agriculture news in marathi, Destroy the dough to control the bond larvae | Agrowon

बोंड अळी नियंत्रणासाठी डोमकळ्या नष्ट करा
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

परभणीः गुलाबी बोंड अळीच्या प्रभावी नियंत्रणासाठी कपाशीच्या झाडावरील फुलांच्या डोमकळ्या तोडून नष्ट कराव्यात. बोंड अळी निर्मूलनासाठी शेतकऱ्यांनी सामुदायिक प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी कीटकशास्त्र विभाग प्रमुख डाॅ. पी. एस. झंवर यांनी केले.

परभणीः गुलाबी बोंड अळीच्या प्रभावी नियंत्रणासाठी कपाशीच्या झाडावरील फुलांच्या डोमकळ्या तोडून नष्ट कराव्यात. बोंड अळी निर्मूलनासाठी शेतकऱ्यांनी सामुदायिक प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी कीटकशास्त्र विभाग प्रमुख डाॅ. पी. एस. झंवर यांनी केले.

वनामकृवितर्फे राबविण्यात येत असलेल्या विद्यापीठ आपल्या दारी, पीक संरक्षण तंत्रज्ञान शेतावरी या मोहिमेअंतर्गंत कृषी शास्त्रज्ञ, कृषी महाविद्यालयातील रावेच्या कृषिकन्या, कृषी विभाग यांच्या पथकाने शुक्रवारी (ता. १०) मानवत तालुक्‍यातील देऊलगांव आवचार, मानोली, कोल्‍हा, झरी आदी गावशिवारातील शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन बोंड अळी नियंत्रणासाठी करावयाच्या उपाय योजनांची माहिती दिली. या पथकात डॉ. झंवर यांच्यासह प्रभारी तालुका कृषी अधिकारी के. एस. गायकवाड, डॉ. अनंत बडगुजर, डॉ. एस. जी. पुरी, डॉ. पपिता गौरखेड, कृषी अधिकारी जी. आर. शिंदे, डॉ. एन. आर. सिरस, कृषिकन्या, गावातील पदाधिकारी उपस्थित होते.

या वेळी डॉ. झंवर म्‍हणाले की, सद्यस्थितीत निबोंळी अर्क, प्रोफेनेफोस, प्रोफेनेफोस अधिक सायपरमेथ्रिन आदी संयुक्‍त कीटकनाशकांची शिफारशीनुसार फवारणी उपयुक्‍त ठरणार आहे. डोमकळ्या तत्काळ तोडून नष्‍ट कराव्यात. डॉ. अनंत बजगुजर म्हणाले, कामगंध सापळे मोठ्या प्रमाणात लावल्‍यास कमी खर्चात गुलाबी बोंड अळीचे व्‍यवस्‍थापनास मोठा हातभार लाभणार आहे. कामगंध सापळ्यातील लूर वेळोवेळी बदलण्‍याची काळजी शेतकऱ्यांनी घ्‍यावी. या वेळी काही शेतकऱ्यांच्‍या शेतावरील कापूस पिकाच्‍या प्रक्षेत्राला देण्‍यात येऊन कामगंध सापळे योग्‍य पद्धतीने लावण्‍याचे प्रात्‍यक्षिकही सादर करण्यात आले.

इतर ताज्या घडामोडी
नदी नांगरणीचे सातपुड्याच्या पायथ्याशी...जळगाव ः शिवार व गावांमधील जलसंकट लक्षात घेता...
प्रत्येक गावात नेमणार भूजल...नगर ः राज्य शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता...
अरुणाग्रस्तांच्या स्थलांतराचा तिढा कायम सिंधुदुर्ग : अरुणा प्रकल्पग्रस्त आणि जिल्हा...
पाणीप्रश्नावरील आंदोलनाचे नेतृत्व करणार...नगर : ‘कुकडी’सह घोड धरणातील पाणीसाठे वाढविणे...
पुणे जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोटात...पुणे : मॉन्सूनचा पाऊस लांबल्याने जिल्ह्यात...
नाशिकमध्ये आले प्रतिक्विंटल ८७०० ते...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
आव्हानांवर मात करण्यासाठी कारखान्यांनी...पुणे : साखर उद्योगासाठी यंदाचे वर्ष ‘टर्निंग...
गेल्या खरिपातील सोयाबीनचे बियाणे झाले...परभणी  : २०१८-१९ च्या खरीप हंगामात...
पीकविम्याच्या नावाखाली भाजप सरकारकडून...मुंबई : शेतकऱ्यांकडून पीक कर्ज घेताना...
विधीमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी...मुंबई : नवनिर्वाचित गृहनिर्माणमंत्री...
सोयाबीन पीकविमाप्रश्‍नी शेतकरी संघर्ष...पुणे  ः गेल्या वर्षी बीड जिल्ह्यात पाऊस न...
कळमणा बाजार समितीत हरभरा ४१०० रुपयांवरनागपूर ः स्थानिक कळमणा बाजार समितीत हरभरा वगळता...
सोलापुरात हिरवी मिरची, टोमॅटोच्या दरात...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
शेतकरी सन्मान योजनेत रत्नागिरीतील आठ...रत्नागिरी : पंतप्रधान शेतकरी सन्मान...
कीटकशास्‍त्र विभागातर्फे ट्रायकोकार्ड...परभणी ः येत्या हंगामात मराठवाड्यातील औरंगाबाद,...
फळबाग योजनेतील अटी कोकणासाठी शिथिल करू...रत्नागिरी ः भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड...
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानाची...नाशिक : मागील वर्षी लाल कांद्याचे भाव पडल्याने...
कपाशीचा नांदेड ४४ बीटी वाण लोकार्पण हा...परभणी  : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
पावसाला उशीर झाल्याने चिंतेचे ढग गडदनांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत यंदा...
कृषी विद्यापीठाच्या वाणांच्या...रत्नागिरी ः डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी...