agriculture news in marathi, Development of Monsoon in karnataka, Tamilnadu | Agrowon

कर्नाटक, तमिळनाडूमध्ये मॉन्सूनची प्रगती
टीम अॅग्रोवन
सोमवार, 4 जून 2018

पुणे  : नैॡत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) उत्तरेकडील वाटचाल सुरू ठेवत रविवारी दक्षिणअंतर्गत कर्नाटक आणि तमिळनाडूच्या आणखी काही भागांत प्रगती केली. तर ईशान्य भारतातील आसाम, अरुणाचल प्रदेश आणि त्रिपुराच्या काही भागांत मॉन्सून दाखल झाला आहे. पुढील वाटचालीस पोषक स्थिती असल्याने बुधवारपर्यंत (ता. ६) दक्षिण आणि ईशान्य भारताच्या आणखी काही भागांत मॉन्सून पोचणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. 

पुणे  : नैॡत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) उत्तरेकडील वाटचाल सुरू ठेवत रविवारी दक्षिणअंतर्गत कर्नाटक आणि तमिळनाडूच्या आणखी काही भागांत प्रगती केली. तर ईशान्य भारतातील आसाम, अरुणाचल प्रदेश आणि त्रिपुराच्या काही भागांत मॉन्सून दाखल झाला आहे. पुढील वाटचालीस पोषक स्थिती असल्याने बुधवारपर्यंत (ता. ६) दक्षिण आणि ईशान्य भारताच्या आणखी काही भागांत मॉन्सून पोचणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. 

मॉन्सूनने यंदा नियोजित वेळेच्या तीन दिवस आगोदर (२९ मे) केरळात धडक दिली. अरबी समुद्रात आलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे दुसऱ्याच दिवशी (३० मे) माॅन्सूनने कर्नाटक किनारपट्टीचा बराचसा भाग व्यापला. त्यानंतर मात्र तीन दिवस कर्नाटकात मॉन्सूनची स्थिती जैसे थे होती. रविवारी माॅन्सूनने प्रगती करत दक्षिणअंतर्गत कर्नाटकाचा काही भाग, तर तमिळनाडूचा बराचसा भाग व्यापला. दरम्यान बंगालच्या उपसागरावरून ईशान्य भारतातील राज्यांकडे वाटचाल सुरू होती. शुक्रवारी (ता.१) मणिपूर, मिझोराम राज्याच्या काही भागांत माॅन्सून पोचला होता. रविवारी मणिपूर, मिझोराम, नागालॅँडच्या उर्वरित भागासह त्रिपुरा, अरुणाचल प्रदेशपर्यंत धडक दिली आहे.

 माॅन्सूनच्या पुढील वाटचालीस अनुकूल हवामान होत असल्याने बुधवारपर्यंतच्या तीन दिवसांमध्ये दक्षिणेकडील आणखी काही भागांत, तसेच संपूर्ण ईशान्य भारताचा भाग व्यापून पश्‍चिम बंगालपर्यंत दाखल होईल. तर बुधवारनंतर महाराष्ट्र आणि गोव्यात पावसाचे प्रमाण वाढून शुक्रवारपर्यंत (ता. ८) महाराष्ट्राच्या काही भागांत मॉन्सून दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

इतर अॅग्रो विशेष
सूर्य तळपताना छत करा दुरुस्तआठवड्यापूर्वी आलेल्या चांगल्या पावसाच्या अंदाजाने...
आयोगाचा कारभार प्रश्‍नचिन्हांकितप्रत्येक निवडणुकीची रीत न्यारी असते,...
पाणी व्यवस्थापनातून वाढविली कापसाची...आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यातील अंबोडा (ता....
पाणी व्यवस्थापनातून नळावणे गावाची...अनेक वर्षांच्या पाणीटंचाईतून मुक्त होण्यासाठी...
डेरे यांनी उभारली अत्याधुनिक सिंचन...सातारा जिल्ह्यातील कवठे येथील अतुल डेरे यांनी...
‘आर्टिफिशियल इंटिलिजन्स’कडे आयटी...‘आर्टिफिशियल इंटिलिजन्स’ हेच येत्या काळातील...
पाणी व्यवस्थापनातून ग्रामविकासपाण्यासाठी कायम संघर्ष करीत असलेल्या कान्होळ (जि...
अवघी कारभारवाडी झाली ठिबकमयकोल्हापूर जिल्ह्यातील कारभारवाडी (ता. करवीर) येथे...
सर्वाधिक ६५० शेततळ्यांचं अजनाळेसोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुका दरवर्षीच...
अल्पभूधारकांच्या आयुष्यात जलश्रीमंती बुलडाणा जिल्ह्यात जानेफळ परिसरात शासनाच्या...
सत्तावीस गटांच्या बळातून घडली किमयासंगमनेर (जि. नगर) तालुक्यातील सावरगाव तळ...
वाघाड पाणीवापर संस्थांनी शेतीतून उभारले...नाशिक जिल्ह्यात वाघाड प्रकल्पस्तरीय पाणीवापर...
कम पानी, मोअर पानी देणारे डाॅ. वने...नगर जिल्ह्यातील मानोरी येथील कृषिभूषण डॉ....
आसूद : पाणी वितरणाचे अनोखे मॉडेलरत्नागिरी जिल्ह्यात दापोली-हर्णे रस्त्यावर दोन...
विकासाची गंगा आली रे अंगणी...खानदेशात जळगाव, जामनेर व भुसावळ या तालुक्‍यांच्या...
मराठवाड्यात सिंचनातले सर्वोच्च...परभणी जिल्ह्यात वरपूड येथील चंद्रकांत अंबादासराव...
होय, कमी पाण्यात विक्रमी ऊस !सांगली जिल्ह्यातील गोटखिंडी येथील प्रयोगशील ऊस...
राज्यात नीचांकी हरभरा खरेदीमुंबई : राज्यातील हरभरा उत्पादक...
सीमेवरील तणावाचा केळी निर्यातीला फटकारावेर, जि. जळगाव : जम्मू-काश्मीर नियंत्रण रेषेजवळ...
ॲग्रोवनच्या ‘मराठवाड्यातलं इस्त्राईल :...जालना : कष्ट उपसणारी पहिली पिढी, पीक बदलातून...