नाशिक येथे साकारणार 'देवराई'

नाशिक येथे साकारणार 'देवराई'
नाशिक येथे साकारणार 'देवराई'

 नाशिक : दुर्मीळ देशी प्रजातींच्या वृक्षांचे संवर्धन करण्यासाठी महापालिकेने नागरी देवराई लागवडीचे उद्दिष्ट समोर ठेवून शहरात 'देवराई' प्रकल्प साकारण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या माध्यतातून वड, पिंपळ, तामण, कांचन, कडुनिंब, उंबर, पांगारा, बकुळ यांसारख्या ४० दुर्मीळ वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. 

शहरात एकाच दिवशी सहा विविध भागांमध्ये देवराईचा प्रारंभ प्रकल्पाचे प्रवर्तक अभिनेते सयाजी शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी शिंदे म्हणाले, ''आतापर्यंत ग्रामीण भागातच 'देवराई' ही संकल्पना वाढीस लागली. एकाच वेळी तब्बल सहा ठिकाणी देवराया साकारणारे नाशिक हे राज्यातील पहिलेच शहर आहे. 'स्वच्छ, सुंदर आणि हरित नाशिक'ची संकल्पना या माध्यमातून खऱ्या अर्थाने वास्तवात उतरेल.'' 

'शहीद उद्यान' नामकरण 

काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या स्मरणार्थ मुंबई नाका परिसरातील या देवराई प्रकल्पाचे 'शहीद उद्यान' असे नामकरण केले जावे, उद्यानातील झाडांना हुतात्म्यांची नावे दिली जावीत, अशी सूचना नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांनी मांडली. या सूचनेला आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी तात्काळ अनुमोदन दिले. शिंदे यांनी या प्रकल्पाचे 'शहीद उद्यान' असे नामकरण करण्यात येत असल्याचे जाहीर केले. महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते, आयुक्त राधाकृष्ण गमे, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते,  गटनेते गजानन शेलार, पश्चिम प्रभाग समितीच्या सभापती वैशाली भोसले, नगरसेविका डॉ. हेमलता पाटील आदी उपस्थित होते. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com