agriculture news in Marathi, Devendra Fadnvis, 3100 rupees will demand for sugar, Maharashtra | Agrowon

साखरेला ३१०० रुपये एफआरपीची मागणी करु : मुख्यमंत्री फडणवीस
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 26 ऑक्टोबर 2018

कोल्हापूर  : उसाच्या एफआरपीचा एकूण एक पैसा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करेपर्यंत शासन गप्प बसणार नाही. याबरोबरच साखरेचा किमान भाव २९०० रुपये बांधून दिला असून, तो किमान ३१०० रुपये करावा, यासाठी केंद्र शासनाकडे शिफारस करू, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारणा कोडोली (जि. कोल्हापूर) येथे दिली. 

कोल्हापूर  : उसाच्या एफआरपीचा एकूण एक पैसा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करेपर्यंत शासन गप्प बसणार नाही. याबरोबरच साखरेचा किमान भाव २९०० रुपये बांधून दिला असून, तो किमान ३१०० रुपये करावा, यासाठी केंद्र शासनाकडे शिफारस करू, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारणा कोडोली (जि. कोल्हापूर) येथे दिली. 

रयत क्रांती संघटनेच्या वतीने झालेल्या शेतकरी कष्टकरी परिषदेत ते बोलत होते. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, सहकारमंत्री सुभाष देशमुख, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, आमदार सुरेश हाळवणकर, आमदार अमल महाडिक, आमदार डॉ. सुजित मिणचेकर, आमदार शिवाजीराव नाईक आदींच्या प्रमुख उपस्थितीत ही परिषद झाली.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, गेल्या चार वर्षात एफआरपीसाठी एकदाही आंदोलन करायला लागले नाही. अन्य राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात एफआरपीचे पैसे देण्यावर शासनाने भर दिला. राज्याने २१ हजार कोटी एफआरपीचे पैसे दिले, केवळ १२० कोटी बाकी असून तेही प्राधान्य क्रमाने देण्यास शासन बांधील आहे. स्वामिनाथन यांनी हा अहवाल सन २००५ मध्ये सादर केला, पण सन २०१४ पर्यंत हा अहवाल धुळखात पडला होता. मात्र पंतप्रधान मोदी यांनी स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी स्वीकारून शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे.

‘‘दुष्काळग्रस्तांना पिण्याचे पाणी, जनावरांना चारा प्राधान्याने उपलब्ध करुरून देण्याबरोबरच बॅंकांच्या कर्ज वसुलीला स्थगिती वीजबिलात सवलत, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काला स्थगिती यासह रोजगार हमीच्या कामाला प्राधान्य अशा दुष्काळाच्या सर्व सुविधा आणि सवलती दिल्या जातील. केंद्राचे पथक येऊन गेल्यानंतर शेतकऱ्यांना थेट मदत व विम्याचे संरक्षण दिले जाईल,’’ असेही मुख्यमंत्री म्हणाले. 

श्री. खोत यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांचे नाव न घेता चौफेर हल्ला चढविला. निवडणुका जवळ आल्याने आता आंदोलनाची वेळ आली आहे. यंदा नक्कीच दर चांगला मिळणार आहे. शेतकऱ्यांना आंदोलन करावे लागणार नाही. आम्ही रयत क्रांती संघटनेच्या वतीने यंदाच्या उसाला एफआरपी अधिक २०० रुपये इतका दर मागत आहाेत.

 यंत्रमाग महामंडळाचे अध्यक्ष हिंदुराव शेळके, माजी आमदार दिनकर तात्या पाटील, माजी आमदार भगवानराव साळुंखे, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, अजितसिंह काटकर, सागर खोत यांच्यासह विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अमन मित्तल आदी यावेळी उपस्थित होते.

इतर अॅग्रो विशेष
सिंधुदुर्ग जिल्हयात मुसळधार पाऊस (video...सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील काही भागात बुधवारी (ता....
मक्यावरील लष्करी अळीचे एकात्मिक नियंत्रणमहाराष्ट्रात फॉल आर्मी वर्म (स्पोडोप्टेरा...
राज्य अर्थसंकल्प : सर्वसमावेशक ‘निवडणूक...मुंबई : राज्यात मोसमी पाऊस लांबला असला तरी आगामी...
‘सबसरफेस ड्रीप’ तंत्राने  ऊस, टोमॅटोची...शेततळ्यातले जेमतेम पाणी आणि उपलब्ध पाण्याचा योग्य...
कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाजपुणे   : राज्यातील मॉन्सूनचे आगमन...
जुनीच वाट की नवी दिशाप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ...
कोरड्या महाराष्ट्रावर घोषणांचा पाऊसराज्यात सत्तेत आल्यानंतर शेतीतील गुंतवणूक वाढविली...
लोकसहभागातून नागरी पर्जन्यजल संधारण शक्यप्रत्येक जलस्रोताचे पुनर्भरण करून त्याचं बळकटीकरण...
बोंडअळी निर्मूलन प्रकल्पात आठ राज्यांचा...नागपूर : देशात सर्वात आधी गुजरात त्यानंतर...
लांबलेला पाऊस आणि नियोजनशून्य कारभारजूनचा पहिला पंधरवाडा उलटून गेला तरी राज्यात...
पर्यावरणकेंद्री विकास ही जगाची गरच आजमितीला भारत व जगाला भेडसावणारी अव्वल समस्या आहे...
कृषी विकास दराची मोठी बुडीमुंबई  ः देशात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर...
कर्नाटकी बेंदराच्या निमित्ताने आज ...कोल्हापूर  : राज्यातील कर्नाटक सीमेलगतच्या...
उत्कृष्ट संत्रा व्यवस्थापनाचा युवा...वयाच्या विसाव्या वर्षीच शेतीत उतरलेल्या ऋषीकेश...
मॉन्सूनचे प्रवाह अजूनही मंदचपुणे  : अरबी समुद्रात गुजरातच्या किनाऱ्यावर...
ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचा अंदाजपुणे  : ‘वायू’ चक्रीवादळ निवळल्यानंतर...
एफआरपी द्या, काटामारी रोखा : बच्चू...पुणे :  राज्यातील ऊस उत्पादक...
‘जीएम’चा तिढामहिनाभरापूर्वी हरियाना राज्यात एका शेतकऱ्याच्या...
राज्यातील दूध संघांपूढे ‘अमूल’चे कडवे...पुणे: राज्याच्या दूध उद्योगात ‘अमूल’चा होत असलेला...
विदर्भ, मराठवाड्यात उष्ण लाटेचा इशारापुणे : वायू चक्रीवादळाने बाष्प ओढून नेल्याने...