे बजाओ आंदोलनबुलडाणा ः दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत, सोयाबीन...
विदर्भातील तीन जिल्हा बँकांचे विलीनीकरण...मुंबई: राज्यातल्या सामान्य शेतकऱ्यांच्या...
किमान तापमानात वाढ पुणे  : ‘पेथाई’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे...
मराठवाड्यातील दुष्काळाची पैसेवारीने...औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील ८५३३...