'देशी गोवंश' पुस्तकाचे उद्या प्रकाशन

'देशी गोवंश' पुस्तकाचे उद्या प्रकाशन

पुणे : देशी गाईंच्या शास्त्रशुद्ध व्यवस्थापन पद्धतीची माहिती देण्यासाठी सकाळ प्रकाशन ‘देशी गोवंश’ हे पुस्तक प्रकाशित करत आहे. हे प्रकाशन उद्या (ता. ६) सायंकाळी सहा वाजता घोले रस्त्यावरील पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन येथे होणार आहे.

ज्येष्ठ शास्त्रज्ञ व नालंदा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय भटकर यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन होणार असून, राज्य पशुसंवर्धन आयुक्त कांतिलाल उमाप व ‘सकाळ’चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांची सन्माननीय उपस्थिती लाभणार आहे. गो-पालनासारख्या शेतीपूरक उद्योगांमधून शेतकऱ्यांना आर्थिक फायदा मिळू शकतो. त्यासाठी व्यावसायिक पद्धतीने देशी गोवंशाचे संगोपन व संवर्धन आवश्‍यक आहे. यासाठी हे पुस्तक निश्‍चित मार्गदर्शक ठरणार आहे.

या पुस्तकात ‘सकाळ अॅग्रोवन’मधील निवडक लेखांसह तज्ज्ञ अभ्यासकांच्या पूरक लेखांचा नव्याने समावेश केला आहे. पुस्तकामध्ये देशी गाईंच्या विविध जाती व उपजाती, तिची वैशिष्ट्ये, व्यवस्थापनाची तंत्रे, जातिवंत पैदास याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. दूध उत्पादन व प्रजनन क्षमतेत सातत्य राखण्याची नैसर्गिक क्षमता देशी गाईंमध्ये चांगल्या प्रमाणात असते. ही क्षमता वाढावी, गाईंना होणाऱ्या विविध आजारांवर नेमके कोणते उपचार करावेत, याबद्दल पुस्तकामध्ये तांत्रिक माहिती दिलेली आहे.

विविध गो-शाळा व पशुपालकांचे स्वानुभव या पुस्तकाचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. ‘देशी गोवंश’ या पुस्तकाची किंमत रु. २४० असून, कार्यक्रमस्थळी हे पुस्तक व ‘सकाळ प्रकाशन’ची इतर दर्जेदार पुस्तके सवलतीच्या दरात उपलब्ध होतील; तसेच ‘सकाळ’च्या मुख्य कार्यालयात, सर्व आवृत्ती कार्यालयांत आणि महाराष्ट्रातील प्रमुख विक्रेत्यांकडे उपलब्ध आहेत.

पुस्तकांच्या ऑनलाइन खरेदीसाठी sakalpublications.com वर लॉगइन करावे. अधिक माहितीसाठी संपर्क ः ०२०-२४४०५६७८ किंवा ८८८८८४९०५० (कार्यालयीन वेळेत)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com