agriculture news in marathi, deregulating pulses beneficial to traders? | Agrowon

कडधान्य नियमनमुक्ती व्यापाऱ्यांच्या फायद्याची?
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 28 नोव्हेंबर 2017

पुणे : फळे-भाजीपाला नियमनमुक्तीची प्रभावी अंमलबजावणी अभावी शेतकऱ्यांची हाेणारी लूट राेखण्यास सरकार अपयशी ठरल्यानंतर, आता कडधान्य नियमनमुक्त करण्याच्या हालचाली सरकारकडून सुरू आहेत. मात्र कडधान्य नियमनमुक्ती व्यापाऱ्यांच्या फायद्यासाठी हाेणार असल्याने पणन संचालकांनी नियमनमुक्ती शेतकरी हिताची ठरणार नसल्याचा अभिप्राय अहवाल दिल्याचे समजते. कडधान्य नियनमुक्तीमुळे साठेबाजी वाढीबराेबरच शेतकऱ्यांची माेठ्या प्रमाणावर फसवणूक हाेण्याची भीतीदेखील व्यक्त करण्यात येत अाहे.

पुणे : फळे-भाजीपाला नियमनमुक्तीची प्रभावी अंमलबजावणी अभावी शेतकऱ्यांची हाेणारी लूट राेखण्यास सरकार अपयशी ठरल्यानंतर, आता कडधान्य नियमनमुक्त करण्याच्या हालचाली सरकारकडून सुरू आहेत. मात्र कडधान्य नियमनमुक्ती व्यापाऱ्यांच्या फायद्यासाठी हाेणार असल्याने पणन संचालकांनी नियमनमुक्ती शेतकरी हिताची ठरणार नसल्याचा अभिप्राय अहवाल दिल्याचे समजते. कडधान्य नियनमुक्तीमुळे साठेबाजी वाढीबराेबरच शेतकऱ्यांची माेठ्या प्रमाणावर फसवणूक हाेण्याची भीतीदेखील व्यक्त करण्यात येत अाहे.

फळे भाजीपाला नियमनमुक्तीनंतर सरकारने अन्नधान्य, कडधान्य नियमनमुक्त करण्यासाठी पणन राज्यमंत्री सदाभाऊ खाेत यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. या समितीच्या विविध बैठका झाल्या असून, अंतिम बैठक आज मंगळवारी (ता. २८) मुंबईत हाेत आहे.

राज्यात प्रामुख्याने विदर्भ आणि मराठवाड्यातील सुमारे १५० बाजार समित्यांमधून कडधान्यांची सुमारे तीन हजार काेटींची उलाढाल हाेत आहे. सध्या कडधान्यावरील अडत ही खरेदीदारांकडून १ ते ३ टक्के घेतली जाते. तर व्यापाऱ्यांना १ टक्के बाजार शुल्क भरावे लागत आहे. उलाढालीत खरेदीदारांना वर्षाला सुमारे ६० काेटी आणि बाजार शुल्काद्वारे ३० काेटी रुपये द्यावे लागतात. यामध्ये शेतकऱ्यांचा कुठलीही झळ बसत नाही, असे असताना शेतकऱ्यांच्या नावाखाली व्यापाऱ्यांच्या फायद्यासाठी कडधान्य नियमनमुक्तीचा घाट घातला जात असल्याचे मत पणन विभागाकडून व्यक्त हाेत आहे.

कडधान्याची मराठवाड्यातील सर्वांत माेठी बाजारपेठ असलेल्या लातूर बाजार समितीची वार्षिक उलाढाल सुमारे दीड हजार काेटींची आहे. बाजार समितीमध्ये खरेदीदारांकडून २ टक्के अडत घेतली जाते. नियमनमुक्ती झाल्यानंतर बाजार समितीचे बाजार शुल्काद्वारे मिळणारे सुमारे ८० लाखांचे उत्पन्न बंद हाेणार आहे. यामुळे नियमनमुक्तीचा निर्णय बाजार समित्या आणि शेतकऱ्यांसाठी धाेकादायक ठरण्याची भूमिका पणन संचालनालयाद्वारे व्यक्त हाेत आहे.

नियमनमुक्तीचे दुष्परिणाम

  • अन्नधान्याच्या व्यवहारांची नाेंद कुठेच हाेणार नसल्याने शासनाच्या विविध याेजना राबविताना अडचणी
  • अन्नधान्याच्या साठ्यांवरील शासनाचे नियंत्रण उठणार
  • व्यापाऱ्यांकडून साठेबाजी वाढणार
  • थेट बांधावर खरेदी व्यवहारातील रकमेची हमी काेण घेणार
  • शेतकऱ्यांच्या फसवणुकीचे धाेके
  • सध्या खरेदीदारांकडूनच अडत घेतली जात असल्याने शेतकऱ्यांचा काहीही ताेटा नाही.

इतर ताज्या घडामोडी
मार्चअखेरपर्यंत टप्प्याटप्याने... मंदीतील ब्रॉयलर्सचा बाजार मार्चअखेरपर्यंत...
पुण्यात लसूण, फ्लॉवर, मटार वधारलापुणे ः वाढता उन्हाळ्यामुळे शेतीमालाचे उत्पादन...
चीनमध्ये डेअरी उत्पादनांच्या मागणीमध्ये...चीनमध्ये डेअरी उत्पादनांच्या मागणीमध्ये प्रति...
राहुल गडपाले ‘सकाळ’चे चीफ कन्टेंट क्‍...पुणे : सकाळ माध्यम समूहाच्या संपादक संचालकपदी...
सत्तावीस कारखान्यांकडून १ कोटी २१ लाख... नगर  ः नगर, नाशिक जिल्ह्यांत सुरू असलेल्या...
पुणे जिल्ह्यातील १०० मंडळांमध्ये... पुणे  ः हवामान अंदाजाबाबत अचूक माहिती...
लाचखोर तालुका कृषी अधिकारी 'लाचलुचपत'...अकोला : जलसंधारणाच्या केलेल्या कामांची देयके...
परभणी जिल्ह्यातील चार लघू तलाव कोरडे परभणी ः पाणीसाठा संपुष्टात आल्यामुळे...
स्वखर्चाने शेततळे करणाऱ्यांना मिळेना...औरंगाबाद : शेतीला पाण्याची सोय व्हावी म्हणून...
कोल्हापुरात गुळाचे पाडव्यानिमित्त सौदे कोल्हापूर : येथील बाजार समितीत पाडव्यानिमित्त...
साखरेप्रमाणे कापसासाठी धाेरण ठरवावे :...पुणे : साखरेप्रमाणेच कापसासाठी दरावर लक्ष कें....
राज्यात आज अन्नत्याग आंदोलनमाळकोळी, नांदेड ः आजवर आत्महत्या केलेल्या...
'ईव्हीएम'ऐवजी आता मतपत्रिकांचा वापर...नवी दिल्ली : आगामी निवडणुकांमध्ये इलेक्‍...
राज-पवार भेटीने चर्चेला उधाणमुंबई : दिल्ली येथे कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी...
परभणीत ढोबळी मिरची १२०० ते १८०० रुपये... परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...
औरंगाबाद येथे मोसंबी २००० ते ४५०० रुपये औरंगाबाद  : येथील बाजार समितीमध्ये शनिवारी...
कृषी सल्लामार्च महिन्यात उन्हाळी भुईमूग पिकाची पेरणी करू...
पशू सल्लागोठ्यातील अस्वच्छतेमुळे बऱ्याचदा दुधाळ जनावरांना...
सांगलीतील द्राक्ष, बेदाणा उत्पादक ढगाळ... सांगली : गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ...
जळगावमधील शेतकऱ्यांचा परदेश अभ्यास दौरा... जळगाव : परदेशातील शेतीचे तंत्रज्ञान, शेती,...