agriculture news in marathi, Devendra Fadanvis critisises on the people opposing Samrudhi Highway | Agrowon

ज्यांनी समृद्धी महामार्गाला विरोध केला, तेच दलाल झाले : मुख्यमंत्र्यांची टीका
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 19 डिसेंबर 2017

नागपूर : ज्यांनी समृद्धी महामार्गाला विरोध केला, तेच दलाल झाले. एक टोळीच शेतकऱ्यांच्या नावावर काम करतेय, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केली. सुयोग निवासस्थानी आज (ता. १९)  पत्रकारांशी वार्तालाप करताना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी त्यांनी विविध विषयांवर आपली मते मांडली. 

नागपूर : ज्यांनी समृद्धी महामार्गाला विरोध केला, तेच दलाल झाले. एक टोळीच शेतकऱ्यांच्या नावावर काम करतेय, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केली. सुयोग निवासस्थानी आज (ता. १९)  पत्रकारांशी वार्तालाप करताना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी त्यांनी विविध विषयांवर आपली मते मांडली. 

कोकणातील रिफायनरी संदर्भात बोलताना मुख्यंमंत्री म्हणाले, की रिफायनरीसाठी आम्ही शिवसेनेसह आग्रह धरला. ही रिफायनरी ग्रीन रिफायनरी आहे. मात्र, आता अपप्रचार केला जातोय. याचा मासेमारी सोडा, समुद्रावर कुठलाही परिणाम होणार नाही. जी जागा निवडली, त्या जागेवर शेती होत नव्हती. 40 टक्के जागा गुंतवणूकदाराची आहे. मुंबईतील एनजीओ जाऊन आंदोलन करतात. आंदोलन करणे हा धंदा झालाय. या प्रकल्पामुळे एक लाख स्थानिक लोकांना रोजगार मिळणार आहे. नोकऱ्यात स्थानिकांना प्राधान्य देणार आहोत. आम्ही कंपनीला तीन वर्षे आधीच कौशल्य विकास कार्यक्रम राबविण्याचे सांगणार आहोत. तीन लाख कोटींची गुंतवणूक देशांत कुठेच नाही, हे जर हातून गेलं तर करंटेपणाच म्हणावा लागेल. रिफायनरी बनवा समितीही तयार झालीय. या विषयी आम्ही गावागावात जाऊन माहिती देणार आहोत.

एकनाथ खडसे यांचे पुनर्वसनासंदर्भात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, ''नाथाभाऊंचे पुनर्वसन शक्य नाहीच. पुनर्वसन विस्थापितांचे होते. नाथाभाऊ प्रस्थापित नेते आहेत, अशी लोकं असेट असतात.'' नारायण राणे यांच्या मंत्रिमंडळ समावेशाबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, नारायण राणे यांचे पुनर्वसन होणार. ते आमच्यासोबत आहेत. राणेंना आमच्या कोट्यातून घेणार, त्यामुळे शिवसेनेच्या विरोधाचा प्रश्न नाही.

गुजरातमधील विजय अभूतपूर्व. देशाच्या राजकारणात विधानसभेत 50 टक्के मतं मिळवणारी सरकार कमी. गुजरात-हिमाचल मधील विजयामुळे महाराष्ट्रात आम्ही अजून स्थिर झालो, असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला. 

इतर अॅग्रो विशेष
‘उजनी’तील पाणीसाठा उणे पातळीत सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी...
राज्यभरात अन्नत्याग आंदोलनमुंबई ः शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रती...
मार्चनंतरही पणन करणार कापूस बाजारात...यवतमाळ ः शेतकऱ्यांच्या घरातील कापूस विकल्या...
मढी यात्रेला बुधवारपासून प्रारंभनगर ः होळीच्या दिवशी सकाळी कानिफनाथांच्या समाधीला...
दर्जेदार ऊसबेण्याची केली निर्मिती काशीळ (ता. जि. सातारा) येथील उच्चशिक्षित व...
मतदानासाठी सकाळी सात ते सायंकाळी...अकोला ः देशात होत असलेल्या लोकसभा...
कोकणातील आंबा अडकला धुक्याच्‍या फेऱ्यातवेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग : ऐन हंगामातच कोकणातील...
विदर्भात वादळी पावसाची शक्यतापुणे : मध्य भारतात होत असलेल्या वाऱ्यांच्या...
हळदीचे दिवसातून दोन वेळा सौदेसांगली ः सांगली बाजार समितीत गेल्या दोन ते...
पदविकाधारकांना कृषिसेवेचे दरवाजे बंद... पुणे : राज्याच्या शेतकरी कुटुंबातील हजारो...
सर्वसामान्यांचा असामान्य नेतामाजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर...
सर्जनशीलतेला सलाम!व र्ष २०१७ च्या खरीप हंगामात कापसावर फवारणी...
प्राणघातक हृदयरोगाचे प्रमाण होतेय कमीगेल्या दोन वर्षामध्ये हृदयरोगाला प्रतिबंध आणि...
अन्नत्याग आंदोलनास प्रारंभ : अमर हबीब,...नवी दिल्ली : शेतकरी आत्महत्यांप्रती सहवेदना आणि...
मच्छीमारी व्यवसायाने आणली समृद्धीगणित विषयात पदवी असूनही बेरोजगार राहणं नशिबी आलं...
काबुली हरभऱ्याने उंचावले अर्थकारण चोपडा तालुक्‍यातील (जि. जळगाव) तापी व अनेर...
जत तालुक्यात द्राक्ष, डाळिंब बागा...सांगली : जत तालुक्यात पश्‍चिम भाग वगळता...
प्रकल्प व्यवस्थापकावर कारवाईचे आदेशपुणे : एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन...
सहवेदना :आज अन्नत्याग आंदोलनयवतमाळ: शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रति...
उन्हाची काहिली वाढलीपुणे: राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाची...