सोलापूरच्या शेतकऱ्याची सांगलीत डाळिंबाची थेट विक्री

व्यापाऱ्याला डाळिंब दिल्यास अडत, सेस कमिशन भरपूर जाते. हातात काहीच राहत नाही. व्यापाऱ्याला मोठे करण्यापेक्षा चार पैसे मिळण्यासाठी थेट विक्रीचा पर्याय अधिक चांगला आहे. - शंकर सीताराम सरगर, कोळा, जि. सोलापूर.
सोलापूरच्या शेतकऱ्याची सांगलीत डाळिंबाची थेट विक्री
सोलापूरच्या शेतकऱ्याची सांगलीत डाळिंबाची थेट विक्री

सांगली : डाळिंब घ्या... डाळिंब, शंभर रुपयाला चार किलो... अशी आरोळी ध्वनिक्षेपकावरून कानावर पडत होती. ग्राहकांची डाळिंब खरेदीसाठी झुंबड उडली होती. ठिकाण होते, शहरातील स्टेशन चौक. कोळा (ता. सांगोला) येथील डाळिंब उत्पादक शेतकरी शंकर सरगर सांगली आणि कोल्हापूर येथील आठवडा बाजारात पाच टनाची डाळिंबाची विक्री करतात. थेट विक्रीचा मार्ग निवडल्याने या ठिकाणी डाळिंबाचा समाधानकारक दर मिळतोय, अशी त्यांची भावना आहे.   सांगलीतील बाजार समितीत डाळिंबाची विक्री करण्यासाठी सरगर आले होते. मात्र दर मिळाला नाही. सरगर म्हणाले, ‘‘ ‘दीड टन डाळिंबानं गाडीत भरून सकाळी आठ वाजता सांगलीत आलो. बाजार समितीत सौदे सुरू झाले. मात्र अपेक्षित दर मिळाला नाही. त्यामुळे थेट सांगलीच्या मुख्य चौकात गाडी उभी केली. दुपारपर्यंत एक टन डाळिंबाची विक्री झाली. चार दिवसांपासून येथे डाळिंब विक्रीसाठी येतोय. ग्राहकांची खरेदीसाठी गर्दी होते.``

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com