agriculture news in marathi, Devasthan trustee get market committee elections Voting rights ? | Agrowon

बाजार समिती निवडणुकीत देवस्थान प्रतिनिधीला मतदानाचा अधिकार?
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 26 जानेवारी 2018

पुणे ः ग्रामीण महाराष्ट्रातील महत्त्वाचे आर्थिक सत्ता केंद्र असलेल्या बाजार समित्यांच्या निवडणुकीत शेतकऱ्यांना थेट मतदानाचा अधिकार देत असताना, आता सातबारा उताऱ्यावरील देवस्थानांच्या प्रतिनिधीबराेबरच एकत्रित सातबारा उताऱ्यावरील ज्येष्ठतेनुसार मतदानाचा अधिकार देण्याचा शासन विचार करीत आहे. अशी माहिती सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली. तर तुरुंगावास झालेल्यांना निवडणूक लढविता येणार नसल्याचादेखील नियम करण्यात येणार आहे.

पुणे ः ग्रामीण महाराष्ट्रातील महत्त्वाचे आर्थिक सत्ता केंद्र असलेल्या बाजार समित्यांच्या निवडणुकीत शेतकऱ्यांना थेट मतदानाचा अधिकार देत असताना, आता सातबारा उताऱ्यावरील देवस्थानांच्या प्रतिनिधीबराेबरच एकत्रित सातबारा उताऱ्यावरील ज्येष्ठतेनुसार मतदानाचा अधिकार देण्याचा शासन विचार करीत आहे. अशी माहिती सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली. तर तुरुंगावास झालेल्यांना निवडणूक लढविता येणार नसल्याचादेखील नियम करण्यात येणार आहे.

राज्यातील बाजार समित्यांच्या निवडणुकांमध्ये थेट शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. यामध्ये १० गुंठे क्षेत्र असलेल्या सर्व सातबारा उताराधारक शेतकऱ्यांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. तर पुढील टप्प्यात सातबारा उताऱ्यावर नावे आणि पाच वर्षांत किमान तीन वेळा संबंधित बाजार समितीमध्ये शेतमालाची विक्री केलेल्या शेतकऱ्यांचा समावेश करण्यात येणार आहे.

मात्र या नियमांमुळे मतदार यादी करताना अनेक क्लिष्टता येत असल्याचे समाेर आले आहे. यामध्ये देवस्थांनांच्या नावेदेखील सातबारा उतारे असून, त्या उताऱ्यांवर ट्रस्टींची नावे आहेत. यामुळे या ट्रस्टींपैकी एका प्रतिनिधीला अधिकार देण्याचा सरकार विचार करीत आहे, असे मंत्री देशमुख यांनी सांगितले.

तसेच १० गुंठ्यांच्या एका सातबारा उताऱ्यावर एकत्रित कुटुंबीयांची नावे असतात, अशा वेळी यामधील कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीला मतदानाचा अधिकार देता येईल का, असा देखील विचार शासन करीत आहे, असेही देशमुख यांनी सांगितले. तर या निवडणुकांमध्ये गुन्हे दाखल असलेल्या शिक्षा झालेल्या व्यक्तीला निवडणूक लढविता येणार नसल्याचेदेखील पणन विभागाने स्पष्ट केले आहे.

इतर ताज्या घडामोडी
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...
नगरमधील ४३३८ शेतकऱ्यांची शेतीमाल...नगर  ः आधारभूत किमतीने मूग, उडीद, सोयाबीनची...
जळगाव जिल्ह्यात ज्वारीच्या पेरणीला...जळगाव : जिल्ह्यात रब्बीतील ज्वारी पेरणीकडे...
ढगाळ वातावरणामध्ये द्राक्ष पिकात...सांगली, मिरज व सोलापूर येथील काही भागांमध्ये हलके...
हुमणी अळीचे एकात्मिक व्यवस्थापनगेल्या काही वर्षांपासून राज्याच्या विविध...
पुणे जिल्ह्यात रब्बीसाठी १९ हजार...पुणे : पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामाची तयारी सुरू...
सोलापूर जिल्हा बॅंकेकडून ७० हजार...सोलापूर  : सोलापूर जिल्हा बॅंकेच्या सव्वा...
सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू होईनातसातारा : जिल्ह्यात खरिप पिकांची काढणी अंतिम...
भाजीपाला सल्लासध्याच्या काळात बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, तूर, गहू, हरभरा...ज्या ठिकाणी पाण्याचा ताण बसत आहे, त्या ठिकाणी...
हाताचा नाकाशी होणाऱ्या संपर्कातूनही...न्यूमोनियाकारक जिवाणू हा नाकाला हात लावणे,...
खानदेशात खरिपातील ज्वारीची आवक सुरुजळगाव : खानदेशात अनेक भागांत ज्वारीची मळणी जवळपास...
परभणी जिल्ह्यात मुगाची उत्पादकता एकरी १...परभणी : यंदा परभणी जिल्ह्यात मुगाची सरासरी...
पुणे जिल्ह्यात चाराटंचाईपुणे   ः पुणे जिल्ह्यातील पूर्व पट्ट्यात...
नगर - मराठवाड्यात पाण्यावरून संघर्षाची...नगर ः पुरेसा पाऊस झाला नसल्याने यंदा...
‘महसूल’च्या जागेवर चाऱ्याच्या...यवतमाळ  ः पांढरकवडा व राळेगाव तालुक्‍यांतील...
सातारा जिल्ह्यात ७७३ एकरांवर तुती लागवडसातारा  ः जिल्ह्यात रेशीम शेती करण्याकडे...