agriculture news in marathi, developmental works started soon in market committe, pune, maharashtra | Agrowon

पुणे बाजार समितीतील विकासकामांना दसऱ्यानंतर सुरवात : देशमुख
टीम अॅग्रोवन
रविवार, 30 सप्टेंबर 2018

पुणे  ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील विविध पायाभूत सुविधांचे मजबुतीकरण आणि विविध विकासकामांना पणन संचालकांनी मान्यता दिली आहे. काही कामांचे कंत्राट देण्यात आले असून, काही कामांची निविदा प्रक्रिया सुरू अाहेत. या विविध कामांना दसऱ्यानंतर प्रत्यक्ष सुरवात हाेईल, अशी माहिती बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख यांनी दिली.

पुणे  ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील विविध पायाभूत सुविधांचे मजबुतीकरण आणि विविध विकासकामांना पणन संचालकांनी मान्यता दिली आहे. काही कामांचे कंत्राट देण्यात आले असून, काही कामांची निविदा प्रक्रिया सुरू अाहेत. या विविध कामांना दसऱ्यानंतर प्रत्यक्ष सुरवात हाेईल, अशी माहिती बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख यांनी दिली.

शनिवारी (ता. २९) आयोजित पत्रकार परिषदेत श्री. देशमुख यांनी ही माहिती दिली. विविध विकासकामांमध्ये भाजीपाला आणि केळी विभागातील रस्त्यांचे डांबरीकरणासाठी ७ काेटी १२ लाख, गुळ भुसार विभागातील रस्त्यांसाठी ७ काेटी ९६ लाख, भुसार विभागातील सर्व्हिस लेनमधील वीज आणि पाणी वाहिन्यांच्या डक्टसाठी ८ काेटी, जनावरे बाजाराच्या संरक्षक भिंतीसाठी ७३ लाख ९१ हजार रुपयांच्या कामांना मान्यता मिळाली आहे. यामधील रस्त्यांच्या कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून, दसऱ्यानंतर प्रत्यक्ष कामांना सुरवात हाेणार आहे.

बाजार आवारातील पाण्याचा वाढता वापर लक्षात घेत जुनी टाकी पाडून नवीन टाकी उभारण्यासाठी देखील मान्यता मिळाली असून २५ हजार लिटरएेवजी आता नवीन २५ लाख लिटर क्षमतेची टाकी बांधण्यात येणार आहे. आहे. यासाठी २ काेटी ५४ लाखांच्या कामाला मंजुरी मिळाली आहे. या टाकीचे काम पूर्ण हाेईपर्यंत पाणीपुरवठ्याची पर्यायी व्यवस्था म्हणुन बाजार समितीच्या लगत चार दिशांना नवीन पाणी जाेड महानगरपालिकेकडून घेण्यात येणार आहे.

तसेच बाजार आवारात नव्याने ११ स्वच्छतागृहे आणि ११ पाणपाेई उभारण्यात येणार आहे. खेड शिवापूर येथील जागेवर २७ काेटी ५४ लाखांचा प्रतवारी, पिकवण गृह उभारणीचा प्रस्ताव पणन संचालकांकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आला आहे. या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यावर तातडीने काम सुरु केले जाईल असे देशमुख यांनी सांगितले.

आपला बाजार स्वच्छ बाजार अभियान राबवणार
पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या आवाहनानुसार २ आॅक्टाेबरला महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने आपला बाजार स्वच्छ बाजार अभियान राबविण्यात येणार आहे. बाजारातील सर्व घटक, संघटना यामध्ये सहभागी हाेणार असून सकाळी ९ ते १२ वाजेपर्यंत सर्व विभागात स्वच्छता करण्यात येणार आहे.

बाजार शुल्कात ३ काेटी ४६ लाखांनी वाढ
गेल्या आर्थिक वर्षात बाजार समितीच्या बाजारशुल्कात ३ काेटी ४६ लाखांनी तर एकूण उत्पन्नात ३ लाख ५४ लाखांनी वाढ झाली असल्याचेही देशमुख यांनी सांगितले.

इतर ताज्या घडामोडी
अळिंबी, स्पॉन्सच्या नावीन्यपूर्ण...सर्व वयोगटातील लोंकासाठी अळिंबी हे अत्यंत पोषक...
शेतीमाल विक्रीसाठी १२ शेतकऱ्यांची नोंदणीसांगली ः सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उडीद, मूग...
नांदेड, परभणी, हिंगोलीत मूग, उडदाला कमी...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोलीतील कृषी उत्पन्न...
पीक संरक्षण क्षेत्रात ‘महिंद्रा’ची...मुंबई : कृषी अवजारे आणि शेती उत्पादनात देशात...
गिरणारे बाजारातील बेहिशेबी वसुलीला चापनाशिक : गिरणारे (ता. जि. नाशिक) येथील टोमॅटो...
'योग्य आर्थिक व्यवस्थापन हा शेती...नाशिक : ‘‘योग्य आर्थिक व्यवस्थापन हाच शेती...
कपाशीवरील पांढरी माशी, कोळी नियंत्रण...सध्या कोरडवाहू कपाशीवर पांढऱ्या माशी व कोळी या...
जळगावात केळीदरात १०० रुपयांनी वाढजळगाव ः केळी दरात गत आठवड्याच्या अखेरीस...
नागपुरात नव्या सोयाबीनची बाजारात आवक...नागपूर ः बाजारात नव्या सोयाबीनची आवक वाढती असली...
नगरमध्ये कांद्याला सोळाशेचा दरनगर ः जिल्ह्यातील एका उपबाजार समितीसह सात बाजार...
तासगाव बाजार समितीत बेदाण्याची आवक,...सांगली  ः दिवाळी सणाच्या पार्श्‍वभूमीवर...
विसावी सिंचन परिषद अकोला येथे होणारसोयगाव, जि. औरंगाबाद   : येथे रविवारी (ता....
वऱ्हाडात मूग, उडदाला मिळतोय...अकोला  ः या हंगामात लागवड झालेल्या मूग,...
नगर जिल्ह्यात उडदाचे उत्पादन घटलेनगर  ः जिल्ह्यात यंदा सुरवातीपासून पाऊस...
‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी दाखवले...नगर  : शेतकऱ्यांना दुधाला पाच रुपये अनुदान...
पीक कापणी प्रयोग अहवालानंतर...बुलडाणा   ः कमी पाऊस तसेच पावसातील खंडामुळे...
इंदापूर तालुक्यात तातडीने दुष्काळ जाहीर...भवानीनगर, जि. पुणे  : सरकारने आता तांत्रिक...
पुण्यात आवक कमी झाल्याने भाजीपाल्यांची...पुणे ः राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या...
दुष्काळी तालुक्यांतून अकोले, कोपरगावला...नगर : अकोले तालुक्‍यात पाऊस पडण्याच्या प्रमाणात...
सोयाबीनने मोडले शेतकऱ्यांचे कंबरडेअमरावती  ः दिवाळीच्या मोसमात दोन पैसे...