agriculture news in marathi, for developing native cow varieties Reconciliation agreement | Agrowon

देशी गाईचे वाण विकसित करण्यासाठी सामंजस्य करार
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 21 डिसेंबर 2017

नागपूर‍ : विदर्भातील देशी गाईंच्या संवर्धनासोबत जास्त दूध देणाऱ्या गाईचे वाण विकसित करण्यासाठी आयव्हीएफ या भ्रूण प्रत्यारोपण तंत्राचा अभ्यास करण्यासाठी विदर्भ वैधानिक विकास मंडळ आणि महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला असल्याची माहिती विभागीय आयुक्त अनुप कुमार यांनी आज दिली.

नागपूर‍ : विदर्भातील देशी गाईंच्या संवर्धनासोबत जास्त दूध देणाऱ्या गाईचे वाण विकसित करण्यासाठी आयव्हीएफ या भ्रूण प्रत्यारोपण तंत्राचा अभ्यास करण्यासाठी विदर्भ वैधानिक विकास मंडळ आणि महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला असल्याची माहिती विभागीय आयुक्त अनुप कुमार यांनी आज दिली.

विदर्भात देशी गाईचे वाण विकसित करताना नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जास्त दूध देणाऱ्या चांगल्या गाईंची संख्या वाढविण्याच्या दृष्टीने उत्तम देशी गाईचे कृत्रिम रेतन वापरून गर्भधारणा करण्यासंदर्भात महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे सहयोगी डॉ. एस. के. सहातपुरे हे संशोधन करणार आहेत.

या संदर्भात वैधानिक विकास मंडळ, पशुसंवर्धन विभाग तसेच विद्यापीठाच्या संयुक्त उपक्रमाअंतर्गत आयव्हीएफ या तंत्राचा वापर करून नवीन जास्त दूध देणाऱ्या तसेच दुधामध्ये जास्त स्निग्धांश (फॅट) असणाऱ्या देशी गाईचे वाण विकसित करण्यात येणार आहे.

या नव्या संशोधनामुळे देशी चांगल्या गाईची जात विकसित करण्याला प्रोत्साहन मिळणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त अनुप कुमार यांनी दिली. विदर्भ वैधानिक विकास मंडळाच्या पुढाकारामुळे देशी गाईंच्या विकासासोबत अधिक फॅट असलेले दूध या नव्या संशोधनामुळे निर्माण होणार असल्यामुळे विदर्भातील दूध उत्पादनवाढीला प्रोत्साहन मिळणार आहे. या नवीन तंत्रज्ञानाच्या अभ्यासासोबतच त्याचा प्रत्यक्ष वापर होण्यासंदर्भात डॉ. सचिन बेलसरे हे सल्लागार म्हणून या प्रकल्पाचे काम बघणार आहेत.

देशी गाईंचे वान विकसित करण्यासाठी वापरण्यात येणारे नवीन तंत्रज्ञान वर्धा, नागपूर व चंद्रपूर जिल्ह्यासाठी राहणार असून नवीन संशोधन विकासासाठी विदर्भ विकास मंडळाचे तज्ज्ञ सदस्य डॉ. कपिल चंद्रायण, डॉ. किशोर मोघे, डॉ. बंग, डॉ. रवींद्र कोल्हे आदींनी पुढाकार घेतला आहे.

इतर ताज्या घडामोडी
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...
नगरमधील ४३३८ शेतकऱ्यांची शेतीमाल...नगर  ः आधारभूत किमतीने मूग, उडीद, सोयाबीनची...
जळगाव जिल्ह्यात ज्वारीच्या पेरणीला...जळगाव : जिल्ह्यात रब्बीतील ज्वारी पेरणीकडे...
ढगाळ वातावरणामध्ये द्राक्ष पिकात...सांगली, मिरज व सोलापूर येथील काही भागांमध्ये हलके...
हुमणी अळीचे एकात्मिक व्यवस्थापनगेल्या काही वर्षांपासून राज्याच्या विविध...
पुणे जिल्ह्यात रब्बीसाठी १९ हजार...पुणे : पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामाची तयारी सुरू...
सोलापूर जिल्हा बॅंकेकडून ७० हजार...सोलापूर  : सोलापूर जिल्हा बॅंकेच्या सव्वा...
सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू होईनातसातारा : जिल्ह्यात खरिप पिकांची काढणी अंतिम...
भाजीपाला सल्लासध्याच्या काळात बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, तूर, गहू, हरभरा...ज्या ठिकाणी पाण्याचा ताण बसत आहे, त्या ठिकाणी...
हाताचा नाकाशी होणाऱ्या संपर्कातूनही...न्यूमोनियाकारक जिवाणू हा नाकाला हात लावणे,...
खानदेशात खरिपातील ज्वारीची आवक सुरुजळगाव : खानदेशात अनेक भागांत ज्वारीची मळणी जवळपास...
परभणी जिल्ह्यात मुगाची उत्पादकता एकरी १...परभणी : यंदा परभणी जिल्ह्यात मुगाची सरासरी...
पुणे जिल्ह्यात चाराटंचाईपुणे   ः पुणे जिल्ह्यातील पूर्व पट्ट्यात...
नगर - मराठवाड्यात पाण्यावरून संघर्षाची...नगर ः पुरेसा पाऊस झाला नसल्याने यंदा...
‘महसूल’च्या जागेवर चाऱ्याच्या...यवतमाळ  ः पांढरकवडा व राळेगाव तालुक्‍यांतील...
सातारा जिल्ह्यात ७७३ एकरांवर तुती लागवडसातारा  ः जिल्ह्यात रेशीम शेती करण्याकडे...