बुलडाण्यात ज्वारीला अतिथंडीचा फटका

बुलडाण्यात ज्वारीला अतिथंडीचा फटका
बुलडाण्यात ज्वारीला अतिथंडीचा फटका

बुलडाणा : रब्बीत ज्वारीचे पीक घेण्यात गेल्याकाही वर्षांत आघाडीवर असलेल्या या जिल्ह्यात थंडीचा जोरदार तडाखा शेतकऱ्यांना बसला आहे. दुष्काळाशी दोन हात करीत असलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा एका नव्या संकटाला सामोरे जावे लागत आहे.  

जिल्ह्याचे रब्बी लागवड क्षेत्र सुमारे साडे अकरा हजार हेक्टर एवढे आहे. यावर्षी खरिपात कमी पाऊस झाला. तसेच परतीचाही पाऊस न आल्याने रब्बी संकटात आला. असे असतानाही शेतकऱ्यानी हिमतीने ज्वारीची पेरणी केली. साडेसात हजार हेक्टरपर्यंत रब्बी ज्वारीची लागवड केली. सध्या हे पीक कुठे वाढीच्या स्थितीत, तर सुरवातीला लागवड केलेल्या भागाण कणसात दाणे भरण्याच्या अवस्थेत उभे आहे. 

डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून याभागात थंडीची लाट पसरली आहे. अद्यापही थंडीचा जोर कायम आहे. इतर पिकांप्रमाणेच रब्बी ज्वारीला थंडी मानवली नाही. अनेक शेतांमध्ये ज्वारीच्या उभ्या झाडांची पाणे करपून गेली. आता कणसे न पडलेल्या झाडांची बिकट स्थिती आहे. त्यामुळे  शेतकऱ्यांची उत्पादनाची आशा मावळली आहे. जवळपास दीड ते दोन हजार हेक्टर ज्वारीला असा जोरदार तडाखा बसला आहे. जिल्ह्यात घाटावरील तालुक्यांमध्ये प्रामुख्याने देऊळगावराजा, सिंदखेडराजा, चिखली, मेहकर, लोणार या तालुक्यांमध्ये रब्बी ज्वारीची लागवड करणारे शेतकरी असंख्य आहेत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com