agriculture news in marathi, detection of horn cancer in livestock | Agrowon

अोळखा जनावरांतील शिंगाचा कर्करोग
डॉ. गिरीश यादव, डॉ. अमोल यमगर
मंगळवार, 8 मे 2018

शिंगाचा कर्करोग साधारणपणे ५ ते १० वर्षे वयोगटातील मोठ्या जनावरांना होतो; परंतु वयस्कर जनावरातसुद्धा हा रोग आढळत आहे. जनावरातील शिंगाचा कर्करोग किंवा भिरूड हा रोग भारतात प्रथम १९०५ साली मुंबई पशुवैद्यक महाविद्यालयात आढळला. कडक उन्हात शेतात विविध कामांसाठी वापरले जाणारे बैल उदा. खिल्लार, कांकरेज, गीर, देवणी, लाल कंधारी इ. रोगास जास्त बळी पडतात. गाईमध्ये हा रोग तुलनेने कमी प्रमाणात होतो. तसेच म्हशी व मेंढ्या यांनाही हा रोग कमी प्रमाणात होतो.

शिंगाच्या कर्करोगाची कारणे

शिंगाचा कर्करोग साधारणपणे ५ ते १० वर्षे वयोगटातील मोठ्या जनावरांना होतो; परंतु वयस्कर जनावरातसुद्धा हा रोग आढळत आहे. जनावरातील शिंगाचा कर्करोग किंवा भिरूड हा रोग भारतात प्रथम १९०५ साली मुंबई पशुवैद्यक महाविद्यालयात आढळला. कडक उन्हात शेतात विविध कामांसाठी वापरले जाणारे बैल उदा. खिल्लार, कांकरेज, गीर, देवणी, लाल कंधारी इ. रोगास जास्त बळी पडतात. गाईमध्ये हा रोग तुलनेने कमी प्रमाणात होतो. तसेच म्हशी व मेंढ्या यांनाही हा रोग कमी प्रमाणात होतो.

शिंगाच्या कर्करोगाची कारणे

 • शेतात उन्हात काम करीत असताना प्रखर सूर्यकिरणांमधील अतिनील किरणामुळे शिंगाचा कर्करोग होतो.
 • शिंगाच्या बुडाच्या भागास सतत जळजळ होते.
 • शिंगास रंग लावणे, रंगातील विषारी पदार्थांमुळे शिंगामध्ये सतत जळजळ होते, त्यामुळे हा रोग होऊ शकतो.
 • शिंगाचा कर्करोग होण्याचे निश्चित कारण नाही; परंतु शेतात कामासाठी जुंपलेल्या बैलास शिंगाच्या पाठीमागच्या भागास सतत मानेवरील जुवाचा मार लागणे.
 • बरेच विषाणूही हा रोगासाठी कारणीभूत ठरतात.
 • वयस्कर जनावरांस हा रोग जास्त प्रमाणात होतो. नुकतेच मुंबई पशुवैद्यक महाविद्यालयात २२ वर्षे वयाच्या खिल्लार बैलात हा रोग दिसून आला.
 • खच्चीकरण केलेल्या बैलामध्ये हा रोग होण्याचे प्रमाण जास्त आहे.
 • शिंगे आकर्षक दिसण्यासाठी ती साळली जातात यामुळे शिंगाला इजा होते व हा रोग होतो.

शिंंगाचा कर्करोग कसा होतो
जनावरांचे शिंग हे बुडास जाड टोकास निमुळते असते. शिंगाचा बाहेरील भाग हा टणक आवरणाने बनलेला असतो, तर आतील भाग पोकळ असून, अनियमित असतो. तो मस्तकाच्या हाडाला जोडलेला असतो. जनावरांच्या शिंगाचा आतील पोकळ भागात या रोगाची सुरवात होते, नंतर हा कर्करोग शिंगाचा पोकळ भाग पूर्णपणे व्यापून टाकतो शिंगाच्या बुडासही तो पसरतो.

लक्षणे

 • शिंगास वेदना होतात.
 • जनावर सतत डोके हलवते.
 • जनावर झाडास शिंग घासते.
 • कर्करोग झालेल्या शिंगावर हलके मारून पाहिल्यावर त्यातून भद् भद आवाज येतो असा आवाज निरोगी शिंगातून येत नाही.
 • ज्या बाजूच्या शिंगास कर्करोग झाला आहे त्या बाजूच्या नाकपुडीतून रक्तमिश्रित स्राव येतो. असा स्राव शिंगाच्या बुडामधूनही येतो.
 • कर्करोग झालेले शिंग एका बाजूला झुकते .
 • रोगाचे प्रमाण जास्त असल्यास शिंग हलते थोड्याशा माराने गळून पडते.
 • शिंग तुटल्यावर कोबीसारखी कर्करोगची वाढ दिसते रक्तस्राव होतो.
 • अशा कर्करोगाच्या वाढीवर जिवाणूचा प्रादुर्भाव होतो व यात दुर्गंधी येते.
 • कर्करोगाच्या वाढीवर माश्या बसतात व असडी पडते.
 • हा कर्करोग शरीरात पसरणारा असल्यामुळे वेळीच लक्ष्य न दिल्यास शरीराच्या इतर अवयवात पसरू शकतो.

रोग कसा ओळखावा
शिंगाचा कर्करोग हा प्रामुख्याने लक्षणावरून उदा., शिंग वाकडे होणे, हलणे, नाकातून येणारा स्राव, शिंग घासणे अदीवरून केले जाते. जनावराच्या शिंगाच्या ‘क्ष’ किरण तपासणीत शिंगाच्या आतील पोकळ भागात पेशींची वाढ दिसते जी कर्करोग दर्शवते. या रोगाचे निश्चित निदान प्रयोगशाळेत कर्करोगाच्या वाढीच्या तपासणीवरून केले जाते.

उपचार

 • वरीलपैकी कोणतेही लक्षण दिसताच तत्काळ पशुवैद्यकाशी संपर्क साधून उपचार करावेत.
 • शिंगावर शस्त्रक्रिया करून शिंग बुडातून कर्करोगासहित काढले जाते. या रोगाचा इतर अवयवात प्रादुर्भाव झाल्यावर किंवा पसरल्यावर शस्त्रक्रियेचा फायदा होत नाही.
 • शिंगाचा कर्करोगावर व्हिनक्रिस्टिसिनसारखी कर्करोग विरोधी औषधे काम करतात असे आढळले आहे.

कर्करोग कसा टाळावा
कडक उन्हात बैलांना काम न देणे, शिंगे साळू नये, शिंगाना रंग न लावणे, बैलांना शेतात काम करताना मानेवरचे जू सतत शिंगावर आदळू नये म्हणून रबराचे अवरण जुवावर देणे आदी प्रतिबंधात्मक उपाय करता येतील.

संपर्क ः डॉ. गिरीश यादव, ७६६६८०८०६६
(मुंबई पशुवैद्यक महाविद्यालय परळ, मुंबई)

टॅग्स

इतर कृषिपूरक
जनावरातील मुतखड्यावर उपचारजनावरात मुतखडा झाल्यावर तो शस्त्रक्रियेने बरा...
निकृष्ट चाऱ्यापासून दर्जेदार पशुखाद्यउन्हाळ्यामध्ये जनावरांना पुरेसा हिरवा चारा देणे...
तुती लागवडतुती हे बहुवर्षीय पीक आहे. हलकी, मध्यम व भारी अशा...
दुग्धोत्पादनात पाण्याचे महत्त्वपाण्याच्या कमतरतेमुळे जनावरांच्या शरीरातील...
ओळखा जनावरांतील परजिवींचा प्रादुर्भाव...सध्याचा उन्हाळा आणि त्यानंतर येणारा पावसाळा...
कोंबड्यांचा ताण करा कमीतापमानवाढीचा सर्वाधिक त्रास हा कोंबड्यांना होतो....
जनावरांच्या आरोग्यासाठी जीवनसत्त्वेजीवनसत्त्वांची कमतरता असेल तर जनावरांचे स्वास्थ्य...
तापमानानुसार कोंबड्यांच्या व्यवस्थापनात...उन्हाळ्यात तापमान ४१ ते ४५ अंश सेल्सिअसपर्यंत...
जनावरांतील उष्माघाताची कारणे, लक्षणे,...वाढते तापमान आणि प्रखर उन्हामुळे जनावरांमध्ये...
जनावराच्या आहारात पाणी महत्त्वाचेजनावरांचे योग्य पोषण होण्यासाठी तसेच दुग्धोत्पादन...
तेजस्विनीच्या साथीने बचतीतून...तेजस्विनी लोकसंचालित साधन केंद्राच्या...
प्रथमोपचाराने बरे होतील जनावरांतील आजारजनावरांमध्ये विविध प्रकारचे विषाणूजन्य व...
वाढत्या तापमानाचा जनावरांवर होणारा...जनावरांमध्ये दिसून येणाऱ्या उष्मा तणावासाठी...
शेळ्या-मेंढ्यांमधील गर्भाशयाच्या...जनावरांना विशेषतः शेळ्या-मेंढ्यांना गर्भाशयाचे...
नियोजन स्वच्छ दूध उत्पादनाचे...दुग्ध व्यवसायात आर्थिक परिस्थिती, शास्त्रोक्त...
अॅझोला, हायड्रोपोनिक्स चाऱ्यातून करा...चाराटंचाईवर मात करण्यासाठी उपलब्ध चाऱ्याची...
संवर्धन खिलार गोवंशाचे...जातिवंत खिलार जनावरांची पैदास वाढवण्यासाठी...
शेळ्या-मेंढ्यांमधील गर्भाशयाचे आजार,...शेळ्या मेंढ्यांना गर्भाशयाचा आजार झालेला आहे हे...
झलक क्रिमोना आंतरराष्ट्रीय पशू...इटली देशात दरवर्षी क्रिमोना आंतरराष्ट्रीय पशू...
जनावरांच्या संतुलित आहार...जनावरांना दिवसभरात किती चारा दिला पाहिजे आणि तो...