नाशिक जिल्ह्यात सर्वदूर पाऊस

नाशिक जिल्ह्यात सर्वदूर पाऊस
नाशिक जिल्ह्यात सर्वदूर पाऊस
नाशिक : नाशिक जिल्ह्यात सर्वदूर पावसाने खरिपाला दिलासा मिळाला आहे. बुधवारी (ता. २२) नाशिक जिल्ह्यात सरासरी २२.१६ मिलिमीटर पाऊस झाला. मालेगाव, देवळा, बागलाण, निफाड या तालुक्‍यांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होत आहे. या भागात जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. या शिवाय उर्वरित तालुक्‍यांत जोरदार पाऊस सुरू असल्याने त्याचा खरिपाला जीवदान मिळण्यात, तसेच धरणसाठा वाढण्यास मदत झाली आहे. जिल्ह्यातील धरणे जवळपास ७५ टक्के भरली आहेत.
जिल्ह्यातील एकूण २४ प्रकल्पांत चांगला पाणीसाठा वाढला आहे. या धरणांच्या क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने त्याचा उपयोग साठा वाढण्यासाठी झाला आहे. जिल्ह्यात ७ मोठे तर, १७ मध्यम प्रकल्प आहेत. त्यांची एकूण क्षमता ६५,८१४ दशलक्ष घनफूट इतकी आहे. बुधवार (ता.२२) पर्यंत या धरणांत एकूण ४९१५८ दशलक्ष घनफूट साठा झाला आहे. यानुसार एकूण क्षमतेच्या ७५ टक्के पाणीसाठा झाला आहे. मागील वर्षी २२ ऑगस्टपर्यंत हाच साठा ७९ टक्के होता. यंदा तो ४ टक्‍क्‍यांनी कमीच आहे.
नाशिक व नगर जिल्ह्यासाठी महत्त्वाचे असलेले गंगापूर धरण ९२ टक्के भरले आहे. पालखेड ६६, तर करंजवण १०० टक्के भरले आहे. मागील चार दिवसांपासून नाशिक भागात पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे धरणसाठ्यात वाढ होत आहे. सप्टेंबर अखेरपर्यंत गंगापूर सारख्या महत्वाच्या धरणांतील साठा पूर्ण क्षमतेने भरेल, असे पाटबंधारे विभागाच्या सुत्रांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com