agriculture news in marathi, Demonstrated the Importance of Improved Technology by Demonstrations | Agrowon

प्रात्यक्षिकांनी सुधारित तंत्रज्ञानाचे महत्त्व अधोरेखित
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 25 सप्टेंबर 2018

जालना : सुधारित तंत्रज्ञानाचा व नवीन वाणाच्या वापराने सुधारित तंत्रज्ञानाचे महत्त्व, शेतीत शेतकऱ्यांनी करावयाचे बदल व त्यामुळे होणाऱ्या फायद्यांचे महत्त्व अधोरेखित केले. राष्ट्रीय तेलताड अभियानांतर्गत परतूर तालुक्‍यातील बाबुलतारा येथे शनिवारी (ता. २२) सोयाबीन शेतीदिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.

जालना : सुधारित तंत्रज्ञानाचा व नवीन वाणाच्या वापराने सुधारित तंत्रज्ञानाचे महत्त्व, शेतीत शेतकऱ्यांनी करावयाचे बदल व त्यामुळे होणाऱ्या फायद्यांचे महत्त्व अधोरेखित केले. राष्ट्रीय तेलताड अभियानांतर्गत परतूर तालुक्‍यातील बाबुलतारा येथे शनिवारी (ता. २२) सोयाबीन शेतीदिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.

बाबुलतारा येथील सरपंच सरस्वताबाई घाटुळे यांच्यासह उपविभागीय कृषी अधिकारी एस. एस. कोयले, मंडळ कृषी अधिकारी एस. बी. डुकरे, कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख एस. व्ही. सोनुने, पीकसंरक्षण तज्ज्ञ अजय मिटकरी, गृहविज्ञान तज्ज्ञ श्रीमती एस. आर. गायकवाड आदींची या वेळी प्रमुख उपस्थिती होती.

कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख एस. व्ही. सोनुने यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्यांनी कृषी विज्ञान केंद्रामार्फत बाबुलतारा येथे २५ एकरावर सोयाबीनच्या एमएयूएस १६२ या सुधारित वाणाचे प्रात्यक्षिक घेण्यात आले आहेत. या प्रात्यक्षिकामध्ये सुधारित वाणाबरोबर मातीपरीक्षणाआधारित खत व्यवस्थापन, जैविक खताचा वापर, दोन ओळींमधील अंतर १८ इंच ठेवून झाडांची संख्या योग्य ठेवणे आदी मुद्यांवर भर देण्यात आल्याची माहिती दिली.

इतर बातम्या
अळिंबी, स्पॉन्सच्या नावीन्यपूर्ण...सर्व वयोगटातील लोंकासाठी अळिंबी हे अत्यंत पोषक...
शेतीमाल विक्रीसाठी १२ शेतकऱ्यांची नोंदणीसांगली ः सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उडीद, मूग...
नांदेड, परभणी, हिंगोलीत मूग, उडदाला कमी...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोलीतील कृषी उत्पन्न...
गिरणारे बाजारातील बेहिशेबी वसुलीला चापनाशिक : गिरणारे (ता. जि. नाशिक) येथील टोमॅटो...
सोलापुरात दूधदराच्या अनुदानाची...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील दूध उत्पादकांना...
कडधान्य कवडीमोल दरात व्यापाऱ्यांच्या...जळगाव : कडधान्याचा हंगाम येऊन एक महिना झाला;...
आटपाडी, खानापुरातही मंत्र्यांचा धावता...सांगली : ते आले... त्यांनी पाहिलं... आणि पुढं...
सकाळी गारठा, तर दुपारी चटकापुणे : राज्यात कमाल तापमान पस्तीशीपार गेले...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...नांदेड ः जमिनीत पुरेशा प्रमाणात ओलावा नसल्यामुळे...
कामगारांच्या प्रश्नी चाळीस साखर...सोलापूर  : सोलापूरसह उस्मानाबाद व लातूर...
मुग, उडीद विक्रीत शेतकऱ्यांना ३३०...पुणे ः शासनाची हमीभावाने खरेदीसाठी नोंदणीच सुरू...
भारतात ३६५ लाख गाठी कापूस होणारमुंबई ः भारतात मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कापूस...
सरकारला दुष्काळचे गांभीर्य ः चंद्रकांत...नगर: राज्यात साधारण दोनशे तालुक्यांत दुष्काळसदृश...
खरिपात उत्पादनात घट; हमी दरही मिळेनाऔरंगाबाद : खरिपातील प्रमुख पिकांपैकी मूग, उडीद...
तासगाव बाजार समितीत बेदाण्याची आवक,...सांगली  ः दिवाळी सणाच्या पार्श्‍वभूमीवर...
नांदेड, हिंगोली, परभणीतील बारा...नांदेड   ः दुष्काळ व्यवस्थापन संहितेनुसार...
विसावी सिंचन परिषद अकोला येथे होणारसोयगाव, जि. औरंगाबाद   : येथे रविवारी (ता....
वऱ्हाडात मूग, उडदाला मिळतोय...अकोला  ः या हंगामात लागवड झालेल्या मूग,...
नगर जिल्ह्यात उडदाचे उत्पादन घटलेनगर  ः जिल्ह्यात यंदा सुरवातीपासून पाऊस...
‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी दाखवले...नगर  : शेतकऱ्यांना दुधाला पाच रुपये अनुदान...